दुःखाने मला सोडले नाही,
आणि
मी दुःखात हसणे सोडले नाही.. 😊-
Love writing 📝
विदर्भ कन्या ❤️
👉भावना मनातल्या..
👉प्रेम...
👉विश्वास....
👉नात... read more
कडेवर हात ठेवलास
उभा आहेस तु विटेवरी...
अशीच राहु दे तुझी
कृपा विठूराया आमच्या वरी... !!
-
आपल्या जीवनात आपण किती कठोर आहोत
हे आपलं वय सांगत नाही,तर ते सांगून जाते ती
जबाबदारी...-
जगायचं मात्र राहून गेलं...☺️
लहान होते मी तेव्हा बोट धरून
चालायला शिकवल होत बाबा तुम्ही,
मोठ्या हातात माझं छोटंस बोट धरून
लिहायला शिकवलं होत तुम्ही,
पण कामाच्या गडबडीत खूप काही
शिकायचं मात्र राहून राहून गेलं....
शिक्षणासाठी तुमच्यापासून दूर राहत होते मी,
पण कधी दूर असल्याचा भास होऊ नाही दिला तुम्ही,
सारखी आमची काळजी असायची तुमच्या मनी,
स्वतःचा विचार न करता आमच्यासाठी कष्ट करायचे तुम्ही,
पण तुमचा विचार करायचा मात्र राहून गेलं...
नेहमी एकच सांगायचे तुम्ही,
अभ्यास करून खूप मोठं व्हायचं आहे बाई तुला,
खूप उंच उडायचं आहे तुला,असं म्हणायचे तुम्ही
पण परिस्थिती समोर झुकता झुकता,
उंच उडायचं मात्र राहून गेलं...
मोठं होऊन फिरायला जायचं होत,
छोट्या गोष्टींचा आनंद अनुभवयाचा होत,
आणि खूप काही पाहायचं होत आपण सोबत,
पण आता जाऊ नंतर जाऊ असं करता करता,
आनंद अनुभवायचा मात्र राहून गेलं...
परिस्थिती वाईट होती पण कधी हार मानली नाही,
कारण शिकवण तुमची होती म्हणून जिकंत आले मी,
पुस्तकाच्या आयुष्यात जिंकता आला मला,
पण आयुष्याच्या वळणावर जिंकायचं मात्र राहून गेलं...
दिवसामागून दिवस गेले, कधी वाईट तर कधी चांगले आले,
जगावं कसं हे तुम्ही शिकवलं
परिस्थिती ला समोर कसं जायचं हे तुम्ही शिकवलं, पण या सर्व शिकण्यात
आणि शिकवण्यात तुमच्या
सोबत जगायचं मात्र राहूनच गेलं...😞
-
दिवाळीचा दिवा अंगणी ठेवला
प्रकाश त्याचा कसा उजळला,
अंधकारावर विजय मिळवी
ज्योत प्रकाशाची अंगण खुलवी,
रांगोळी ठेवण्यादिवा असा नेई
दाही दिशामध्येरोषणाई येई,
लख्ख प्रकाशानेदुनिया सजली
नवचैतन्याची पहाट दिसली,
आनंद आणतोदिवाळीचा सण
रोषणी दिव्याचीप्रफुल्लीत मन,
सुंदर दिवाळी आनंद आणते
बंध हे नात्याचेछान फुलवते...
-
बाबा...😥
आज ना खूप काही बोलावंसं वाटतयं,
तुम्हांला खूप काही सांगावंसं वाटतयं,
खूप दिवस झाले ना बाबा पलगावर झोपून
बोला ना माझ्यासॊबत एकदा तरी उठून,😞
प्रत्येक वेळी तुम्हीच मला सावरलं
रडताना मला तुम्हीच आवरलं,
खूपदा वाटते बाबा की
तुमच्या मिठीत येऊन खूप रडावं,
पण ते तुम्हांला समजेल
म्हणून म्हणते स्वतःला की मोकळ हसावं,
सहवासातून तुमच्या खूप काही शिकले
तुम्ही सांगितले म्हणून कधीच नाही पडले,
आता गेलात तुम्ही सगळं काही सोडून😭😭
तुमच्या प्रेमाने ठेवलं आम्हांला बांधून
माहिती नाही बाबा पुढे काय दिवस येतील,
एक मात्र नक्की सांगते की तुम्ही
दूर असूनही आपण सगळे
एकमेकांच्या सोबत राहतील....🤗😍-
चैत्र पौर्णिमेला अंजनी उदरी,
सूर्योदय वेळी शिव अवतारी,
श्रीरामा चा दास सर्वशक्तिमान
हृदयी वसवी राम सीता मान... 🙏🏻
🙏🏻जय हनुमान 🙏🏻-
आयुष्यातील जुनी पुस्तकं
मला उघडायला
आवडतं नाही,
कारण त्यात फक्त
दुःखच लिहिले होते...-
दिवा लागो तुमच्या दारी,
नाहीसा होवो अंधार तो
दुःखाचा, संकटांचा,
उजळून जावो वाटा त्या
सुखाच्या, समृद्धीच्या, वैभवाच्या
आणि विकासाच्या,
याच माझ्या आणि माझ्या
कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
✨♥️😍-
जिंदगी... 🖤
होगी मुश्किल हर राह पर
पर तेरी खामोशी रंग लायेगी,
क्यों सता रही है तू ऐ जिंदगी
तेरी तो हर पल याद आयेगी....।।-