माता रमाबाई अंबेडकर
की पुण्यतिथि पर
कोटि-कोटि नमन 🙏💐
जय भीम नमो बुद्धाय
-
संकटों से जूझना रमा आई सीखा गई
संघर्षों से लड़ना रमाबाई सीखा गई
बच्चों की कुर्बानी समाज के लिए चढ़ा गई
बेटियों के दिलों में हौसला जगा गई
साथ देते हैं कैसे हमसफर का रमा आई सीखा गई
ना देखा दिन रात कदम से कदम मिलाकर चलती चली गई
शिक्षा का महत्व जाना पहचाना उन्होंने
बाबा साहब का साथ निभाती चली गई
युगों तक याद रखेंगे अहसान तुम्हारा
प्रणाम स्वीकार करो रमा आई हमारा
-
माता रमाई
माझ्या भिमाची सावली
दिन दलितांची आई
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती
माझी आई माता रमाई...
कष्ट सोशिले अपार
भिमाची बनून सावली
सदा हसत मुखाने राहली
माझी माता रमाई माऊली
रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
🙏 विनम्र अभिवादन 🙏
💐💐
✍-कवी-अविनाश पवार-
धनाचा अभाव जरी, तरी नांदली रमाई
दीन दुबळ्यांची माय, दीन दलितांची आई
अख्ख्या आयुष्यात, नाही केली तक्रार
निखऱ्यातही फुललेली, घेतली नाही माघार
रमाईची खरी पुण्याई, प्रज्ञा सूर्याची सावली
कधी पुटपुटली नाही, वादळात ही माऊली
स्वाभिमानी रमाई, सांभाळला प्रेमाने संसार
लाल कुंकू कपाळी, शोभून दिसें फार
पटक्याचं लुगडं नेसून, भिमाची बघण्या नवलाई
सहकार्याची मूर्ती होती,... त्यागमूर्ती रमाई.....-
ती होती मायेची सावली
मातृत्वाची ओवी,
माझ्या भिमाची रामू
दिनदुबळ्यांची रमाई...
-
धन्य ! ती रमाई
सोसून सारे दुःख ती, कधी मागे नाही हटली
चालविण्या सुखाचा संसार, कधी भीती नाही वाटली
धन्य ! ती भिमाची रमाई
शेण गोळा केली समोर पडेल ते काम केली
भीमाच्या शिक्षणाला पैसे कमी पडू न दिली
धन्य ! ती भिमाची रमाई
डोळ्यासमोर पाहिले तिने अनेकांचे मरण
पण ती कधीच गेली नाही मरणाला शरण
धन्य ! ती भिमाची रमाई
उपाशी पोरं पाहून तुटत होता तिचा जीव
पैसा नव्हतं तर सोन्याची केली नाही कीव
धन्य ! ती भिमाची रमाई
आजारी पडली तशी भीमा जवळच बसुनी
सत्तावीस मे रोजी गेली सर्वाना सोडुनी
धन्य ! ती भीमाची रमाई-
दिन दलितांची माता
रमाई भिमराव आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त
यांच्या विचारांना विनम्र अभिवादन-
निरागस हास्य
हास्य तुझे रमाई
असे भीमाला पाहून !
रुप तुझे सुंदर निरागस रमाई
फुलले भीमाला पाहून !!-
महामानवाची तू सावली
सकळ जनांची माऊली
संसाराला ठिगळे जोडून, तू
बाबासाहेबांची रामू झाली..
किती किती उपसला कष्ट
कधीच कशाचा नाही हट्ट
टूकिने केलास तू संसार
पण बंध जोपासलास घट्ट...
आई कशी होईल उतराई
तुझीच ग ही सारी पुण्याई
बाबासाहेबांना देऊन आधार
धन्य झालीस तू आई रमाई..
-