Ankush Lokhande   (Ⱥղҟմ..)
2.1k Followers · 84 Following

read more
Joined 1 September 2020


read more
Joined 1 September 2020
30 APR AT 7:11

उमलून गंधित चाफा वाऱ्याच्या
झुळकेने लाजला होता
स्पर्श तयाचा चिंब प्रीतीत भिजला होता..

-


29 APR AT 22:46

.

-


29 APR AT 9:01

माझ्या मनात अशी आहेस तु ...

या स्मार्टफोनच्या हरवलेल्या जगात, माझा अनोखा टाईपरायटर आहेस तू, वेगवान मेसेज च्या दुनियेत, सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं गोड पत्र आहेस तू...

डिजिटल घड्याळांच्या गर्दीत, भिंतीवर लावलेला माझा Vintage घड्याळ आहेस तू, इन्स्टंट मेसेजेसच्या गडबडलेला जगात, हळुवार जपलेलं प्रेमाचं पोस्टकार्ड आहेस तू...

ऑनलाईन नकाश्यांच्या भरतीत, कंपास धरलेली माझी दिशा आहेस तू, स्वार्थासाठी वापर करणाऱ्या प्रेमकथांमध्ये, मनापासून लिहिलेली,
माझ्या प्रेमाची कविता आहेस तू...
माझ्या प्रेमाची कविता आहेस तू....🌿🙂

-


29 APR AT 7:41

कधी येशील?
जीवनात माझ्या...
तुझ्या सोबतीने चालायला

आतुरलंय आता मन
तुझ्या गोड भेटीला...
तुला पहायचं आहे मला..

-


29 APR AT 6:59

होता कलियुग पर्व सुरू नियतही लागली बदलायला जागा झाला स्वार्थ मनी लागले प्रेम सुद्धा आटायला

प्रश्न झाले निर्माण किती तरीही लोक कसे हो अज्ञानी प्रश्न छळतो सदा मनी तरीही समजतच नाही कुणी

जातो वृद्धाश्रमच्या दारी मुल असता यातना भोगायला वृद्ध जीवाला वृद्धाश्रमात अनाथ नसता येई भोग वाट्याला

लक्षात का घेत नाही कुणी जीवन प्रत्येकाचे आहे एक चक्र जशी करू आपण करणी तसेच येईल जीवनी तुमच्या चक्र

नित्य आठवावे रे माणवा मायेने घेतलेले त्या आईने कडेवर विसर ना पडावा कधी हौसेने घेतलेले बापाने हो खांद्यावर

आईबाबानी केला त्याग किती विचारत जावा प्रश्न मनोमन स्वतःला जीव असतो मुलांत अडकलेला येवू नये रे वृद्धाश्रम त्यांच्या वाट्याला

-


27 APR AT 21:34

सांगायचं खूप काही होत
जाताना दूर त्याआधी
मला बोलायच खूप होत
अस नव्हतं काही की
वाईट कोणी आहे इथे
प्रश्नच खूप वाईट हे.....

ज्याचे उत्तर ही प्रश्न असे
पुन्हा भेट तर निश्चितच आहे...
पण प्रश्न घेऊन नको आता
तू एकटी अन मला मी उत्तर मागू नको आता.....

-


27 APR AT 20:00

इस बेचैन सी ज़िन्दगी में कुछ पल जिओगी क्या

चाय बना रहा हूँ अदरक इलायची वाली पियोगी क्या
🥰🙈☕

-


24 APR AT 22:51

बहुत लोग मिले पर वो मोहब्बत ना मिली...
जिसकी चाहत थी वो किस्मत ना मिली...
जिनके लिए बैठे है इंतज़ार में हम,
उन्हें....हमारे लिए एक पल की फुरसत ना मिली

-


24 APR AT 9:49

हो, येते ना तुझी आठवण…
कधी सायंकाळचा गारवा
तर कधी सकाळचं कोवळ
ऊन घेऊन,
कधी ओठातले शब्द
तर कधी निशब्द झालेले
मौन घेऊन,
कधी रेटाळलेला दिवस
तर कधी नकळत सरलेला
क्षण घेऊन,
कधी डोक्यातला विचार
तर कधी झोपेतलं सुंदर
स्वप्न घेऊन,
कधी ह्रदयातलं स्पंदन
तर कधी वाट बघणारं
मन घेऊन,
हो, येते ना तुझी आठवण…

-


24 APR AT 0:33

माझी सर्व स्वप्न कुणी दुसरा तुझ्यासोबत जगतोय, याहून मोठं दुर्दैव काय ते असावं

-


Fetching Ankush Lokhande Quotes