आला श्रावण श्रावण, घेऊन छटा हिरवळीच्या
शेत शिवार फुललं, मनी आनंद बळीच्या
सारा श्रावण महिना, आध्यात्मिक गूढ काळ
रितीरिवाज पाहुणे, ऊन पावसाचा खेळ
गेला आषाढ निघून, आला श्रावणाचा मास
निसर्गाने बहरून, केले स्वागतही खास
श्रावणाच्या गूढ सरी, बरसती मनोमनी
कधी ऊन उबदार, कधी पावसात भिजुनी
शिवमहिमा घेऊन, उभा राहतो श्रावण
सारे ठाकले ध्यानस्थ, झाले पतितपावन
श्रावणधारा जणु काही, अंगारा उदी विभुती
झेलून तनामना वर, होई ईश्वरी अनुभूती-
Writer - Poet - Classical Singer by Passion ✍️
Contact No. 7021... read more
स्मरले कधी न मजला, मांडू कशी व्यथा मी
दिसते हसू जगाला, भांडू कधी कसा मी?
एकेक शब्द माझा, जोडत जरी मी गेलो
गोडी अपुर्णतेची, फोडू तरी कसा मी?
देऊन त्रास त्यांनी, केला बरा कयास
कोडी मी घातलेली, उलगडू तरी कसा मी?
केला जरी मी काही, सांभाळण्याचा प्रयत्न
नाती तरी विखुरली, जोडू कधी कसा मी?
पाऊल तरीही अपुले, मागे मी घेऊ म्हणतो
गेले दुर दुर त्यांना, ओढू तरी कसा मी?-
तुमची नीतीमत्ता कितीही चांगली असो.
तुम्ही कोणाचेही पैसे लुबाडून खाल्ले नसतील.
तुम्ही कोणाचीही घरे जमिनी लाटल्या नसतील.
तुम्ही आजवर अनेकांना गरजेला मदत केली असेल.
तुम्हाला नेहमी सर्वांची प्रगती होवो असे वाटत असेल.
तुम्हाला नेहमी सर्वजण सुखी असावे असे वाटत असेल.
तरीही कुठेतरी अशी माणसं असतात ज्यांना तुम्ही खुपत असता आणि तुमचं वाईट व्हावं असं त्यांना वाटत असतं, आणि तसं काही चुकून वाईट घडलंच तर त्याची खिल्ली उडवून ते त्यातुन आसुरी आनंद घेत असतात.-
या भ्रमात कधी राहु नका की
तुमच्या सल्ल्याने ते खोटेपणा सोडतील,
तुमच्या मागे लबाड माणसं बघा
तुमच्या नावानेच पुन्हा बोटे मोडतील !-
मोहब्बत की कसमें खानेवालीने
कुछ युं रिश्ता तोड दिया था,
प्यारके रास्तेपर लाकर अचानक
मरने के लिए छोड दिया था !-
सब कुछ सिखा दिया था उसकी बेवफाई ने
रिश्ता भी वो हमेशा सही नहीं लगता था,
उसकी इसी बातपर यकीन कर बैठा था कि
मुझसे दुर रहके उसका दिल नहीं लगता था !-
पुस्तकं बरीच वाचली असशील, कधीतरी मला वाचुन बघ ना,
माझ्या मनातील प्रेमाची फुलं, गजऱ्यासाठी वेचुन बघ ना !-
समुद्रात कितीही साखर ओतली
तरी ते पाणी गोड बनू शकत नाही,
स्वार्थी लोकांना कितीही आपलेसे करा
पण आपुलकीची ओढ बनू शकत नाही.-
अब जिन्दगी भी हैरान है
खोएं हुएं रास्तें मिल रहे है,
सींचनेपर भी मर रहे पौधे पर
बिना पानिके फुल खिल रहे है !-
ऐसा लगा था ये मोहब्बत
अब हद से गुजरनेवाली है,
उस वक्त सोचा नहीं था
ये बेवफाई करनेवाली है !-