सखी ग माझी पुन्हा माझ्यावर रुसली
चढवताच तीला झाडावर कौतुकाच्या
भाराने तिच्या ती नाजूक फांदीही तुटली
अन् रुसू बाई माझी गाली खुदकन हसली
– Ashwini Gajbhiye✍️(शब्दाश्विनी)-
हिऱ्यामोत्यांहून तेजस्वी नाव तिचेच "गायत्री.."
चमक, तेज आणि लख्ख सुवर्ण झळाळी..
सप्तरंगांचीच उधळण इंद्रधनुष्य आभाळी..
सप्तसुरांची सरगम ठेवी समतोल निरंतर..
जीवन च्या प्रवासात ऐसी लाभो साथ चिरंतर..-
नात्यांमध्ये फसवाफसवी
होत नसते सहन
निखळ निर्मळ हवं ते
नाहीतर होते दहन.-
येतां जाता नुसता प्रश्नावर प्रश्न मलाच विचारावे,
एक नव्हे तर अनेक उत्तरांची अपेक्षा माझ्याकडून करावे,
झोपू न देतां दिवस-रात्र मलाच पिडावी,
अन् एक मैत्रीण अशी असावी !-
खळखळणाऱ्या पाण्यासारखी
आभाळातल्या चांदण्यासारखी
अशी माझी गोड मैत्रीण
नेहमी माझ्यासोबत असणारी
सुख- दुःखात साथ देणारी
माझी सावली बनून राहणारी ती
आज माझ्यापासून हरवत चालली होती
यशामध्ये नेहमी साथ देणारी
चार शब्द ऐकवायला ही कचरत नसणारी
का कोण जाणे पण
काळाच्या ओघानुसार
ती माझ्यापासून दूर चालली होती
मला मैत्रीचा अर्थ समजून देणारी ती
माझ्या मनातील भाव जाणून घेणारी ती
माझ्या मैत्रीच्या दुनियेतील
गोड अस हे गुलाब
खरच आज माझ्यापासून हरवत चाललय.........-
मैत्रीण कशी असावी??👇
आयुष्यभर साथ नाही दिली तरी चालेल;
पण दिलेली साथ"आयुष्यभर"स्मरणात राहावी...
-
मैत्रीण ..
माझ्या मित्र यादिमध्ये मित्र खुप आहेत
मैत्रीण होती ती फक्त माझं प्रेम
आणि माझ्या काही बहीणी
बाकी .., कोणा अनोळखी
असो अथवा ओळखीची
मुलींशी मैत्री मला आवडतच नाही
कारण बर्याचदा काही मुली
सर्व मुलांना एकाच तराजूत तोलतात
सर्व मुलांना मुली सारखेच समजतात
स्वाभिमानावर घाला, हा सहन न
होण्या पलीकडचा असतो .. sorry. 🙏🙏
-
माझी एक मैत्रीण हरवली आहे...
कालपर्यंत अगदी आपलकीने बोलणारी,
शब्दांतून व्यक्त होणारी...
छान लिहितोस रे तू कसं जमतं,
उगीच हरभराच्या झाडावर चढवणारी...
माहितेय...
तू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतेस,
यार पण कसं आहे ना एखाद्याची सवय लागली की
मग करमत नाही, वाचलय - ऐकलय खूप पण अनुभव तर पहिल्यांदाच आला असावा...
कारण अगदी "ना" म्हणण्या एवढ्या कमी वेळेत मैत्रीण बनलीस; बस बाकी काय नंबर आहे तुझा पण
न विचारता,सांगता कॉल करणं माझ्या तत्वात बसत नाही मुळात...
पण असलीस व्यस्त तरी १०-१५ मिनीट वेळ दे...
थोडंसं हसून घे माझ्या "विनोदा"वरही तुझ्या सुपीक डोक्याला थोडासा आराम दे...
ही कविता किंवा लेख नाहीये असच मुक्तहस्त लिहिलं आहे...
कारण ज्या दिवशी Testimonial देईन तेव्हा देईन, नक्कीच तुझ्या डोळ्यातले
अश्रू मला तरळताना पाहायचे आहेत...
ह्यासाठी की तू जसं दुसऱ्यांना सावरते तस तुलाही मला सावरायचं आहे...
उद्या किंवा जेव्हा वाचशील तेव्हा #ping नक्की कर.. वाट बघतोय...
तुझाच विश्वासू, मुंबईकर मित्र
(मंडळ आभारी आहे,मित्र मंडळ🤪🙆)
- मंगेश यादव-
किती मन आल्हादते
नुसत्या त्यांच्या येण्याने...
दुःखावर फुंकर घातली
जाते त्यांच्या सोबतीने...
मन भरून येते कधी
जुन्या आठवणीने...
चौफेर साद घालतात
जणू त्या अंतर मनाने...
कॉलेजच्या दिवसात रमत
होतो साऱ्याच एक मनाने...
आज झालो वेगवेगळ्या पण
अजूनही आहोत हे एकत्र मनाने...
चातकासम वाट पाहतो आम्ही
दरवर्षी गेट टूगेदर करण्याची...
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
पुन्हा उत्सुकता एकत्र भेटण्याची...-
मैत्रीण म्हणून, मला प्रेयसी बनवलं
नात निभावण्याची वेळ येता, दूर केलं ।-