😌एक सवय माझी😌
😃ज्या मुलीचं पोट तिच्या बाबासोबत जेवण केल्यानी भरत असेल😃,
मग तुम्ही विचारही करू शकत नाही की प्रेम किती असणार त्या बापाचं आपल्या मुलीवर.....
😎जिच्या एका झोपेसाठी रात्र-रात्र भर जगला तो बाप माझा.....😎
आजही कधी झोप नाही लागली तर मला माझ्या बाबांच्या कुशीची गरज असते; त्या मऊ कापसाच्या कुशीवर तर कुणीही झोपते पण मी नाहीच.....
😌म्हणून आजही मला कुशी घेऊन झोप लागत नाही.😌-
ही तुझी सवय आहे का..
हे तुझ्यावरचं प्रेम...
तेच कळलं नाही रे कधी....-
ओढ तुझ्या भेटीची काही केल्या जात नाही.. दिवसभर बोलूनही मन माझे भरत नाही..
सवय झालीय तुझी काही केल्या मोडत नाही.. सवयीला ही आता तुझ्या शियाव करमत नाही..,😊😊-
" माणसाला परिस्थितीशी जुळुन
घेण्याची सवय लागली आहे ,
कारण माणसाला सवय लावून
घेण्याची सवय लागली आहे "
-
या जगात आणलेस तू मला
विविध प्रकारे घडवू लागलीस तू मला
तू असण्याची सवय लावलीस मला
देवा दूर नको करू या मायलेकराला-
सवय झाली आता आठवणींना
आपलंस करुन जगण्याची...
येणा-या प्रत्येक क्षणांना
हसत सामोरं जाण्याची...
आयुष्याचा प्रत्येक खेळ
सामंजस्यान खेळण्याची...
मनांच्या भिंतीला कुठंतरी
अलगद सावरण्याची...
मोडले कितीदा तरी पुन्हा
नव्या उमेदीने लढण्याची...
-काव्यामृत
-
आवडती
सवय
नावडती
सवय
छान छान
सवय
घाण घाण
सवय
सांभाळून घेणारी
सवय
तुसडेपणाची
सवय
सवय
काय चांगली
काय वाईट ?
येते समजून
सवय झाल्यावर-
का नको म्हटलं
तरी मनात साचून
राहतयं सखे तुझ्या
आठवणीचं वलय...
आणि काढायचं नाही
म्हटलं तरी तुझ्या
आठवणींनाही आता
सारखी लागलीयं
माझ्या आठवणीत
यायचीचं सवय...-