Harshali Ubale  
181 Followers · 64 Following

read more
Joined 29 March 2019


read more
Joined 29 March 2019
17 JUN 2020 AT 19:44

आपल नात साखरे सारखं गोड नसावं
थोडयाशा रुसव्या फुगव्याने भरलेलं असावं
माझ्या रागावर तुझ मला मनवण असाव
तुझ्या दुःखच कारण मी नसावं
मला आनंद मिळवा म्हणून तूझ हारण नसावं
तुझा रुसवा असल्यास माझ्या डोळ्यात पाणी असावं
एकमेकांना सांभाळून आयुष्य सुखाच असाव
पण तुझ्या विना आयुष माझ नसावं

-


25 SEP 2021 AT 21:08

ध्येय तुझे खूप मोठे
मागे वळून तू पाहू नकोस..
अपयश तर येतच राहतात
रडत तू बसू नकोस..

विचार फक्त ध्येयाचाच
गुंतून एकीकडे राहू नकोस..
स्वप्न तुझे सत्यात आण तू
बडबड करत राहू नकोस..

जाणीव तुला कर्तव्याची
सकारात्मक कायम रहा तू..
प्रयत्न अथक करून
उंच भरारी घे तू....

Harahali ubale

-


25 SEP 2021 AT 20:03

तू सोबत नसताना ही
तुझ्यासवे जगणं ,
तुला कळणार नाही
प्रेमाचं हे वागणं...

तुझा विचार प्रत्येक
क्षण करणं,
तुला कळणार नाही
प्रेमात स्वतःला विसरण...

तुझ्यावर हक्क दाखवून
तुझी काळजी घेणं
तुला कळणार नाही
प्रेमात वेड होणं ...

हर्षाली उबाळे



-


5 SEP 2021 AT 17:23

कवडसे माझ्या मनाचे
आज नव्याने उलघडत आहे
काही गोड आठवणी, काही
जुन्या जखमा अश्रू डोळ्यात आणत आहे

बंद मनात धुळीने केले राज्य
पुन्हा झटकून नव्याने सुरुवात करत आहे
मनाचे पान कोरे परत एकदा
आनंदाने लिहीत आहे


-


20 AUG 2021 AT 18:28

काव्य तुझे आहे तुझी ओळख😇
आनंद आणि हसू आहे तुझी पारख🤞
घेतोस सर्वांना तू समजून कायम❤️
गोड तुझ्या स्वभावाने जिंकतोस सर्वांचे मन💕
वाढदिवसाच्या आभाळाइतक्या शुभेच्छा दादू 🥳🎂

Harshali ubale

-


13 JUL 2021 AT 13:21

आवडतो की तुलाही माझा सहवास
मात्र बोलून कधी दाखवत नाहीस...
आवडत की तुलाही चहा आणि मनसोक्त गप्पा
मात्र वेळ कधी तू काढत नाहीस...
आवडत ना तुला ही निखळ आनंद घ्यायला
माञ कर्तव्य तुला सोडवत नाही...
आवडत की तुला ही दूर दूर फिरणं
मात्र आवड तुझी तू दाखवत नाहीस...

-


11 JUL 2021 AT 15:03

नसतोस तू जवळी
तरी आभास तुझा छळतो...
वेड्या या मनाला
तुझाच ध्यास असतो...

-


17 JUN 2021 AT 18:08

कळले नाही मला..
कधी दुरावले मी माझ्याच माणसांपासून
यशाकडे झेपावताना मला
वेळच नाही मिळाला प्रिय नात्यांसाठी

छोट्यातून आनंद निर्माण करणारी मी
स्पर्धेच्या जगात अडकून बसले
वेड्यासारखी हसणारी मी
एकांताची गुलाम झाले

कळलेच नाही मला
कधी मी माझ्यापासूनच दूर गेले
माझ्यातल्या लहान मुलीला
मी कशी काय विसरून गेले

Harshali ubale

-


4 JUN 2021 AT 18:57

प्रेम मनापासून केले😍
दोघांनी समजून उमजून निभवले🤗
घरच्यांनी लग्न जातीमुळे मोडले💔
प्रेमवेड्या दोन जीवांना विरहाने दूर नेले....☝️

Harshali uable

-


4 JUN 2021 AT 12:09

मोठमोठ्या घरापेक्षा
माणसांनी भरलेले कुटुंब असावे..
कितीही दूर गेलो तरी
घराची आठवण मनी रुजावी..

वेड्यासारखे स्वप्नामागे धावणाऱ्याला
आपल्या हक्काच्या माणसाची सोबत मिळावी..
थकून भागून घरी आल्यावर
स्वागताला आपली माणसं असावी

-


Fetching Harshali Ubale Quotes