माझ्या हृदयात आणि येणार्या प्रत्येक
क्षणात होणारा आनंद मला तुझ्या प्रेमाचा
गोडवा देत आहे.... ❤️-
ती आहे लई सुंदर अन
चॉकलेट पेक्षाही गोड आहे,
म्हणूनच मला तिला सारख
जवळ घ्यायची खोड आहे.
तिला जेव्हाही पाहिलं की
मी चॉकलेट सारखा वितळतो,
कितीही जरी असलो रागात
तरी क्षणांत सारं विसरतो.
कधी कधी ती dark chocolate
सारखी कडू कडू वागते,
मग हळूच तिच्या मनात लपलेल्या
प्रेमाच्या गोड कॅरॅमलची भुरळ टाकते.
वरून अगदी सॉफ्ट पण
कधी आतून अचानक क्रांची वाटते,
वरून दिसते ती शांत खूप
पण अचानक धिंगाणा घालते.
तिच्या स्वभावात लपलेली
सगळ्या चॉकलेटच्या चवीची मजा आहे,
तीच माझं चॉकलेट अन
तिच्यापासून दूर जाणं एक सजा आहे.
©स्वप्नमयी-
तुझ्या शब्दांत गोडवा होता नि मनात प्रेम होतं
तुझ्या प्रेमात पडायला आणखी काय हवं होतं!-
"गोडवा" आता साखरेत उरला नाही,
मी माणसात शोधतोय.. !!-
माझा मार्ग, तुझा गोडवा,
पाषाणाला फुटेल मग उपळी.
तुझा मार्ग, माझा पावा,
काट्यालाही फुटेल मग कळी.-
गोडवा अंतरीचा माळून प्रीतिशी
हळूच नकळत अधरांवर यावा..
अबोल भावना मोकळ्या होऊन,
ओठांनी तो सखे टिपून घ्यावा....-
जिंकायचे असेल प्रत्येक वाटेवर,
आधी माणसांना जिंकायला पाहिजे,
दृष्टिकोन कोण विचारतो,
जिभेवर गोडवा असायला पाहिजे...-
तुझ्या त्या शब्दांत
होता गोडवा...
आज आपल्या नात्यात
हा कसा आला दुरावा...
प्रशाली घरत-
गोडवा शब्दांपेक्षा
अर्थात असावा...
गोडवा माणसापेक्षा,
माणुसकीत असावा...
गोडवा ओठांपेक्षा,
पोटात असावा...
गोडवा दिसण्यापेक्षा
मनात असावा...
गोडवा सहानुभूती पेक्षा,
स्पष्टवक्त्यात असावा...
गोडवा प्रेमा इतकाचं,
प्रत्येक नात्यांत असावा...-