मुलगी
हट्ट करणारी पण कशाचा हट्ट करावा हे ठाऊक असणारी
बाहेरून कठोर पण आतून अगदी प्रेमळ
नारळासारखेच गुण असणारी
कधी एखाद्याला प्रेमानी समजवणारी
तर कधी योग्य रीतीने समाचार घेणारी
वेळ आल्यावर जगदंबेच रूप घेणारी
भाऊ बहिणींवर प्रेमाचा वर्षाव करणारी
लग्न होईपर्यंत काळजाचा तुकडा बनून राहणारी
माहेरच्या आठवणी मनात साठवूनी
बालपणीच घर त्यागून नवीन आयुष्य सुरु करणारी
नंतरही अधून मधून सर्वांची विचारपुस करणारी
दाखवायला अगदी कणखर आणि निर्भिड
पण आतून अगदी मायाळू आणि हळवी असणारी
वेळ आली तर सर्व घराची जबाबदारी उचलणारी
कुणी दुःखी कष्टी असलेलं पाहवत नाही हिला
सर्वाचे भले कर एवढेच मागते ही फक्त देवाला
आईनंतर प्रेमाचा अमर्याद असा झरा
देवाने बनवलेला करुणेचा पुतळा खरा-
मुलींनो आई-वडिलांच्या सुखाच्या शालित
खुप थोडे दिवस तुम्हाला रहायचय...
एक ना एक दिवस ती सुखाची शाल सोडुन
तुम्हाला ही परक्याच्या घरी जायचय...
लहानपणीच्या खोट्या भातुकलीच्या खेळातून बाहेर येऊन
भातुकलीच्या खऱ्या खेळाचा मेळ तुम्हाला बसवायचाय...
नवीन बागेत एक नवीन रोपट लावून त्याच्या फुलांचा
सुगंध तिथे तुम्हाला पसरवायचाय...
सूर्यासम कधी तापलीस अंधारात कधी घाबरलीस
तरीही संसाराचा गाडा तुमचा तुम्हालाच पुढे हाकायचाय...
तुमच्यातल्या गृहिणीच्या दागिन्याची पॉलिश गेली
तरीही तुम्हाला तोच दागिना पॉलिश करुन परत घालायचाय...-
सासूबाई हे दूसरे मातेचे रूप असावे
बाबांची मूर्ती ही सासऱ्यांत वसावे
नणद जेठाणी ही ताई अन दिर जेठ हा भाऊ व्हावे
आकाश व्हावे वेडेपिसे आईचे मन जसे मंदीरागत दिसे
माहेरी जसा छळ नसे मनी शीळ आनंदी भासे
असे काहिसे माहेरागत असावे सासरचे वासे
-
सोनू नेहमी पेक्षा या वाढदिवसाला खूप आंनदी दिसली.
आईने सुखावून तिला विचारलं "काय गिफ्ट हवे सोनू आज? "
आईला मिठीत घेत नी अश्रू लपवत ती म्हणाली "नको आई काही, आज बाबा आलेले स्वप्नात....!"-
मुलगी म्हणून जगताना अनेक येतात अडथळे,
कितीही प्रामाणिक वागलं तरी बघतात विचित्र नजरेने.
मनमोकळेपणाने वागले तर लावतात आगाऊ पणाचा टॅग,
मिळूनमिसळून राहिले तर कितीही मुलगी फ्रॅंक.
पुढे पुढे काय करतेस जरा मर्यादेतच तू वाग,
जास्त काही बोलू नकोस तू जरा अबोलाच राख.
वाटत मला निडर होऊन सर्वांना भिडाव,
अनेक माझी स्वप्न, उंच उंच उडाव.
आईबाबांना अभिमान वाटावा अस काहीतरी बनाव,
तूच आमचा मुलगा अस त्यांनी मग म्हणावं.
कधी कधी लोकांच्या बोलण्याने
मन जात माझं खचून,
पण दुःखाचा बाऊ न करता मी जाते हसून.
मुलगी म्हणून जगताना थोडं समजून घ्या,
पुढे जाण्यास तिला फक्त प्रोत्साहन द्या.
_✍️पूजा शामराव देसाई-
बेटा....तुझ्या इवल्याश्या हातात
माझ्या साऱ्या जीवनाचे सार आहे..
तू म्हणजे विधात्याने दिलेली एक
लक्ष्मीरूपातील अमूल्य भेट आहे..-