का आजही वाटे
मी अशी ही एकटी,
सर्व नाते खोटे सारे
स्वार्थ जपूनी पोटी..!!
एकटे आलोय आपण
एकटे जाणार आहोत,
जीवशिव मग आपला
कोणाला फरक पडणार आहेत..!!
कठीण आहे ही वाट जीवनाची
भासे मज वेगवेगळ्या वळणाची,
कृर वाटते मज माणसे जवळची
रोज जाणिव होते एकटेपणाची...!!
-
Mad for songs🎧
Poems lovers😍
Hobbies poem write✏✍️
Like Indian Army ... read more
हे गणराया
संपली का रे तुझी माया
जिकडे तिकडे पडली कोरोनाची छाया
किती अंत पाहतो रे देवराया !!१!!
तु सुखहर्ता तु दु:खहर्ता
तुच आहे रे आमचा तारण हार
कंटाळलो रे आता
कधी होणार हे संकट पार!!२!!
ना तुझ्या आगमनाची तयारी
कसं आलं रे हे वर्ष
प्रत्येक जण कटांळला आता
ना कोणाच्या मनात हर्ष!!३!!
कोरोनाचं संकट भारी
आता तरी तु धाव
डॉक्टर पोलिस भाऊ थकले रे आता
आता तरी नवसाला पाव!!४!!
किती करु गयावया
सांग ना रे देवा
लवकर ये आमच्या गावाला
कोरोणाला घेऊन जा आपल्या गावाला!!५!!
-
घालमेल जीवाची
का होते आज अशी,
तुटले स्वप्न सारे
जे जपले होते उराशी....-
लय झेलले बये
तु सुद्धा कधीतरी,
तुच जाणतेय
जेव्हा नसते पोटात भाकरी....
-
आज मन कस बंद डब्ब्या सारखं भासत,
ना कोणी समजून घेणार ना कोणी जवळ घेऊन समजावणार, कोपर्यात ठेवलेल्या डब्या सारख झालयं, फक्त एकच जागा आणि एकच ओळख...-
सहज लोक म्हणतात की, विसरली तु मला
परंतु एखाद्या व्यक्तीला आठवण करणे अगदी सोप असतं. कठीण असतं ते त्याला विसरणं....
तात्पर्य :- कधीच कोणताच व्यक्ति एखादी वस्तू/ व्यक्तिला विसरत नसतो. फक्त फरक एवढाच की, रोज आठवण केली जात नाही..-
चौकटीच्या बाहेर कधीतरी
तु थोडा डोकावून बघ,
बदलले रे जग थोडे
तु थोडा येऊन तरी बघ...
बदल झाला माझ्यात ही
तु थोडा लक्ष देऊन बघ,
चौकटी सोडून मी
आनंदाने बघते जग..
बदलले रे जग आता
घे जगाचा आस्वाद कधीतरी,
स्वखुशी साठी निघून बघ
चौकटीच्या बाहेर कधीतरी...
-
राज्यघटनेचे शिल्पकार
दीन दलितांचे कैवारी,
न्याय, समानतेचे
आहात तुम्ही पुजारी...
स्पृश्य, अस्पृश्यांची शृंखला तोडून
पेटविला ज्ञानाचा दिवा,
पुन्हा तुमच्या विचारांचा प्रभाव
मना मनावर पडावा....
दीन, दलित, शेतकरी
तुम्ही झालेत त्यांचे पुढारी,
विरोधकांचे घाव झेलुनी
ना फिरले तुम्ही माघारी....
ना हिंसा
ना कुठलीही हानी,
बुद्धीच्या बळावर
चाखले चवदार तळ्याचे पाणी...
तुम्हा सारखे व्यक्तिमत्व
प्रत्येक माणसात दिसावे,
लोक कल्याणासाठी
प्रत्येक जण सदा तत्पर असावे...-
दीन दलितांचे तुम्ही कैवारी
राज्यघटनेचे तुम्ही शिल्पकारी,
न्याय, समानतेचे तुम्ही पुजारी
प्रत्येक भारतीय तुमचे आभारी....
स्पृश्य, अस्पृश्यांची शृंखला
तोडली तुम्ही देवा,
पुन्हा भारत भुमीवर
माणसामध्ये देव दिसावा....
दीन, दलित, शेतकरी
तुम्ही झालेत त्यांचे पुढारी,
विरोधकांचे घाव झेलुनी
ना फिरले तुम्ही माघारी....
विरोधकांनी केली
पाण्यासाठी आणिबाणी
तुमच्या मुळे चाखाया
मिळाले चवदार तळ्याचे पाणी...
तुम्हा सारखे व्यक्तिमत्व
प्रत्येक माणसात यावे,
स्वतःच्या अन्यायाविरुद्ध
स्वतः खंबीरपणे लढावे...-
रोगाच फक्त नाव झालंय
बसलोय घरात चरायला,
शरीरयष्टीत बिघाड झाला
पोट चालले फिरायला....
😂😂😂🤣🤣🤣-