प्रत्यक्षात जे भेटायचे,आता आठवणीत ठरले...
कधी उसासे सोडले उशाशी कधी हुंदके भरले...-
दाटून आलेलं आभाळ
काही सांगू पाहात होतं
मनात साचलेले हुंदके
मोकळे करु पाहात होतं
- के.ज्योती
-
तुझं हसणं मला जगण्याची उमेद देत,
पण हरलेल्या त्या क्षणांचे हुंदके मात्र जीव घेत,
आठवणींच्या जोरावर बांधते मी नात्याचे हे धागे,
आजही जपते मी ते विरलेले नाते...-
हुंदके
पसारीत असे विचार ते शब्दविस्तार घडवतात
दाटी कोणती ती जी खरी भावना उमटवतात
अबोल शब्द न बोलता घोळवतात
मुके ते बोल एकदातरी हुंदके उठवतात-
“आई" या एकमेव शब्दापुढे
कठोरातला कठोर व्यक्तिसुद्धा
क्षणार्धात हळवां होऊन जातो
अन् आठवणींचे हुंदके फोडतो.-
बंध खोलु नका मित्रांनो ...
माझ्या या मनाचे,
काही हुंदके येथे लपविलेले ..
अन् काही उसासे..!-
अशीच असते रोज आमुची सकाळ अन संध्याकाळ
वाहत जाते पाणी अन् मेघांची गर्दी फार...
हिरावाईवर स्वैर हिंडती मेघांचे पुंजके
कोठून येति नभाला हे अगणित हुंदके...!!
©____नित-