QUOTES ON #सिंधुताई_सपकाळ

#सिंधुताई_सपकाळ quotes

Trending | Latest
4 JAN 2022 AT 23:21

प्रिय सिंधुताई.. ,
हजारो-लाखो अनाथांच्या आई

जिचं होतं निस्वार्थ प्रेम प्रत्येकावर
आयुष्याला सजवलं तिने स्वबळावर ...

पोरक्याला तिने आपलंसं केलं
भरकटत असलेल्यांनाही तिने जगवलं...

स्वतःचा विचार न करता तिनं,
दुखी कष्टी गोरगरिबांना जोपासलं..

चिंधी नावाच्या मुलीने केवढं कर्तृत्व घडवलं,
हजारो अनाथांना सांभाळलं ....

तिच्या प्रेमाची ज्योत आजही कायम तेवती,
प्रत्येक मुलांच्या काळजातील सिंधुताई
आजही या जगात आहे कुठेतरी ...

प्रणाली ओमप्रकाश चौधरी...

-


4 JAN 2022 AT 23:39

Netralipi

-


5 JAN 2022 AT 9:50


आज तत्वांची माणसं आपल्या तून जात आहेत, पाठीमागं आपल्या अफाट विचार सोडून त्या तत्वाला,विचाराला आपण जपलं पाहिजे.. अनाथांची आई अन तुमची आमची माई...अनाथांची आई अन तुमची आमची माई...
मातृत्वाचं एकमेव प्रेमळ ठिकाण जर आई असलं तर त्या माई... संघर्ष काय असतो ते या...एक घास पण वाटून खाणाऱ्या...प्रेमाचं भांडार असलेल्या आणी आयुष्य भर अनाथां साठी देह झिजवणाऱ्याआपल्या माईला भावपुर्ण श्रद्धांजली💐😞🙏

-


4 JAN 2022 AT 22:49

माई तू देवाच्या दारी शांतपणे निजली असशील
तुझ्या पदराच्या छत्राखाली असणारी कितीतरी लेकर
आज धाय मोकलून रडत असतील...
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🙏😭

-


5 JAN 2022 AT 12:04

कविता - सिंधुताई सपकाळ

जिला भेटली नाही मायेची सावली
ती झाली अनाथांची माऊली

जिला भेटला नाही कधी आधार
बनली ती लाखोंची मूलाधार

पोटच्या पोरीला केल तिने दान
लाखोंना सांभाळण्याची घेतली तिने आन

गमवायला निघालेली स्वतः चं प्राण
दिलं आहे तिने लाखोंना जीवन दान

नव्हता तिला राहण्याचा विसावा
तरी अनेकांना तिने हिमतीने दिला दिलासा

हिमतीने जगण्याचा दिला तिने सल्ला
सगळ्यांच्या मनात तिने जागा केल्या

पद्मश्री ने सन्मानित झालेली माई
सगळ्यां जना ती पोरकी करून गेली

कवयित्री - सईदा पठाण - कुरणे
05-01-2022

-


5 JAN 2022 AT 7:11

अनाथांनी तिच्यात "आई" पाहिली,
ममततेची ती सावली झाली.

स्व.सिंधुताई सपकाळ यांना भावपुर्ण श्रद्धांजली

-


4 JAN 2022 AT 23:28

....

-