नवे वर्ष नवी स्वप्न
नवे मित्र नवी बंधन
नवी मासिकं नवे लेख
नवा जन्म नवा केक
नवी नाेकरी नवे काम
नवी शाबासकी नवे नाव
नवे भाव नवेच जीवन
नवी माणसं नवेच मरण
-
जेंव्हा पहिल्यांदा पाहिल त्याला
तो आपलासा वाटू लागला मला
आता देवाकडे काय मागू
देवा फक्त एकदा भेटायचय रे त्याला ।-
डोळ्यांनी मोजले, देवा तिला मी पाहिले
आयुष्याशी सोबत तिची माझी,
जन्म कीतवा सात जन्मातला सोबती,
सांग देवा सत्यात कधी भेटुनी तरी...
#तेजस-
नवी आशा....
नवीन ध्येय ...नवी दिशा...
काहीही झालं तरी मागे हटायच नाही...
कारण आता जिंकल्या शिवाय थांबायचं नाही..✌😎
-
उगवता सूर्य रोज नवी दिशा देतो.....🌞
स्वप्नपूर्ती करण्याची क्षमता पुरवतो......
अंधारानंतरचा प्रत्येक दिवस ....🌃
नवी नवी स्फूर्ती देतो...आणि
एक दिवस शिखरावर पोहचशील....👍
असा आत्मविश्वास देतो🌝-
नवी सुरूवात
नवीन दिशा
नवीन पंखाना
नवीन आशा
नवी उमेद सारी
उंच उंच भरारी
नव्या आकांक्षेला
नवीन किनारी
नव्या क्षितीजास
नव्याने गवसणी
नव्या पंखात
नव बळ लेऊनी
वा-यावर होऊन स्वार
क्षितिजावर आरुड
आणू पाडून पदरात
चंद्र सुर्य अन् चांदण
नवीन उमेद मनात
करू नवी सुरूवात-
एक नवी सुरुवात नव्या स्वप्नांची
जिद्दीने त्यासाठी क्षणोक्षण लढण्याची
एक नवी सुरुवात नवीन वाटा शोधण्याची
अंधारलेल्या क्षणांतून पुन्हा उमेदीने उभारण्याची
एक नवी सुरुवात आसमंत उजळवण्याची
चरांचरांत प्रकाश तेजोमय करण्यासाठी
एक नवी सुरुवात हरवलेले क्षण पुन्हा जगण्याची
आनंदाच्या डोहात यशोशिखरे सर करण्याची
- अश्विनी मोहिते-
करूया नवीन सुरवात
नैराशेचा करून त्याग
अंगी घेऊन एकच ध्यास
दुःखाची लावून विल्हेवाट
घेऊन येऊ नवी पहाट
चंद्राच्या त्या चांद्रप्रकाशनी
कोवळ्या त्या स्पर्शानी
फुलून येई जणू रातराणी
घेऊन नवी आयुष्याची गाणी
करूया नवीन सुरवात
सत्याची या धरून कास
अनुभवाची रचून रास
सुख येई अंगणी
फुलवून दाही दीशांनी-