माझ्या ओठातील शब्दांनी
तुझ्या हृदयाचे गीत गावे
मंद धुंद ताऱ्यांसमवेत
प्रेम रसात न्हावून निघावे
-
हे जगणे गाणे व्हावे
आनंदाचे तराणे व्हावे
स्वप्नी तुझे येणे-जाणे व्हावे
तुझ्या भेटीचे बहाणे व्हावे
दिसता तू गोड हसणे व्हावे
प्रेमात रोज फसणे व्हावे
तक्रारीचा आता लवलेश नको
सौख्य आपले गं शहाणे व्हावे
बहाण्याने कशाला भेट व्हावी
पावसात प्रीतीच्या नहाणे व्हावे
संजय गुरव
-
माझे मजसी गवसावे,
अन मीच मला उमजावे.....
ईंद्रधनुपरि सप्तरंगी मी व्हावे,
हळुवार सरींनी धरेस भिजवून टाकावे.....
दिवसा मी ऊन व्हावे,
सांजेस चांदण्यांसवे बागडावे.....
असे माझे जगणे लखलखून उजळावे,
रात्रीचे तमही प्रकाशाने लख्ख व्हावे......-
हे जगणे गाणे व्हावे,आनंदाचे तराने व्हावे..
संकटाला देऊन आव्हानाचे उत्तर..
जगण्याची ती जिद्द असावी अमर्याद निरंतर..
दुःख उरी कवटाळूनी परि ओठांवर हसू असावे खरे..
दवा व्हावे कुणाच्यातरी जखमेवरी.
दुवा व्हावे कुणाच्यातरी मनी अंतरी...
रडतच येतो जो तो या जगी, परि
जगताना असे जगावे ही जगणेच गाणे व्हावे..
आपली आठवण येता गालावरती स्मितहास्य तरावे..
असे आपण साऱ्यांचे आनंदाचे तराने व्हावे....-
जगून घे असं काही
आता पुन्हा जगणे नाही
गेलेले क्षण परतीचे
अनुभवणे पुन्हा नाही...
जगण्याच्या वाटेवरचे
आपण सारे प्रवासी
भरून घ्यावी ओंजळ
सुखदुःखाच्या फुलांनी...
मनातल्या स्वप्नांना सप्तरंगी
बहरलेली बाग द्यावी
मनमुराद जगताना आयुष्य
कटू-गोड अनुभवांची शिदोरी चाखावी...
जपून ठेवावी माणुसकी
नात्यांची ही वीण जपावी
नाही उरत काही सरतेशेवटी
प्रेमाची उधळण आयुष्यावर करावी...
जन्म एकदाच रे मानवा
नको असा घालवू वाया
झिजून चंदनापरी आयुष्याला
दरवळ गंधमय फुलांचा द्यावा...-
जगून घे दिवस आजचा
तो कधी परत येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!
तारे नभातले मिटल्यावर डोळे
तमा शिवाय काहीच दिसणे नाही!
कर प्रत्येक क्षण हसरा तुझा
गेलेला क्षण परत येणे नाही!!
आलेल्या संधीचे सोने कर
तो सोनेरी क्षण पुन्हा येणे नाही!
नको जाऊ बुडून स्वार्थात
स्वार्थातून बाहेर कधी पडणे नाही!!
छोट्या छोट्या गोष्टीत हसायला शिक
रडताना कधी हसू ओठी येणे नाही!
नको मरणाची वाट धरू
पुन्हा हे जगणे नाही!!-
तुरा शिरावर माझ्या बाप रोज स्वप्न पाहतो,
प्रेरणेचा ध्यास अंगी रोज प्रयत्न शिल राहतो...!
कर कसाही योग्य मार्ग सुखकर तो सांगतो,
मी पुन्हा नव्या दमाने काळजीने जागतो...!
-
पुन्हा जगणे नाही
आयुष्य किती कोणाचे ते माहीत नाही
त्यामुळं येणारा प्रत्येक क्षण तू जगून घे
आत्ताच मोकळेपणानं पोटभर तू हसून घे..
चुकलं असेल कुणाचं काही तर माफ करून टाक
मनातला राग रुसवा काय असेल ते सार काढून टाक
आलेल्या संधीच तू सोन कर
यश मिळेल न मिळेल तू फक्त प्रयत्न कर
वाईट बोलून कुणाला कधी दुखवू नको
स्वतःच्या स्वार्थासाठी कधी दुसऱ्याचे वाईट करू नको
मिळूनमिसळून रहा सर्वांशी तू प्रेमाने
तोडू नकोस कुणाची मन तू द्वेषाने
आयुष्याचा प्रत्येक क्षण शेवटचा समजून तू भरभरून जग
तुझ्या प्रेमळ या स्वभावानं साऱ्यांची मन जिंकून बघ..
-