QUOTES ON #जिजाऊ

#जिजाऊ quotes

Trending | Latest
12 JAN 2022 AT 10:21

माता तु अखंड स्वराज्याची..
शिल्पकार तु शहाजीराजेंच्या स्वप्नांची..
प्रेरणा,उर्जास्थान तु शिवबाची..
तलवार तु आई भवानी ची..
पुत्रसमान काळजी तुला रयतेची..
लिहिली सुवर्ण अक्षरे तु मराठा साम्राज्याची..
अशी लाडकी तु माऊली रयतेच्या राज्याची...

-


17 JAN 2019 AT 14:58

जिजाऊंचे संस्कार..,
प्रेम, जिव्हाळा, ममता
आणि आपुलकी..,

आमच्या छत्रपती
शिवरायांची राजनीति,

मावळ्यांची माणुसकी..,

शंभूराजांचे शौर्य..,
न्याय-नीती,

माणुसकीला पोषक
असणाऱ्या रीती,

माणसाला माणसासारखे
वागवणारी संस्कृती..!!

-



असुनही तू एक स्त्री
मनाने खूप बलवान होती
न घाबरता मरणाला कधी
जगावे फक्त हेच तू सांगत होती

होतीस तू कर्तबगार नि
कर्तव्यदक्ष जाधवांची लेक
ठसविला मनात तू कायम
त्यांचा चांगला विचार प्रत्येक

निष्ठा स्वराज्याप्रति मनी
नव्हता स्वार्थाचा भाव कुठे
होऊन प्रेरित विचाराने तुझ्या
झोपलेला प्रत्येकजण आज उठे

करतो जोडून दोन्ही कर
आऊसाहेब मुजरा तुमच्या चरणी
असेल माझा जन्म मातोश्री
तुम्ही केलेल्या उपकारांचा ऋणी.

-



थोर ती जिजाऊ माता...
जिची अपरंपार गाथा...
दिली शिवबास तलवार...
होण्या स्वराज्यावर स्वार...
लावूनी शब्दांची धार...
शत्रूंचे झेलण्या वार...
केला शिवबा तयार...
अशी ही शिवबा माता...
अशी ही धन्य जिजाऊ माता...

-


12 JAN 2021 AT 7:56

धगधगती मशाल जिजाऊ
महाराष्ट्राचा साज तु,
मराठमोळा बाणा होता
तळपती तलवार तु,
रणरागिणीचे रुप जणू
आम्हांसाठी माउली तु,
अंधाललेल्या समाजासाठी
तेजस्वी किरण तु,
शिवबांच्या आगोदर माता
ह्रदयात आमच्या तु,
संस्कारांची खाण होतीस
पवित्र मातीतील तु,
विचारांनी लढलीस इथे
शौर्याची गाथा तु,
चरणी माथा तुझ्या
महाराष्ट्राची जिजाऊ तु...
हिंदवी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन🙏
✍️कुमारी- आकांक्षा काळे

-


19 FEB 2020 AT 17:16

आजचा दिवस १९ फेब्रुवारी लाखो
युवकांच्या मनात नुसते घर करून
नाही तर शूरवीर शिवरायांच्या
मावळ्यांसारखा आपल्या
रगारगात रक्त सळसळते,
अशा या सर्व शिवभक्तांनो तुम्हाला
माहिती आहेच की हा शूरवीर वाघ
कसा बनला-
' संस्कार '
आणि सर्व शिवकन्यांनो ही जादूची
छडी आपल्या हाती आहे, असे
शिवाजी महाराज नाही कमीतकमी
शिवाजी महाराजांचा मावळे तर
जरूर निर्माण करू शकतो.
हे आदर्शमय तर आहेच त्याशिवाय
रोज उठून अन्याय अत्याचार ऐकायला
लागतो ना त्याला आळा घालण्यासाठी
हाच एक परिपुर्ण उपाय आहे.

-


8 AUG 2019 AT 21:40

छावा तू जिजाऊचा
स्वराज्याचा घेतला ध्यास
मूठभर मावळ्यासोबतीने
रचला नवा इतिहास

-


6 JUN 2019 AT 7:59

आज माझ्या देवाचा राज्याभिषेक सोहळा
आजही नाव घेतल की सळसळतं हे रक्त

देव असा एकच जो
माणसांच्या रुपात येऊनही आहे अमर...

कठोर शिस्त आणि प्रखर अशी वाणी
मुखात जणू होती आई भवानी...

मुठभर सवंगडी अन पाठीशी आईसाहेब होत्या
म्हणून तर शत्रु थरथर कापे बघुन शिवबा ला माझ्या...

राजनितीचे जनक प्रजेचे रक्षक
ना जिवाची भिती ना मनी कोणताही लोभ...

रायरेश्वरात घडले स्वराज्य
होते मावळे काही सोबत...

राजे तुम्ही नसता तर आजही गुलाम असतो
तुमचा आदर्श ठेवून तर जगतो ताठ मान करुन..

-


17 JUN 2020 AT 11:00

लाख वर्षे लोटूनी जातील मॉ साहेब
तरीही तुमची सर पुन्हा येणार नाही,
जोवर ना येणार जन्मास आपण पुन्हा
तोवर पुन्हा "छत्रपती" ही घडणे नाही...

राजमाता मॉ साहेब जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा....

जय जिजाऊ जय शिवराय...

©अमित भांडे.

-


12 JAN 2020 AT 8:13

छत्रपती जन्माला येण्यासाठी,
आधी जिजाऊ घडवाव्या लागतात..!

-