पाऊस काहीतरी घेऊन आला,
आठवणीना पुन्हा भिजवून गेला....
लपंडाव कसा पावसाचा?
ऋतुचक्र मुळी वेडावलेले !
स्मरता नृत्य दामिनीचे,
नभ पुनःपुन्हा व्याकुळलेले !!
लपवायचे होते जेव्हा उसासे,
घनघोर मेघ कमी आले !
वळताच पाठ तिची,
फिरून आभाळ हे फाटलेले !!
थेंबात पावसाच्या जरी,
लपविता अश्रु आले !
केली फसवणूक डोळ्यांनी,
मनीचे भाव सांगून गेले !!-
साउलीला स्पष्टीकरण कधीच अपेक्षित नसतं...
ती नेहमी मर्माशी एकनिष्ठ असते...!!
जाणून बुजून चुकलेल्या कर्माची तिला कधीच सहानुभूती नसते,
खन्त तिची इतकीच असते की प्रामाणिक असूनही तीही देहासोबत "मलीन" होते आणि अंतः सर्वांना ती नकोशी होते..!!
-
पंचरंगी सामना रंगला होता आखाड्यात.
कोणी प्रतिष्ठेसाठी खेळत होता,
तर कोणी पैशांसाठी हातापाया पडत होता.
डोक्यावर टोपी आणि
अंगावर खादीची झूल चढवून,
गावचा वळूदेखील नंदीबैल झाला होता.
आश्वासनांचा पाऊस पडत होता,
उन्हाच्या तप्त लाहीत आशेची
झुळूक दाखवत होता.
भाबडा मतदार राजा मात्र,
पुन्हा पाच वर्षांसाठी
दावणीला बांधला जाणार होता...-
काही नात्यांमध्ये
फसवले गेल्याचे दुःख नसतेच,
इतके दिवस ते नाते
मनापासून जपल्याचे दुःख जास्त असते..!-
माणूस सर्वात अधिक कोलमडून केव्हा पडतो...?
जेव्हा त्याने नितांत विश्वास ठेवलेला असतो... जीवापाड जीव लावलेला असतो... मात्र त्याच्याही नकळत त्याची हातोहात फसवणूक होते... त्याच्या मनातल्या प्रगाढ श्रद्धेला अकस्मात तडा जातो... ध्यानी मनी नसताना आघात होतो... त्याच्या प्रामाणिक स्वभावाचा फायदा उचलला गेला असतो... तो हतबल होतो... त्याच ते निष्पाप निर्मळ मन थिजून जातं... चांगुलपणावरील विश्वासच उडून जातो... अन् त्याच ते साधं सहज सुंदर मन मृतप्राय होतं...
- ©Rupali
-
निवडणूकींच राजकारण........
आली आली निवडणूक
स्वार्थासाठी चार दिवस
केली जाते समाजाची जपणूक....
मतदान झाले की
दुसऱ्या दिवसापासून
केली जाते त्याच समाजाची फसवणूक....
निवडणूकीच्या दिवसापर्यंत
देतात खोटी मोठी आश्वासनं
मतदान झाल्यावर
गडा कापतात कागदपत्रांन......
निवडणुकी पुरता असतो
स्वार्थाचा बंधुभाव
सफेद कपडे घालून
आणतो समाजसुधारकाचा आव....
देशीच्या बाटली वर
केल जात भ्रष्टाचारी राजकारण
देशाच्या अधोगतीचे
हेच खरे मोठे कारण.....
_ मिनु जोगी..... ✍
-
निष्काळजी होऊन जगण्यात खरी मजा असते
काळजी करत राहिल्याने लोक खूप फसवतात
-
काही लोक काही कारणाने जवळच्या माणसांशी
खोटं बोलून एक प्रकारची फसवणूकच करतात...
पण त्यात ते स्वतः ही फसले जातील याची यत्किंचितही तमा बाळगत नाहीत.
-
फसवणूकी शिवाय काय येणार ..
अशा माणसाच्या कपाळी.
केसं पांढरी झाली तरी ..
ज्याला अक्कल नाही आली.
-