वाटते रे भीती
काय सांगू तुला...
काय होते रे स्थिती
हे माहित माझेच मला...
मित्रांसोबत फिरू नको
असे म्हणायचे नाही मला...
पण त्यांच्या सोबत ड्रींक
करताना नाही पहावणार रे मला...
तुला कदाचित येईल ही राग
माझ्या सार्या बोलण्याचा...
पण थोडा तरी विचार कर
या भिणार्या माझ्या काळजाचा...
रोज काही तू पीत नाहीस
हे मला आहे रे माहित...
पण तुझ्या या कधीतरी पिण्याच्या सवयीचे
होईल व्यसन म्हणूनच आहे रे मी भीत...
तु स्वतःच्या नाहीतर मुलांच्या
भविष्याचा तर कर रे विचार...
बाकी काय तू आहेस सूज्ञ
विचार करून तुझा तूच ठरवं आचार...
वाटते किती भीती काय सांगू तुला...
सारेच रे माहित माझेच मला...
-
नुसतीच काळजी
घेऊ नका ...
वार करतील त्या
' सावल्या ' बघा..!
बाधित होण
गुन्हा नव्हे..
अंगावर कश्या
' धावल्या ' बघा..!
वार करतील त्या ' सावल्या ' बघा..!
-
तिच्यात मी पाहिला...!
शेवटच्या खिडकीमधून प्रवास चाललेला..
स्वप्न रंगी बेरंगी खिडकी बाहेर प्रवास हरवलेला ..!
अनोख्या नावाप्रमाणे ती ,सोबत जवळ बसलेली...
दोघांच्याही प्रश्नांना चाहूल उत्तराची..
अशी मैत्री झाली आमुची, एकमेकांची काही क्षणांची...!
नात तस एवढं घट्ट नव्हतं, सार टाईमपास म्हणून चाललं होत...
शब्दांची जशी गमत होत होती, शब्द कमी हसूच फार होत...!
सारखं हसन बाहेर बघणं, दोघंही पूर्णतः दंग झालो...
लहानापासून किस्से भारी, सांगताना हरवून गेलो...!
उशीर झाला वेळ झाली, आजूबाजूची मर्यादा होती..
लाजारलो आणि बावरालो, निरोप देण्याची घाई होती...!
जातांना हळू आवाजात, शुभ रात्री आणि बाय केला..
नकळत तिच्या नाजुक डोळ्यात, माझ्या मनाचा मी पाहिला...!
-
काळजी घ्या आणि काळजी करा. कारण काळजीने मनाला धिर आणि समोरच्या व्यक्तीला पाठिंबा भासत असतो, म्हणून स्वतः ची आणि इतरांची काळजी घ्या...
-
घ्या काळजी देहाची
राखा शरिर संपत्ती
सुदृढ ;निरोगी देह असता
नसेल कशाचीच भिती .-
काळजी तीच आहे तु सोबत नसताना ही कायम सोबत असतोस एकटे पणात ही प्रत्येक क्षणी साथ करतोस
-
आलाया कोरोना।
घे सखे काळजी।
गर्दीच्या ठिकाणी।
जाऊ नको।।
लाव मास्क मुखी।
नेहमीच साठी।
हात धूत राही।
साबनाने।।
शेक हँड नको।
नमस्कार कर।
ठेव तू अंतर ।
प्राण्यांच्या ।।
डोळे नाक तोंडी।
नको हात लावू।
स्वच्छते कडे तू।
दे लक्ष ग ।।
फक्त काळजी घे।
भिऊ नकोस तू।
संसर्ग टाळ तू ।
कोरोनाचा ।।-