पळपळ
जगण्याला 'शाप' म्हणून,
जबाबदारी च 'माप' आहे...
रोज काहीतरी 'बोध' म्हणुन,
सुखाचा इथे 'शोध' आहे...
कुठे भरलेल 'ताट' आहे,
तर कुठे भुकेचीच 'वाट' आहे...
काहीतरी मिळवायची 'तळमळ' आहे, म्
हणुन रोजचीच आता 'पळपळ' आहे..
-Bhagirath-
पटल
जीवनाच्या पटलावर
बेधडक चालायचं असत,
येणाऱ्या अडचणींना तिथल्या
तिथेच ठेचायचं असत....
तेच तेच दळण
दळायच नसतं,
नाविण्याला नवं
चैतन्य द्यायचं असत...
आयुष्य नावाचं पुस्तकं
वाचताना जगन नावाचं
प्रकरण विसरायचं नसतं,
आल एखाद खराब पान
म्हणून सगळं पुस्तकं
कधी फाडायचं नसतं
-भगीरथ-
क्षण आपल्या दोन देहांचे
मुक्या मुक्या शब्दातले,
माझ्या अंगी शहारा आणि
हसू तूझ्या ओठातले,
घट्ट घट्ट मिठीतले क्षण
आपल्या दोघांचे,
निसटते शब्द कानातले
आणि उरात वादळे श्वासांचे.
गुलाबाचं फुल काटेरी
सुगंधातले जशी तु ,
ना सोडू ना तोडू शकतो जशी तु.
सप्तरंगी स्वप्न
आपल्या दोघांचे,
तुझी स्पंदने असणाऱ्या
माझ्या श्वासाचे...
✍️भगीरथ
-
75 वर्ष अनेक बदलांची, नवीन विचारांची, अनेक संकटाची - भ्याड हल्ल्याची त्यातून सावरलेल्या शौर्याची, अनेक विक्रमांची अटकेपार मिळवलेल्या यशाची.... स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
-Bhagirath-
वाद-विवाद, मतभेद, संशय हे प्रेमाच्या हि-याला पडलेले पैलु आहेत
-
आपल्या असण्याची 'जाणीव'
नसल्याची 'ऊणीव' ज्या व्यक्तीला
जानवत नाही, ती व्यक्ती 'आप'ली असते
आपली नसते.-
हर रोज यहॉं एक नया दंगा है,
रोज एक रंग का दुसरे रंग से पंगा है,
फिर भी बसती दिलों मे एक चिज
जो शान से लहराता 'तिरंगा' है !-