QUOTES ON #लग्न

#लग्न quotes

Trending | Latest
18 SEP 2018 AT 11:36

Ek ashi life we suffering from every bit of age& relationship realize ,short life but live long.. (trust,love,happyness ,sad,....every movement live )😍😍😍

-


15 JUN 2020 AT 20:59

एका स्त्री साठी लग्न म्हणजे साधी सोप्पी गोष्ट नसते, त्यासाठी कित्तेक स्वप्न आणी स्वातंत्र्याची तिला निमुटपणे आहुती द्यावी लागत असते...

-



💫लग्नपत्रिकांमधील आजचा बदल💫

आज सकाळी शेजारच्या घरातील एक काकांनी त्यांच्या मुलीची लग्न पत्रिका दिली. तसे बघायला गेले तर शिक्षण, परिस्थिती बेताचीच पण आधुनिक समाज कसा पुढे आहे हे त्यांच्या पत्रिकेतून दिसले आणि आपण शिक्षित असुन तसा विचार करायला मागे पडलो की काय म्हणून मनात थोड़ चर्र... पण झाले.
असच वर-वर पत्रिका चाळताना लक्ष हळूच त्यामधील "स्वागत सखी" या नावावर गेल.आपल्या So Called आधुनिक म्हणावणार्या समाजात मुलींची नावे क्वचितच लग्नपत्रिकांमधे दिसतात कारण मुले पिढी चालवतात ना असा असा गोड गैरसमज शिक्षितांपेक्षा अशिक्षित(पण विचारांनी सदृढ) आता दुर
सारू लागले आहे हे कौतुकास्पदच...!!
चला तर मग या बदलाची सुरूवात आपणही करूया 😊!!
-क्रांती शेलार

-



अहो चहा देऊ का ?
ते
चहा देता का हो जरा ?
हा प्रवास म्हणजे
लग्नानंतरचं आयुष्य...

-


7 MAY 2021 AT 12:17

आनंदाने अक्षता उधळती सारेच वधूवरांवर परंपरा आहे छान
उणीव भासता एक शरमेन खाली जाई मान
चहूकडे चिमणीपाखरांना पडली असता अन्नाची वान
देऊया का आता तरी थोडा बदल्यात विचारांनाही सन्मान
देवूया का थोड मूक्या जीवा अन गोरगरीबांस दान

न घालवता वाया पोतभर
तेच चार दाणे तांदळाचे जाता कूकरवर
जेवू शकेल ना एखादा पोटभर
भूकेली पाखरे वाचतील ना भरकटणे वाऱ्यावर
नाहीतरी उधळलेल्यांपैकी किती पडतात माथ्यावर

उधळून सूमनेही पार होऊ शकते ही रित
जोडतांना दोघाची मनमीत
सोडूया ना आता ही अनीतीची प्रित
पाडून अंधविश्वासाची भित

बघा पटतय का पटल तर घ्या
नसेल पटत तरी एकदा पून्हा विचार करून नक्की पहा

-


17 SEP 2019 AT 17:59

तिच्या कलंकीत आयुष्यात,

अपेक्षाभंगातुन रक्तभंबाळ झालेल्या,
मनावरचा डाग तिला सतावत आहे..
जीवनातील खऱ्या सत्याचे दर्शन,
तिला आज करून देत आहे..
इच्छा तर तिची देखील नाही,
पुन्हा सांसारिक सुखात रमण्याची..
पण ती वेडी तरी काय करणार,
कारण प्रथाच पडलीय इथं,
समाजमान्य बलात्काराची..

-


18 SEP 2018 AT 12:54

दोन मनानंच जुळण आहे.....
तहानलेल्या समुद्रा कडे ....नदीन येऊन मिळणं आहे..

लग्न माझ्या साठी एक सुंदर कोड आहे....
दिसायला सोपं असलं तरी....,
सोडवाव तितक थोडं आहे😊

-


18 JUL 2019 AT 17:24

तुझा हात असाच
आयुष्यभर हातात असावा
तुझ्यासोबत लग्नाचा
तो दिवस ही यावा..

हाती तुझ्या
माझ्या नावाची मेहंदी सजावी
त्या मेहंदीत मी
माझ नाव शोधत बसावं...

तुझी साथ कायम
अशीच मला असावी
मी ही तुझ्या दु:खात
कायम तुझी साथ द्यावी..

तूझा विश्वास कायम ठेव
एकदिवस येईल बघ
घरुन तुझ्या मी तुला
वाजत गाजत माझ्या घरी घेऊन येईल बघ...

-




आठवूनी त्या आठवणींना,
आठवणींत रमली ती...

हासवुनी त्या हास्यांना,
हरवून गेली ती...

ओळखून त्या ओळखींना,
अनोळखी झाली ती...

निभावुनी आयुष्यातल्या त्या नात्यांना,
सारे जिंकूनही अजिंक्य ती...

©पडद्यामागची कलाकार
सौ स्मिता चव्हाण बारटक्के

-



काल मामा आमच्या घरी आले....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सांगून गेले .......

कसे आहात जावई?
मामांनी विचारले....
तीच्या स्वप्नात मग्न आहे,
मी सांगून टाकले.....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सांगून गेले .......

जाता जाता तिचा,
मोबाईल नंबर देवून गेले...
संध्याकाळी मी फोन तिला लावले,
लगेच फोन उचलून तिने,
प्रेमाचे भरपूर kissi मला दिले.....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सांगून गेले .......

पोरीला सुखात ठेवाल का?
मामीने मला विचारले,
सुखी राहशील का गं तू माझ्यासंगे?
प्रेमाने "हो"ती म्हणाली आणि,
मामीला त्यांचे उत्तर मिळाले....
आता येताना व्हराड घेवूनच या,
असे सर्वच म्हणाले .......
- ✍️बालकवी समाधान काळुंके

-