स्री.....
स्री तू....
सबला तू...
तूझी साथ
तूच तू....
तूच तुझा आधार
कर स्वतः चा उध्दार
येईल कोणी कृष्ण म्हणून
पाहू नकोस आता वाट...
काढ शस्त्र आता...
लढण्यास हो तय्यार...
होईल प्रबोधन सक्षमीकरणाचे
वर्तमानपत्रातूनी झळकेल बातमी ही
पण कर मन तुझे धैर्यवान...
लढ तूच आता अस्तित्वासाठी
चारित्र्याची ही लढाई...
लढ तू आता खंबीरपणे.....
लढ तू आता खंबीरपणे...
- के.ज्योती
-
छंद जोपासला की ताणतणाव हलका होतो
अन् आपल्यातच दडून बस... read more
महिला दिवस..
कुठे दिसते पुरस्काराची झलक
कुठे तरी कोनाड्यात होतो अत्याचार
कुठे ऐकू येतो कौतुक सोहळा..
कुठेतरी दूरवर दारुड्याचा वळा..
कुठे समजतो भावनांचा किनारा
कुठे तरी होतो तात्पुरता निर्वाळा
कुठे साधी दखल ही नाही घेत कोणी
कुठे होते रोजचीच आयुष्याची आणीबाणी
कुठे होते वेदनांचे च अत्तर निराळे
कुठे सजतात माणूसकी चे सोहळे
कुठे गाजतात थंडाईत गोडवे
कुठे ऊन्हात उमलतात भर दुपारचे
कवडसे...
- के.ज्योती
-
रोझ डे....
रोझ डे रोझ डे
आमचा असतो
रोजच रोझ डे
संसारात असतो रोझ डे
कॉलेज कट्ट्यापेक्षा भारी..
इथे असतो रुसवा फुगवा
रोजच असते हजर स्वारी..
रोझ डे रोझ डे...
रोझ डे रोझ डे.....
इथेही असतात आणाभाका
दिल्या घेतल्या वचनांच्या...
असते इथेही भविष्याची
कितीतरी मोठी धडपड...
रोझ डे रोझ डे..
रोझ डे रोझ डे....
इथे असतो आयुष्याचा लेखाजोखा
कर्तव्य अन् जबाबदारी ची जाण...
दरवळतो सुगंध मनी रोज विचारांचा
फुलतो वसंत ही रोजच भविष्याचा...
रोझ डे रोझ डे
रोझ डे रोझ डे
आमचा असतो
रोजच रोझ डे..!!
- के. ज्योती
-
रक्षण
हे देवी!!
वेळ आली आहे आता
स्वतःच्या रक्षणाची!
क्रुरता आणि गुन्हेगारीला
संपवून टाकण्याची...!
तुझेच रुप वसे
माता भगिनी मध्ये..
अघोरी कृत्ये ही तुझ्या सोबतच कसे!!
तुला पुजिती सारे ...
मुर्ती लाच गडे...
जीव न जाणे अत्याचारी दैत्ये !!
तुझी अगाध रुपे
तुझी अगाध किमया
का अशी शांत तू ...
भक्तांना अभय दे तू!!
- के.ज्योती
-
आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन
नेहमीच तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर नेत असतो!!-
विठ्ठला...
विठ्ठला... पांडुरंगा..
तुझे नाव किती गोड//
आम्हां तुला भेटण्याची
लागली किती ही ओढ//
तुझ्या चरणाशी
मिळतो विसावा
आशिर्वाद द्याया
तत्पर तू असावा
स्पर्श होतो आमुच्या भाळी
मिटते तेंव्हा व्यथा सारी//
अबीर बुक्का लावून कपाळी
चिंता ना राहते कसली उरी//
तूच जगताचा कैवारी
तुझी आस जिव्हारी//
घेई सांभाळूनी तूच
मनी तुझीच पंढरी//
-के.ज्योती
-
पाऊस
हल्ली पाऊस आवडायला लागलाय
रिमझिम ही आणि मुसळधार ही
आधी नव्हता आवडत पण आता खूप..
पावसाशिवाय जीवन नाही...
कळलय तिला अलीकडे...
उगवणाऱ्या कोंबाना गरज आहे त्याची..
तिलाही हवाच की भिजवायला तप्त झाल्यावर..
रानावनातून खडकाळ धबधब्यातून फिरुन
रखरखत्या उन्हात ही अन् कोरड्या बारवांतूनही
फिरुन तो ही थकून जात असेल ...कळतंय तिला
म्हणूनच हल्ली पाऊस कळायला लागलाय..
तिच्यातील "ती" ला...
- के.ज्योती
-
तुझ्या प्रेमात कितीदा तरी दरवळले
मन चिंब भिजले कितीदा पावसापरी
पाऊस ही भिजतोच की स्वतः पडता पडताच
अगदी तशी...
विरघळले ही कितीदा तरी...
आतून बाहेरून तावून सुलाखून
निघाले कितीदा तरी....
तू मात्र स्तब्ध...
कारण तुला माहितीये...
ती डगमगणारी नाहिये...
धीर एकवटून विरहात ही...
प्रेम खेचून आणनारी आहे!!
-के.ज्योती
-
तुझ्या विरहात कशी असेन वगैरे
तुला काय त्याचे असे वावडे वगैरे
विश्वास नव्हता जिथे नात्यांत आपुल्या
त्या नात्याविषयी बोलणे बरे नव्हे
जातात दिवस स्मरणात अजूनही
कशाला काढू तशी तुझी आठवण वगैरे
विरह वेदनेचा तसा बरा तुझिया परी
न बोलताच कसा टाहो तुझा ओळखू वगैरे
विरहात वेडा तू होशील जरा
खरे प्रेम वगैरे तसे खिजगणतीतही कुठे तुझिया?
# के.ज्योती
-