नजरेतील प्रेेमरंग ...
नजरेने घायाळ तुझ्या मन असे झाले
की अनमोल शब्दांना ही मोल न राहिले.
तु माझ्या अन् मी तुझ्या डोळ्यात असे काय पाहिले,
की मलाच माझे भान न राहिले.
नजरेला सवय झाली तुझ्या निरागस चेहऱ्याची,
की असावी वाटे सोबत तुझी आयुष्यभराची,
तुझ्या स्मित हास्याचे वार असे झाले,
की तुझ्यासाठीच मन माझे वेडावले,
जादु अशी तुझ्या नजरेची माझ्यावर, त
की मन गुनगुणत राहिले प्रेमाचे स्वर.
नजरेने सुर-लय-ताल असे जुळले,
की प्रेम गीतात काळीज रंगूनी गेले.
सावरून तुझ्या नजरेने असे मला घेतले,
की हृदयाचे माझ्या घाव भरून आले.
तुझ्या निरागसतेची काय सांगावी दैना,
की तु नजरेस दिसतास मला काहीच सुचेना...
-
विठू माझा सावळा उभा विटेवरी,
आषाढीच्या सणाला धावला भक्तांपरी..
संसार सारा तुझ्यात गुंतला,
तुझ्यात आहे आसमंत रंगला...
ध्यान भजनात गुंग झाले भक्तगण,
आनंदाने सजला हा आषाढीचा सण...
रिंगण खेळता विठू तुझ्या दारी,
तू ही पाहिली ना ही गर्दी सारी...
पंढरीस येण्याचा ध्यास सर्वास लागला,
विठू तुझ्या दारी हा सोहळा सजला....
प्रणाली ओमप्रकाश चौधरी..
-
कोल्हापूरचे रहिवासी शिवरायांचे वशंज शाहूमहाराज
केली तुम्ही जीवापाड दिनदुबळ्यांची रयतेची सेवा,
राजाज्ञा घेऊन केला स्त्री शिक्षणाचा केला प्रसार
लोकराजा दलित पतीतांचा उद्गारक पांग तुझा कसा फेडावा...
कु .प्रणाली ओमप्रकाश चौधरी
वाशिम-
शीर्षक - मन माझे बावरे
जीव हा कावरा बावरा होत असे,
मन हे बावरे तुझ्याच साठी कसे...
प्रश्न मज हा का पडत असे,
तुझ्याच हृदयात का जीव माझा वसे...
कु.प्रणाली ओमप्रकाश चौधरी
वाशिम-
:- जिवलग*
*शीर्षक: मैञी तुझी माझी*
वाहतो झरा जसा निखळ पाण्याचा
मैत्री तुझी माझी तशी असावी,
जिवलग या नात्याला नसावे ऋण काही
खळखळणाऱ्या पाण्याप्रमाणे अथांग उसळत राहावी....
कु.प्रणाली ओमप्रकाश चौधरी-
नारीशक्ती
कर्तुत्वाने तुझ्या घरात रांगोळी सजली
नारी शक्तीने आज सारी पृथ्वी उमलली,
जगात ठायी वसे तिचीच शक्ती
ऋण तिचे फेडताना सारीसृष्टीही झुकली...
-
गीत गात होते गुणगुणत सुन्न झाले क्षण
आठवणींच्या या पसार्यात उडू लागले मन,
पंख आठवणींचे गिरीक्या घेत फिरू लागले
चित्र नवे पहाताना स्तब्ध हे झाले तन....
-
शब्द हे हसले,
शब्द हे रूसले
शब्द गीत
गुणगुणत सुटले....
शब्द मनातले
फार काळ टिकले
मनातील भावनांना
शहारे फुटले...
शब्दातून शब्दातले
भाव मांडताना,
शब्दांचे शब्दांसवे
ताल हे जुडले...
-
जिंदा रहने का ख्याब तेरा
एक दिन वही मर गया ,
अपनेही जब सवाल उठाए
तो जिंदगीका पहया हल गया...
तुझे आगे बढ़ना है हर
ख्वाईश सफल करनी है,
युही डर कर मत रहना
तुझे मंजिल से आगे निकलना है...
सारे दुःख को चूर कर
जिंदगीका पहया बदलना है,
डर को दूर भगाकर
अपनी पहचान बनानी है...
जफ पुरे होगे सपने तेरे
ना रहेगी कभी नाराजगी,
उडते हुये परो को फैलकर करना
सफर बोलना फिर क्या थी ये जिंदगी...
आयेंगे लाख रोकने वाले
पर तु मत कभी रुकना,
दिन रात एक कर बस
अपने सपना मे व्यस्त रहना...-
सुन्न होऊन कधी मन शांत राहत नाही,
एकांतात राहून मन हलके होत नाही...
मन बोलते कीती ते कधी सत्यही नसावे,
माञ मग एकांतातही नवे शब्द फुटावे....-