सुत्रधार तु जगाचा, पालनहार श्री गुरूदेव दत्ता
भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ दत्त दिंगबरा नाथा....
सकळ जनाचा तुची दाता ,चरणी ठेवितो तुझिया माथा
ञिगुणात्मक दत्त दिगंबर अवतार श्री गुरूदत्ता......
.....sm.borse✍️-
🙏🏻🌼।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌼🙏🏻
दत्त दर्शनाची लागली आस || १ ||
दत्त माझा श्वास दत्त माझा ध्यास || धृ ||
.
.
.
.
.
पूर्ण 🌸अष्टम पद पुष्प🌸 कृपया अनुशीर्षकात 🙏🏻
- ©श्रीरुप
- Dr. Rupali-
ध्यानी मनी चित्ती मुखी घेतले रे नाम
दत्तगुरूरायाचे लागले रे ध्यान
दत्त दत्त दत्त ऐसे लागले रे ध्यान ||धृ||
दत्तगुरूंच्या नामाचा जडलासे ध्यास
गुरूदर्शनाची लागलीसे आस ||१||
दत्त दत्त दत्त ऐसे लागले रे ध्यान ||धृ||
चराचरी सर्वत्र होतसे आभास
साद देता प्रकटता की हा असे भास ||२||
दत्त दत्त दत्त.......॥धृ॥
गुणगान गाता हरखले मन
त्रिमूर्ती पाहता हरपले भान
दत्त दत्त दत्त.........॥धृ॥
गुरूपदी तुम्ही असता काय आम्हा घोर
कृपा छायेत रिपूंचा न चाले जोर ||४||
दत्त दत्त दत्त.........॥धृ॥
ध्यानी मनी चित्ती मुखी घेतले रे नाम
दत्तगुरूरायाचे लागले रे ध्यान
दत्त दत्त दत्त ऐसे लागले रे ध्यान ||धृ||
- © श्रीरूप.
- Dr.Rupali-
कुछ ख़्वाबों की आदत होती है,
सोते हुए को भी आंसुओ से भीगो देना..-
शिकवितो जो जगण्या चा सार
तोच तू एक आमुचा आधार
तु शिकवितो आम्हा
कशा करावा भवसागर पार
तुझ विन नाही आमुचा उद्धार
आयुष्यात पडते प्रश्न हजार
त्या प्रत्येक प्रश्न आतून
सोडवणारा तूच एक आमुचा निर्धार
गुरूपौर्णिमेच्या_हार्दिक_शुभेच्छा...💐
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||-
तू दत्त तूच दिगंबर
तू वट तूच औदुंबर,
तूही अल्लाह तू पैगंबर
तुझ्या चरणी झुकते हे धरती अंबर।-
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त तू एक ध्यान
अंतरी तुझ्या त्रैलोक्याची जाण ll
नाथांचा तू नाथ
अनाथांचा एक तात l
तुझे चिंतन असे आत्मानंद
तोडी जन्ममृत्युचे बंध l
मनोहर रुप तुझे सुरेख सुकुमार
ब्रह्मा-विष्णु-महेश इथे नांदती अपरंपार l
तू गुरुंचा सद्गुरू
नेई पैलतीरी भवसागराचे तारूl
वास तुझा नित्य निरंतर,
ठायी तुझ्या ब्रह्मांडाचे सारl
कारंज्यात प्रगटले प्रभूंचे दूत
भुक्ती मुक्ती साकार स्मरता अवधूत!
(To be continued)-
गुरुदेव दत्ता। राहो माझे सदा।
ध्यान तव पदा। लागोनिया।।
भक्तांचा सांभाळ। करी वेळोवेळी।
विकारांची होळी। करीतसे।।
नानाविध रूपे। धरोनिया देहीं।
एकतत्त्व पाही। सर्वां भुता।।
घोर कलियुगी। होता निराधार।
एकच आधार। दत्त गुरू।।
सगुण निर्गुण। लागेना तो ठाव।
जैसा ज्याचा भाव। भजे तुला।।
ज्ञान भक्ती कर्म। योग जरी तीन।
तुझ्या कृपेविन। व्यर्थ सारे।।
जप तप ध्यान। अति ते कठीण।
नामे हो तल्लीन। मन माझे।।
होता तव कृपा। जळे पाप ताप।
लागे आपोआप। छंद तुझा।।
असावा मस्तकी। तुझाच आशिष।
आणिक विशेष। काही नको।।-
॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
दत्त गुरू म्हणावे की स्वामी।
समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती।।
औदुंबर की कल्पतरू।
दीन दुःखितांचा कैवारू।।
श्री स्वामी कृपेची शक्ती अपार।
माऊली सोबत असल्याचा आधार।।
भीती कश्याची जेव्हा
दत्त उभा पाठीशी।
जीवन आणि समाधी
म्हणजे दत्त गुरूंची कुशी।।
आई पण तेच आणि वडीलही तेच।
चराचरात वसणारे
अदृश्य सांगातीही तेच।।-