ओल्या शुभ्र धुक्यात पानावली ही माती,
येता तुझ्या कवेत विसावली सारी नाती....!!!!-
गरजेनुसार काही माणसं
बदलतात नाती
म्हणून आपण का बदलायचं
नात्याला सांभाळत
स्वतःला सावरायचं-
कुठल्याही नात्यात माणूस दुसऱ्याला loyalty चा आरसा दाखवताना स्वतः मात्र त्या आरशात बघायच विसरतो .
खरतर नात्यात समज-गैरसमज वाद-विवाद होतच असतात, लोक मग कोणीही घ्या त्यात आपण स्वतः सुद्धा येतो, कारण आपण म्हणतो लोक असे आहेत लोक तसे आहेत ,पण इतरांसाठी पण आपण एक लोक म्हणूनच असतो, हे लक्षात घ्यायला हवे, आपण सरळ दुसर्याला दोष देऊन मोकळे होतो, काही नात्यांत कधी स्वतः साठी तर कधी कुटुंबातील आपल्या माणसांची बाजू घेऊन आणि दुसऱ्याची योग्यता काढून मोकळे पण होतो, पण कोणी हे कधीच मान्य करत नाही की आपल नाही तर, कमीतकमी आपल्या माणसांच पण काहीतरी चुकलेल असू शकेल,
दुसऱ्याकडे दोषाचे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात हे मात्र प्रत्येकजण सोयीस्कररीत्या विसरतो ..।-
कोणीतरी आपल्याला खुप आवडतं
त्याच्याशी बोलावं वाटतं, हितगुज करावं वाटतं
प्रत्येक फिलिंग शेअर करावी वाटते.
मग ती फिलिंग चिरकाल अबाधित राहील याचा
विचार करा ना ...
तो वाटणारा हवाहवासा सहवास किंवा बंध जपा ना त्याला नाव देण्यापेक्षा.....
काय पटतंय ना....???
-
ती चुकत नाही..
मुळात नाती ही पेलण्यासाठी नसतातच..
पण तरीही ती नाती सांभाळण्याचा प्रयत्न करते..-
तिरस्काराच्या शब्दांमध्ये नात्यांना बांधू नका
गाठ पडलेले नाते विनता आयुष्यात अडणार..
-
ही नाती कशी फसवणारी
कधी न बोलताच समजून घेणारी
कधी गोड बोलतं खोट , सत्य लपवायला
कधी खोटं गोड बोलती दुःख लपवण्यासाठी !!-
अव्यक्तास ही व्यक्त
होण्यास भाग पाडतो तो संवाद
जुने भेदभाव विसरून
नव्याने सुरूवात करतो तो संवाद
मैत्रीचे कोवळे फुल म्हणजे संवाद
प्रेमाची परिभाषा म्हणजे संवाद........-
नाती बनवायचीच असतील तर ती अशी बनवा की ती कशानेही तुटणार नाहीत... ते नातं जर सहजच तुटत असेल तर त्या नात्यांना तरी कुठे अर्थ उरतो...
-