"अडकुन पड़ले मी ही काही विचारांच्या गुंतागुंतीत,
हरवले ते स्वप्न सोनेरी माझे या जगाच्या गर्दीत!"-
त्याच्या माणुसकीला खतपाणी
कसे घालता येईल हे शोधतो
कधी फुटेल त्याला करुणेचा झरा याची वाट पाहतो
स्वतः मधील देवाला तो केव्हा जाणतो
आणि मदतीचा हात पुढे करण्यास सरसावतो
त्याला हे करण्यास प्रोत्साहन केव्हा तो स्वतःला देतो
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो
-
दुसकाळग्रत विहिरात पाणि भी शोधत़ो...
गर्दितल्या माणसातला माणूस मी शोधतो...-
हरवलेल्या माणुसकीच्या वाटा मी शोधतो
गळफास लावून मेलेले गुणचरित्र मी शोधतो
धर्माआड कुकर्म करणाऱ्यांत पश्चाताप मी शोधतो
कुठेतरी जाणीव माणसाला माणुसकीची मी शोधतो
हवस आणि वासने पोटी मेलेल्या त्या दगडात
जिवंत सभ्य चांगुलपणाची मूर्ती मी शोधतो
अफाट निराशेच्या गर्दीत आशावादी माणूस मी शोधतो
छळ कपटाच्या काळ्या हृदयात निश्चल मन मी शोधतो
अबोल प्राण्यांना जपणारा, माणसाला माणूस समजणारा
या असंख्यांच्या गर्दीत माणसातला माणूस मी शोधतो
-
भेगाळून गेल्या भुया सा-या तरी मायेचा ओलावा जपणारा
आजही हरवलेल्या गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो...
लाचार झाला धर्म तरी माणुसकी हाच धर्म जगणारा
मनुष्य जन्माचे कर्म करून तो सार्थकी लावणारा माणूस मी शोधतो...
दीन-दुबळ्यांच्या, पीडितांच्या जगण्याचा आधार होऊन
मायेने आपुलकीचा, आपलेपणाचा हात देणारा माणूस मी शोधतो...
स्वार्थापायी पैशामागे धावण्यापेक्षा परोपकारी वृत्ती ठेवून
नात्यांतला हरवलेला जिव्हाळा जपणारा माणूस मी शोधतो...
अहंकार न धरता मनी कशाचा, भेदाभेदी न करता
सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणा-या विचारांचा माणूस मी शोधतो....
इथं प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा, हक्काचा आदर करणारा
कुणाच्याही मनाला न दुखावणारा माणूस मी शोधतो...
माणूस म्हणून जगताना जीवन थोडं शिथिल ठेवून देताना
चहू बाजूंनी दाटलेल्या अंध:कारातूनी तेजाकडे नेणारा माणूस मी शोधतो...
स्वप्नांसवे आयुष्याची बाग फुलवताना जीवनात सुगंधाचा दरवळ करणारा
या अफाट गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो...
-काव्यामृत
-
मातीचा गंध हवाहवासा वाटतो..
अत्तराचा कारखाना नको मला...
जग कळावे म्हणून ...
निदान कुणाच्या स्वाधीन करू नका मला..
छोटीशी बाहूली आहे मी! हरवून जाईल..
म्हणून म्हणते !सारखं सारखं गर्दीत घेऊन जाऊ नका मला...
©समीक्षा भुसारी ✍-
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
-
गर्दी.....
एकतर सरळ त्यात हरवून जायचं नाहीतर हरवलेल्या स्वतःला त्यातून बाहेर काढून एकटेपणा जपायचा... सोपं असत का ते?
असेलही..
पण गर्दीतून चालताना सुद्धा ' स्व ' जपणं जमलं म्हणजे आयुष्याच गणित सुटलं...
असच ना...-
गर्दीतल्या माणसाचा माणुसकीने
शोध घेणं खुप सोपं आहे...
परंतु स्वतःच्या अस्तित्वातील माणसाला
शोधणं फार कठीण काम आहे...-