🌹रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
बेरंग तो नहीं जिंदगी मेरी
पर तेरे रंग में रंगने को
दिल करता है...
कुछ तो कमी है रंग में मेरे
तेरे रंग में घुलने को
दिल करता है....
©___नित-
साजरे करूया | संगतीने सण |
संस्कृतीचे धन | वाटोनिया ||
संकल्पाची नवी | उभारून गुढी |
मनातली आढी | घालवुया ||
कडुलिंब पान | करुनी सेवन |
त्यागू तमोगुण | कायमचे ||
साखरेची गोडी | जिभेवरी नित |
साऱ्यांशीच प्रीत | बहरेल ||
©___नित-
का कुठूनसा यावा मेघ
गडद काळ्या रंगाचा
हरवून जाव्या रिमझिम धारा
सुगंध मातीच्या अंगाचा
©___नित-
चंद्राजवळच्या चांदनीच
अंतर जवळ दिसतं खरं...
दोघांची भेट होण्या मात्र
अजून अवकाश आहे बरं...!
©___नित-
अंतरातल्या प्रीतीचे
किती पुरावे देऊ शब्दाने...
सीमा ठरत नसते आकाशाची
क्षितीजाच्या ओळीने...
©___नित-
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
सण उत्सव परंपरा
धरावा त्याचा छंद
वागुया जनहितार्थ
जपू सृष्टी नि तिचे रंग
साजरावे वर्ष नवे
हर्षाने उभारावी गुढी
मायमराठी हिंदू आपुली
संस्कृतीची गोडी
©___नित-
नाविन्य समुद्रमंथनापरी, प्रगटे विषामृत दोन्ही ।
निळकंठ कळोनी यावे, प्राशन करावे जाणुनी ।
©___नित-
दिवस सरलेला निवांत...
अन्....
नेहमीच अपूर्ण असलेली
चांदण्यात भिजलेली
रात त्याच्याशी हरलेली
धुके पांघरून निजलेली
काही क्षणात भिजलेली
गोंजारते पहाट जेव्हा
एका कुशीवर वळलेली
फडफड भिजल्या पंखांची
गीत गात्या पाखरांची
ऐकून धुंद झालेली
प्रीत बहरुन आलेली
पानं वेली न्हालेली
फुलं सुगंधी फुललेली
काही गळून पडलेली
म्हणे स्वागता झडलेली
दिवसा लाली चढलेली
रात्र पुन्हा हरलेली
©___नित (नितेश पाटील)-
क्षितिजावर एक दिवा मावळताना दिसतो
उजेडाशी आपले नाते डावलताना दिसतो
©___नित-
रंग सकाळ-सांजचा
हरवून गेला धुक्यात
की पळसफुलांनी चोरला
ती मिरवत बसली रानात
©___नित-