प्रेयसीच्या नादात उध्वस्त केले मी स्वतःला
परिस्तिथी नसताना देखील नेले तिला फिरायला
पुरवले तिचे प्रत्येक हट्ट तोड मोड करून जीवाला
पण घुसमट मनातली माझ्या मी सांगू तरी कोणाला....??
ती निघेल अशी धोकेबाज माहिती नव्हतं मला
तिच्या अश्या वागण्याने मोठा धक्का बसला मनाला
अशा दुःखात माझ्या कोणीही नव्हतं मला सावरायला
मग घुसमट मनातली माझ्या मी सांगू तरी कोणाला....??
तिच्यासाठी तडफत होतो कधी कळलेच नाही तिला
गेली ती पळून दुसऱ्यासोबत सोडून मला एकट्याला
जणू माझ्या प्रेमाचे मोल कधी कळलेच नसावे तिला
पण घुसमट मनातली माझ्या मी सांगू तरी कोणाला....??
आयुष्य संपल्यासारख वाटत होतं बघून एकटं स्वतःला
आयुष्याची नवी सुरुवात करावी समझावलं होतं मनाला
जोमाने अभ्यास करून अधिकारी होऊन जळवायचं होतं तिला
अधिकारी तर झालो पण घुसमट मनातली माझ्या मी सांगू तरी कोणाला....??-
ब-याच वर्षापूर्वीची कथा कशी सांगावी तुम्हांला माझी व्यथा?
माझे तिच्यावर प्रेम होते नजरभेटींचे शतक झाले होते
माझ्या भावना प्रेमपत्री कैद मला तिला सांगण्याची ओढ
पण तिचा पत्र घेण्यास नकार तिच्या मैत्रिणीची विनंती बेकार
'मला असे दृश्य दाखव की जेथे धरती-आकाशाची पार्श्वभूमी नाही '
तिचा स्वर आदळत होता कानी असे दृश्य जन्मात दिसेल नयनी?
तिला दुसरी नवी वाट दिसली माझी रात्र मात्र आसवांत भिजली
वार्षिकांकी पत्राला प्रसिध्दी मिळाली कवीच्या जन्माची कथा सुरू झाली
घुसमट मनातली माझ्या अलगद बाहेर उमटली
दुख-या जखमेची खपली हलकेच रक्तबंबाळ झाली.-
शब्दांतून तुजला कशी
सांगायची आता
डोळ्यातीलअश्रुतूनच
फक्त व्यक्त होतील आता
मज अंतरीची व्यथा
कोणास सांगायची आता ?-
घुसमट मनातली माझ्या सांगू कोणाला,
हृदयातील भावना बोलून दाखऊ कोणाला...
मनातील विचारांना लेखणी चा आधार,
तीच आहे आता जीवनाची सार...
-
घुसमट माझ्या मनातली
सतत सलत राहायची.
वेदना होत असूनही
व्यक्त नाही व्हायची.
अबोल व्हायचे ओठ
भावनांची गर्दी व्हायची.
आतल्याआत कोंडी मनाची
पापणी मात्र ओली असायची.
घुसमट माझ्या मनातली
ऐकायला मैत्रीण मिळाली.
कोऱ्या कागदावर उतरून
कविता माझी सजायची.
घुसमट कधी झाली तरी
कविता आणखीच फुलायची.
कागद ,पेन आणि मी
कवितेत मन रिक्त करायची.-