आज भाऊबीज सर्वात महत्वाचा सण भावाबहिणिंसाठी..
हे नात दृढ राहो आणि नेहमी असच टिकून चंदना प्रमाणे सुगंधित बनत वाढत राहो...
मावळ्याकडून माझ्या बहिणींसाठी एक छोटी भेट शब्दांतून..
सर्वांना भाउबीज निम्मीत्त हार्दिक शुभेच्छा ✨🎇
Read in caption 🤩🤗🎇🎆✨🎂-
आम्ही बहीण भाऊ
आम्ही अल्लड, नटखट
आमची नुसतीच कटकट
आम्ही बोलतो पटपट
आम्ही भांडतो फटफट
माझ्याशिवाय तिला करमत नाही
तिच्याशिवाय मला करमत नाही-
बालपणीच्या आठवनींनी हसु आणनार
हेच ते ऋणानुबंध ।
रुसव्या फुगव्याची गोडी सांगणार
हेच ते ऋणानुबंध ।
बहीन नसलेल्या श्रिमंतीला गरबीची रास
हेच ते ऋणानुबंध ।
आईच्या मायेनंतर असलेली एकच माया
हेच ते ऋणानुबंध ।
डबडबलेल्या आसवांमधील एक हसु
हेच ते ऋणानुबंध ।
लाडी लबाडीतील प्रेमाची एक गाठ
हेच ते ऋणानुबंध ।
रागातही असलेली प्रेमाची हाक
हेच ते ऋणानुबंध ।
शब्दातुन तुटेल पण ह्दयातुन नाही
हेच ते ऋणानुबंध ।
सुख-दुःखात असलेली साथ
हेच ते ऋणानुबंध ।
राखी-नारळीपोर्णिमेला असलेली वाट
हेच ते ऋणानुबंध ।
भाऊ-बहीनीची अतुट गाठ
हेच ते ऋणानुबंध ।-
माझी बहिन
भाड़तो आम्ही नेहमी पण प्रेम ही तेवढच करतो
काय करु आमच नातच बहिन भावाच असत...
छोटी आहॆस तु म्हणून माझे काम तुला सांगतो
काय करु ग तुझ्या रागानींच मला आनंद मिलतो...
बाहेरगावी जात असलो की हलुच ती कानात सांगते
दादा येतांना माझ्यासाठी काही आणशील असे म्हणुन ती निघुन जाते...
वजनानी कमी असलो तरी रक्षा तुझी करणार
रक्षाबंधन,भाऊबीज हा सन नेहमी तुझ्या सोबत साजरा करणार...
प्रत्येकाला मिळत नाही पण मला मिळाली आहॆ
तु बहिन नाही माझी दूसरी आईच आहॆ असे मला वाटे...
लग्नानंतर मला विसरु नको
मी तुझा भाऊ आहॆ कोणी परका असे मला समझू नको...-
असंख्य ऋतूची तु चाहूल"
कधी वसंतात येते बहरून
ग्रीष्मात तू तपते.
नात भावा बहिणीच
तू अगदी निस्वार्थपणाने जपते.
कधी चंद्रासरखी येते फुलून"
ताऱ्यासारखी
कधी तू लुकलुते.
शब्दरूपी भेट देऊन"
हीच कामना करतो
की कधी ही दुःख तुझ्या
जीवनात न येऊ दे.-
चंचल अकल्पित"
शीतल अथांग
संथ नदीचा
जणू तू प्रवाह.
अलगद हास्य "
चेहऱ्यावर तुझ्या
निरागस डोळे तुझे
अन् निर्मळ मनातील भाव.
शब्दरूपी भेट देऊन"
हीच कामना करतो
जीवनात कधी न यावा
तुझ्या दुःखाचा प्रभाव.-
इवल्याश्या हातांनी तुझी सानुली
सागरकाठी बघ बांधतेय घर दादा
वाळू ही ओली केली बघ लाटांनी
ढासळताच खोपा मदत कर दादा
दाटले हे मेघ बघ अंबरात घनदाट
येईलच इतक्यात पाऊससर दादा
छत्री शोधाया कुठे जाशील आता
तळहात तुझे हे डोईवर धर दादा
म्हटले की लगेच हवे ते देतोस ना
ये, ओंजळीत शंखशिंपले भर दादा
आहेस तू हाक देताच येणारा भाऊ
माझ्या बोबडगाण्याचा तू स्वर साधा
-
नाते जसे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर जसे |
रखरखत्या उन्हात मायेची सावली जसे ||
एक अतूट बंधन मायेने भरलेले|
पवित्रतेने सजलेली, आपुलकीने सजलेले ||
नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते |
भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते ||
रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||
भावा बहिणीचे अनोखे नाते |
कधी हसून ,तर कधी रडवून अतूट बंधन||
औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते |
माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध ||
संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल|
आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले ||
प्रेमाचा आणि मायेचा भाऊबीज हा सण|
चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण ||
रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||
भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो|
मनी असलेले स्वप्न साकार होत राहो||
-✍️ काव्यशितल✍️
🤩 भाऊबीजचा खूप खूप शुभेच्छा भाऊ🤩
-
माझ्या दोन भावांना आणि YQ वरील सतिश दादा
व माझ्या इतर सगळ्यां लहान मोठ्या भावांना दिवाळीच्या आणि
भाऊबीजेच्या यशस्वी, आनंदी आणि उदंड आयुष्याच्या निरोगी शुभेच्छा...
💐💐🤗🤗😘😘🍫🍫😊😊🙏🙏
माझ्या जिवाला जीव देणारे...
माझ्या सुख दुःखात सहभागी होणारे...
जसे जन्मलो आम्ही एक मोठा भाऊ, "माझा दादा", जणू काही तो पुढे...
त्यानंतर मी दोघांच्या कडून लाड करवून घेणारी, त्यांची मधली लाडकी बहिण
( मोठ्याची "पूनम", तर बारक्याची "माई" )
आणि एक "छोटा भाऊ" जसा काही तो मागे...
माझं रक्षण करण्यासाठी एक पुढे, तर दुसरा मागे...( लय भारी वाटतं बरं का...! 🥰 )
खरचं मी भाग्यवान आहे. मला असले भाऊ मिळाले त्रास देणारे 😅🙏🍫
माझ्या पाठीवरून मायेचा, तर कधी शाब्बासकीचा हात फिरवणारे...
आज ही आम्ही तिघे, एकत्र आलो की "प्रेमाने" भांडतो...
त्या भांडणातून मायेचा झरा वाहतो...
ना मनी वाईट भाव, ना मनात द्वेष कुठला...
हवे आहोत आम्ही सगळे एकमेकांना,
जन्मोजन्मी आजन्म, बहिणभाऊ बनून अखंड सोबतीला...-
चेहऱ्यावर अनोखे तेज"
रूप तुझं"
श्वेत श्यामवर्ण
मन तुझं निर्मळ"
भाव तुझे साज्ववळ
शब्दरूप भेट देऊन
हीच कामना करतो मी
पूर्ण होऊन स्वप्न तुझे
येऊदे पंखात तुझ्या बळ.-