आयुष्य जगताना
पुढे,पुढे चालत रहावं..!
किती खाचखळगे आले वाटेत
एकदा मागे वळुन बघावं..!
चालता चालता पायात
एखादा रुतला काटा
तर, त्याला हळुवारपणे काढून
पुढे,पुढे चालत राहावं..!
✒️प्रशाली विलास-
तुझे शब्द माझ्यासाठी तलवार झाले..!
तु बोलताच माझं काळीज रक्तबंबाळं झाले..!
✒️prashali-
मी- चातक होऊन तुझी वाट पहात राहावं..!
तु-पाऊस होऊन कधी ही बरसावं...!
मी-हरीण होऊन तुझ्या मागे धावावं.. !
तु -मृगजळ होऊन मला तरसावं..!
मी- किनारा होऊन तुझ्याजवळ यावं..!
तु- भरती-ओहोटी सारखं लगेच निघून जावं..!
मी -दिवस होऊन तुझ्याजवळ यावं..!
तु -आमवश्याची रात्र होऊन दूर जावं..!
मी -पुस्तक होऊन तुझ्यासाठी राहावं..!
तु-रद्दी समजून मला फाडत जावं..!
मी-शब्द होऊन तुझ्याशी बोलत राहावं..!
तु-निःशब्द होऊन शांत बसावं..!
मी-शब्दांना श्रुंगार चढवत तुझ्यासाठी लिहीत जावं..!
तु- ते न वाचता त्या शब्दांना श्रुंगारहीन करत राहावं..!
✒️प्रशाली विलास-
निसुटन चाललंय आयुष्य जगण्याआधी..!
पायवाटा ही मलीन झाल्यात
चालण्याआधी..!
शब्द ही अस्पष्ट झालेत बोलण्याआधी..!
सुर नवा ध्यास नवा सांगते संगीताची मैफील..!
गायनाआधीच सूर ही होत चाललेत गाफील..!
निसटून चाललाय वर्तमानकाळ..!
आयुष्याचा एक झोका घेण्याआधी..!
आणि हे सगळंच
निसटुन चाललं आहे आयुष्य जगण्याआधी..!
✒️प्रशाली विलास
7066689282-
पडक्या घराच्या छप्परात माझ्या
उजेडाचा एक छेद उमटला..
सूर्यनारायणाच्या किरणाने तर, पावसाच्या एका सरीने माझ्या
घराच्या भिंतींना प्रकाश तितका जाणवला...
मंद वाऱ्याची झुळूक आली माझ्या त्या पडक्या घराच्या छेदातून..
मी ही संघर्षाच्या काळोखाला विसरले..
आता भितीचा एक छेदही उमटत नाही माझ्या मनातुन...
गपगुमान बघत आहे त्या छेदातुन येणाऱ्या प्रकाशाकडे..
हात नाही पण, मन मात्र रोजच पोळतं इथे.
सावरून आयुष्याला रोज घालते अंगणात आनंदाचे सडे..
✒️प्रशाली विलास❤️-
तो तसा रोजच माझ्या सोबत असतो...
आडोश्याला गेलं कि, आडवाटेने येतो...
ठरवलं कि, आज नाही भेटायचं
तरी सोबतीने चालण्याचा इशारा देतो...
किती त्याची सोबत कंटाळून जातं आयुष्य..
त्याच आणि माझं आहे तरी कोणत्या जन्मीचं रहस्य..
तो सोबत आहे म्हणून नयन ही अश्रुने भरतात तुडुंब...
असलो आम्ही सोबत कि, गाल ही माझे होतात ओलेचिंब...
मग मी त्याच्या सोबत जन्मोजन्मी राहण्याचा केला करार..
तो सोबत आहे म्हणून तर आयुष्यासोबत नाही उरली तक्रार...
तसा तो माझा प्रियकर ही नाही कि,
कोणी मित्रसखा ही नाही..
पण, त्याच्याशिवाय जगण्याला अर्थ ही नाही..
तो आहे म्हणून जीवनाला माझ्या नाव दिला"हर्ष"
आणि त्या माझ्या सोबत्याच नाव आहे "संघर्ष"
✒️प्रशाली विलास
7066689282-
काही दुःख ही स्वतःपुरताच मर्यादित असावीत.
त्यांचा गवगवा केला तर बाजारभाव लागतो.
✒️प्रशाली विलास-
हल्ली मी शब्दांशी खेळते..
माझ्या वेदनेचा भार त्यांच्यावरच देते..
✒️प्रशाली विलास-
अदृश्य मनास माझ्या
वेदनेच्या खपल्या चढलेल्या आहेत..
रक्ताने नाहीत
मात्र,
अश्रूंनी तुडूंब भरलेल्या आहेत..
✒️प्रशाली विलास-
आयुष्य नावाच्या तालमीत सुखदुःखाचे खेळ जपुन खेळले
कि,
जगणं कसं अष्टपैलू खेळाडुसारखं होतं💯
✒️प्रशाली विलास-