मनामध्ये दाटलेल्या विचारांना मुक्तपणे फुलवायचय ,
दाटलेल्या नभाखाली बिनदास्त उभा राहायचंय ,
पावसाची भीती न बाळगता ,
आठवणीत तुझ्या चिंब भिजायचंय ...
मला तुला काहीतरी सांगायचंय ,
डगमगलेल्या "मी" ला एकाकी सावरायचंय ,
न खचता जीवनात एक मोठं धाडस करायचंय ,
काल परवा परिस्थितीवर बोलणार्यांना ,
भविष्यात गप्प तेवढं करायचंय ...
मला तुला काहीतरी सांगायचंय ,
तुझं माझ्या आयुष्यातून लवकर
जाण मला पचवायचंय,
पोरकं होऊन उरलेला आयुष्यं जगायचंय ,
मातृप्रेमाच न लाभलेलं बाळकडू
एकदा मात्र चाखायचंय ...
-
मन दचकलच पण आल भानात
कोणी ते सावरलेही क्षणात ।
तू माझी नव्हतीस कदाचीत
आज ते जानवल मनात ।
वाटत कधी भास होता मनात
पण चांगले झाले बदलाव स्वतःत ।
मी तुला गमावलं आयुष्यात
कारण तुझी जागा नव्हती या ह्रदयात ।-
तुला रोज जरी पाहिले
रिती रोज तरी राहिले...
सांगू कुणा कुणास इथे
घाव जे जे मी साहिले...
टाकीचे घाव सोसूसी
सुखाचे गीत गायिले...
जे माझे म्हणून होते
ते सर्वच तुला वाहिले...
जिद्दीने मिळविले सारे
आणि मला मीच तारिले...-
देख तुला इंसाफ की, आज रही है डोल
राजनीति बाजार में, प्राणों का ना मोल
-
मला तुला काहीतरी सांगायचंय,
तुझ्याजवळ येऊन मला तुझं मन हलकं करायचंय,
न बोलताच तुझ्याशी सारख बोलत बसायचंय,
माझ्या मनातलं प्रेम एक ना एक दिवस तुला सांगायचंय,
आज ही तो दिवस उजाडला स्वप्नांत मी तुझा चेहरा पहिला,
समोर आलीस तेव्हा मी माझ्या मनात तुझा चेहरा कोरला,
धीट मनाने तुझ्या समोर जायचा धीर केला,
बोलताना माझा तोल त्या जमिनीवर गेला,
किती दिवस एकटं जगायचं,
प्रेमाच्या विश्वात एक ना एक दिवस तुला माझ्या मनातलं सांगायचंय.-
शब्दांचा श्वास माझ्या, तुझा भास आहे,
कवितेचा आत्मा माझ्या, तुझा सहवास आहे.
यमक बाजूला केलस की कळेल तुला,
तुझ्या माझ्या प्रत्येक आठवणींचा प्रवास आहे.-
मन माझं जरासं का होईना पण गोंधळलं होतं
जेव्हा पहिल्यांदा मी तुला बघितलं होतं
समजत नव्हतं नेमकं काय मला जाणवत होतं
वाटलं नव्हतं ते प्रेम नावाचं वेड होतं
तुझ्याही डोळ्यांत ते सहज दिसत होतं
जेव्हा पहिल्यांदा मी तुला बघितलं होतं
भेट ती पहिलीच पण योगायोगानं
का कसं ते माहिती नाही पण
मन माझं तुझ्यावरचमोहलं होतं
चेहरयावर ते तुझं गोड हसू मला एकदमच आवडलं होतं
आठवतंय मला चांगलंच मी तेव्हाच माझं ह्रदय तुला सोपलं होतं
जेव्हा पहिल्यांदा मी तुला बघितलं होतं
-
प्रेम के कमरे में जाने से पहले
उतार देने होते हैं,
अहम रूपी राजा के वस्त्र और आभूषण।
जानते हो न,
सूर्य भी तुला राशि में जाकर
नीच का हो जाता है।-