QUOTES ON #जागतिक

#जागतिक quotes

Trending | Latest
9 AUG 2020 AT 9:51

🏹जय आदिवासी 🏹
हमे अभिमान है की हम आदिवासी है क्यूकी हम इस धरती के मूलनिवासी है ...
हमारी अपनी एक संस्कृती है, हमारी अपनी एक भाषा है, हम किसी पर आश्रीत नहीं है..
हमारा अपना वजुद है, आदिवासी ना तो आस्तिक है ना तो नास्तिक है आदिवासी एक वास्तविकता है...
🏹💐जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐 🏹
✍️an🙏

-



स्त्रीच्या पाठीशी खंबीर उभा राहतो
आई-वडील दोन्ही भुमिकांचे संतुलन राखतो
घराचा आधारवड हा पुरूष असतो
त्याच्या वाचून आयुष्यला अर्थ कळत नसतो....

आईच्या पोटी जन्माला येतो
वंशाचा दिवा म्हणून नावाला येतो
सगळेच सारखे नसतात हे पुरूष
तो सगळ्यांना सोबत घेऊन किर्तीरूपे दिवे सजवतो....

भाऊ म्हणून बहिणीला कधी प्रोत्साहन देतो
बंधू म्हणून भावाला कायम साथ देतो
मुलगा म्हणून आईच्या कुशीची ऊब जाणतो
पुत्र म्हणून वडीलांच्या कष्टाची जाण ठेवतो....

असा हा पुरूष सदैव सोबत असतो
तो नसला कि त्याची उणीव भासवतो
त्याच्या शिवाय आयुष्य बेचव वाटत
खंबीर पणे ढाल त्याच्यारुपाने आपल्याला आहे प्राप्त..
#जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😊✨

-क्रांती शेलार

-


7 APR 2022 AT 9:32

घ्या काळजी देहाची
राखा शरिर संपत्ती
सुदृढ ;निरोगी देह असता
नसेल कशाचीच भिती .

-


11 OCT 2020 AT 13:55

जागतीक कन्या दिवस

लेक माझी लाडाची...

लेक माझी लाडाची
गृहलक्ष्मी ती माझ्या घरची...
तिच्या जन्माने आली
माझ्या घरी लक्ष्मी सोनपावलाची...

तिच्या जन्माने घरी
सुखी वैभव जिवनात आले...
आनंदाचे लोट घरात पसरे
लेक माझी अंगणी गाणे गायले...
✍Avishkarilekhani

-


23 APR 2022 AT 17:31

करता समाजमाध्यमाशी गट्टी
पुस्तकांनी एकजात केली कट्टी.

इन्टरनेटची हवा डोक्यात गेली
पुस्तके मोठ्या खोक्यात गेली.

बोटांना बटनांची सवय लागली
पानांना मग स्पर्श आस लागली.

पुस्तके देण्याघेण्याचे न जमले
वेडे सर्व तांत्रीक जगतात रमले.

पुस्तकांवरती कित्ती धूळ साचली
आम्ही सहजतेनं ती ई बुकं वाचली.

सायबर कॅफेकडं पावलं वळली
पुस्तकांची किंमत केव्हा कळली.

..पौर्णिमा

-


8 MAR 2020 AT 7:20

Good morning all of you

Yq परिवारातील माझ्या सर्व कवयित्री सख्यांना महिला दिनाच्या
आभाळ भरून शुभेच्छा💐🌼🌼
08.03.2020🙏✍️

-


22 MAR 2020 AT 15:35

आज जीवनाचे मोल कळाले
म्हणूनच तुला जीवन हे नाव मिळाले
काटकसरीने तुला वापरावे लागेल
नसता तुझ्याविना रे पाण्या आमचं कस भागेल ?
22.03.2020...💦💦💦💦आज जलदिन

-


23 APR 2021 AT 11:41

पुस्तकेच काही वाचलेली
मी मनात जपली होती...
आकाशीच जणु मी झेप घेतली होती
देऊनही मला पंख, पुस्तके
जमिनीवरच होती..
दिले मला ज्ञान ज्यांनी
त्यावर आज धुळ पडली होती...


-


20 MAR 2020 AT 18:31

इवलासा जीव सकाळीच
तिच्या गोड चिव चिविने
जागवतो मला
रोज माझ्या चिमण्या दाणे
टिपायला नी पाणी प्यायला
उठवतात मला
20.03.2020..✍️

-



चिऊताई....

चिव चिव चिमणी चिऊताई
गोड गोड तुझीच गाणी
उंच आकाशी झेप घेई
पिल्लांसाठी दाणा पाणी

चिव चिव चिमणी चिऊताई
चिमण पाखरांची तुच राणी
रानी वनी दूरदूर जाई
घरट्यासाठी काड्या आणी

चिव चिव चिमणी चिऊताई
येगं राणी माझ्या अंगणी
झाडे लावली पाखरां साठी
नको जाऊ दूरवर गगनी

चिव चिव चिमणी चिऊताई
चिमणा चिमणी राघो मैना
सदैव नांदो सुखात वाढो
नको करू गं आमची दैना

चिव चिव चिमणी चिऊताई
चिऊताई ला भेटण्याची मलाच घाई

शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक

-