करे जो वफा, जफा न कभी
करे प्यार जो, दफा न कभी
कोई साथ दे या की ना दे बराबर
वो चलता रहे साथ लेकर सभी
आये तुफां भी न भयभीत हो
लढे मुश्किलों से सदा जीत हो
उसे डर नहीं इश्क़ जिसकी इबादत
वो चले जिस जगह हर जगह प्रीत हो
उसे द्वेष की परिभाषा ना समझे
विवादों में वो रत्तीभर भी ना उलझें
समंदर के गहराइयों सी मुहब्बत
नही कुछ जहां में जो उससे न सुलझे
उसे इल्म है बात है गौरतलब
उसे इश्क़ से इश्क़ से बस सबब-
एक चित्त, एक ध्यास, एक धर्म आमचा
रंगरूप कोणता असो की गंध आमचा
भेदभावना, विकार त्यागुनी जगायचे
हाच छंद, हाच ताल, हाच राग आमचा
जल, नदी, हवा जशी तशीच मुक्त पाखरे
वेस कोणती, कुठे... न पाहती नभाचरे
सिद्ध या जगी करू अनेकतेत एकता
हीच ओळखी पुरे अम्हास... भारतीयता
एक छत्र, एक कंठ, एक बंध आमचा
हाच छंद, हाच ताल, हाच राग आमचा
आसमंत तोच अन् वसुंधरा समान जर
आपसामधेच का दरी... त्वरे निःपात कर
माणसात वावरू बनून छान माणसे
वागणे सुशील माणसास शोभुनी दिसे
वारसा उदात्त चालवू अखंड आमचा
हाच छंद, हाच ताल, हाच राग आमचा
छल, कपट, घृणा मुळासवेच नष्ट होउनी
प्रेम एकमात्र बीज काळजात पेरुनी
चेतवू मनामधे उदंड प्रीत भावना
द्वेष कोणता नको, नको कुटील कामना
भाव लीन प्रार्थनेत एक सूर आमचा
हाच छंद, हाच ताल, हाच राग आमचा-
का अशी मायूस व्हावित काळजाची स्पंदने
होउनी खंबीर लढ तू जीवनाचे सामने
संकटे आली कितीही थांबुनी चालेल का
मार्ग कुठलाही स्वतः हुन सांग ना गवसेल का
मोकळे कर दु:ख अन् भर स्फुर्ततेचे चांदणे
मिट्ट काळोखातही बघ चालती ते काजवे
हो स्वतःचा सारथी.. का ओघळावी आसवे
दुःख अन् चिंता करुन हाती न काही लागणे
जीवनाची मेख सारी फूल वा काटे कधी
तू सदा निर्मळ मनाने जा पुढे काट्यातुनी
ध्यास जर कणखर उद्या निश्चित आहे जिंकणे-
जो भी हो वजह ...मुस्कुराते है
काॅफी है बस्स ...जीने के लिए-
प्रेमात पडणे हा गुन्हा नसला जरी
अपराध केल्यासारखे जग वागते-
बशर है देखता क़ातिल निगाहों से मुझे
न जाने दिल में उसके चल रही हैं बात क्या-
तिरी आशिकी ने किया वो असर
महकने लगे अब ये शामों सहर
जहाॅं देखती हूॅं, तुम्हें देखती हूॅं
तुम्ही तुम बसे हो मैं देखूॅं जिधर
मुतल्लिक़ नहीं मैं किसी भी जहाॅं से
तुम्हें सोचती हूॅं पहर दर पहर
मिलाई नज़र जो तिरी एक नज़र से
मिलाई नही फ़िर किसी से नज़र
बड़ी तिश्नगी से तुम्हें चाहती हूॅं
बुझा दो इसे या के दे दो ज़हर
मिरी ज़िन्दगी की यही बस कहानी
शुरू भी तुम्ही से, ख़तम भी तुम्ही पर-
#प्रिया_लिहू_मी_.....
प्रिया लिहू मी काय कळेना पत्रामध्ये
किती चालली धडधड नुसती हृदयामध्ये
शब्द सुचेना, लिहायचे तर पुष्कळ काही
मनातले पण कागदावरी उतरत नाही
बावरते मी, गोंधळते अन् होते त्राही
लागे ना मन तुझ्यावाचुनी कशात काही
फुटतो लावा नसेल जितका प्रलयामध्ये
किती चालली धडधड नुसती हृदयामध्ये
पेन घेतली हातामध्ये, लिहिते काही
हाय! मायना काय लिहावा अडते शाई
प्रिया लिहू की सख्या मनाला उमगत नाही
किती चिटोरे झाले फाडुन हिशेब नाही
दाटुन येते मेघांची सर डोळ्यांमध्ये
किती चालली धडधड नुसती हृदयामध्ये
उडण्याचे बळ मला लाभले असते जर का
क्षणात आले असते जवळी उडून बरं का
गढून जाते विचारात या मीच कैकदा
भानावरती आल्यावर मग होतो विचका
तुला वगळुनी उरेल काही माझ्यामध्ये?
किती चालली धडधड नुसती हृदयामध्ये-
कसा बांध घालू मनाला कळेना
मनाचीच इच्छा मनाला फळेना
उतावीळ झाले तुला भेटण्याला
पुढे मात्र ही वेळ पळता पळेना
निभावून नेते दिवस मी कसाही
करावे कसे? रात्र ढळता ढळेना
तुला कैद केले उराशीच माझ्या
अताशा दुरावा जराही छळेना
तुझ्या मलमलीचे धुके वेचल्यावर
असे सुख मिळाले...जरा काजळेना
ध्रुवाहून भारी तुझे ते अढळपण
तुझ्यावाचुनी मन कुठेही वळेना-