वटवृक्ष...
वटपौर्णिमेच्या पावन व्रती क्षणाला...
देवाकडे साता जन्मांसाठी
मागते मी तुला ...
जन्म भर सौभाग्याची
साथ कायम असुदेत देवा मला...
अखंड आयुष्याचे वरदान
लाभु दे सख्याला...
पतिव्रता पत्नी सावित्री
लाभली जशी सत्यवानाला...
तशिच आमची साथ
साता जन्माची रेशिमगाठ
कच्च्या धाग्याने घट्ट विनली जाऊदे
हेच माझे मागने माझ्या दैवाला...-
समजली मंगळसुत्राची परिभाषा जगाला..
सावित्रीने मागितली इच्छा पूर्ति यमाला...
नेत्र आई-वडीलांन परी, पुत्र संपत्ती धनाला..
देऊन वरदान विचार आले यमाला..
किती दृढ तुझी ईच्छाशक्ती मिळवले सत्यवानाला..
तुच खरी सत्यवानाची सावित्री ।
आमरण तुझीच पूजा वटसावित्री ।-
वटपौर्णिमेच्या सनी व्रत ठेवी सुहासिनी...
साता जन्माच्या गाठी धाग्यात घेते गुफुनी...
नाजूक असा धागा नात्याचा
जपते मनी क्षणो क्षणी...
प्राण प्रिय पतीचे प्राण आणिले सावित्रीने परतूनी...
तशी आज व्रत करी पतीसाठी प्रत्येक सुहासिनी...
साता जन्माच्या धाग्याची विन
ही जन्मो जन्मांतरीची...
प्रत्येक जन्मी लाभो हाच मज सखा
हिच इच्छा एका पतीव्रतेची...
अशी थोर गाथा या वटपौर्णिमेची...
-
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे
बंधन सात जन्माच्या सोबतीसाठी
जन्मोजन्मीचे समर्पण
करणाऱ्या सर्व महिलांना
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा-
सात जन्म माहीत नाही,
हा जन्म अनुभवायचा आहे...
सोबतीनं तुझ्या मला,
प्रत्येक जन्म जगायचा आहे...
पावलांवर पाऊल तुझ्या,
डोळे झाकून टाकायचं आहे...
आयुष्याचा घट्ट धागा,
विश्वासाने विणायचा आहे...
सुखात सोबत, दुःखात पुढे,
मला तुझ्या जगायचं आहे...
आलेल्या वेळेला जसंच्या तसं,
साथीनं तुझ्या झेलायचं आहे...
एक एक फेरा वडाला,
तुझ्यासाठी घालायचा आहे...
अखंड राहावी साथ तुझी,
हेचं मागणं मागायचं आहे...-
तो विशाल..महाकाय वटवृक्ष पुजीला मी
तो बालिश..अल्लडपणा जरा त्याजीला मी
या जन्मापुरतंच नाही तर प्रत्येक जन्मासाठी
तुझंच होण्याचा मंसूबा मनी योजीला मी-
वडाचे झाड आहे त्याचे खूप आयु
मोठ्या प्रमाणात मिळवून देतो तो प्राणवायु
कापल्याने त्यांना इजा पोहचेल,हानी होईल
पालिकांकडून दंडात्मक कारवाई केली जाईल
सणामुळे फांद्या तोडून होते व्रिकी बाजारात
पण त्यामुळे झांडाचे नुकसान होते ना अतोनात
फांद्या तोडण्याला आता चला छाट देऊ या
झाडांचे पूर्ण संरक्षण व जतन करु या.
🌷 🙏🌺एक निसर्गप्रेमी🙏🌺🌷
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳-