झरा आटत चालला,
झरा आटत चालला
अजूनही बरेच दिवस होते उन्हाळ्याला
पाणी जणू बिलगले तापलेल्या धरणीला
कधी पुरात वाहवणारा पाऊस असा दुष्काळात लपलेला
थेंबाथेंबासाठी इथं प्रत्येक जीव तरसलेला
घशाला कोरड सुखाला मुरड भेगा पडल्या पायाला
पोरं नि पिकांची काळजी जाळतेय इथं मनाला
घरधनीण रोजच हात लावे कपाळाला
आलिया भोगासी सादर दोष देई नशीबाला
आणखी एक नवा विषय सापडला राजकारणाला
पाण्यासंगे माणुसकीही गेली काय रसातळाला
-
शक्ति और सिद्धांत आजकल की राजनीति में एक झूठी चमक है।
येनकेन प्रकारेण अब सबके अन्दर सिर्फ सत्ता की ललक है।-
कधी हे टिका करणार, कधी ते विरोध करणार, राजकारणच ते चालायचचं.
पण हे सर्व नात्यांमध्ये नसावं धरसोड करत एकमेकांना समजून घेण्याची जाण असावी ..।-
कधी कोणाशी नाते आम्ही' जोडलेच' नाही..
मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी' पावलेच' नाही..
संकट म्हणता मान्य आहे..कोण म्हणत....? काळजी ' घेतलीच ' नाही..
मतदानासाठी बस मोफत धावली. त्याशिवाय शाही
बोटाला ' लागलीच' नाही..
मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी' पावलेच ' नाही..-
बरसत्या वरुणाला पाहून..
उभा झाला 80 वर्षाचा तरुणं...
गेले साथीदार सर्व..
घ्यायला सत्तेचे गाजर...
मग प्रसंग पाहता पाहता ..
आकाशालाही फुटला असावा हा पाझर....!
(वरूण =पाऊस)-
"फसवा गोड चेहरा त्यांचा,
मतांसाठी धावत असतो..
पुन्हा तोंडघशी पडणारे,
आपण त्यांचे सावज असतो."-
माझे पण कडवट शब्द ज्यात थोडी लाज आहे तुमच्या राजकारणात काय माहित किती उरली...
खाली नक्की वाचा आणि comment द्या ...
पसरली पाहिजे ही कविता प्रत्येक जागी त्या निर्जीव खुर्ची जवळ तरी ....
-
सत्तेचं राजकारण...
क्षणाक्षणाला बदलतंय इथे सत्तेचं राजकारण,
जनता मात्र बघतेय त्यांच्याकडे आस लावून...
या सत्तेच्या दावेदारांना नाही कुणाचं सोयरसुतक,
ओल्या दुष्काळात शेतकरी होरपळतोय आणि महागाईने नागरिक झालाय त्रस्त...
प्रत्येक जण राजकारणात स्वतःची भाजतोय पोळी,
एका राजाला दुसरा राजा शह देण्यासाठी खेळतोय बुद्धीबळाची खेळी...
बळ आणि बुद्धीचा कस लावतोय इथे प्रत्येक जण
काळजी नाही यात सामान्य जनतेची,
आहे फक्त धडपड स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याची...
-
चुलीत गेलं ते राजकारण
नका वैरी होऊ एकमेकांचे विनाकारण....
राजकारण असतो फक्त सत्तेचा खेळ
इथ खर तर कुणाचाच कुणाला नसतो मेळ.....
सत्तेसाठी असतात फक्त खोटी आश्वासन
पोकळ गप्पा असतात फक्त यांची ही भाषण .....
सर्वसामान्य जनता भरडली जाते याच्यात
सत्ता न पैसा मात्र राजकारण्यांच्या खिशात.....
नका बळी पडू यांच्या वरवर दिखाव्याला
सोडा हा नाद आणि लागा आपल्या उद्योग धंद्याला....-