नटसम्राट
-
वाचता तुमची काव्यसंग्रह
काळीज भरून येते ,
न आठवणाऱ्या माणसालासुद्धा
तुमची आठवण देऊन जाते ....
नमन करितो तुम्हाला
वाचत असताना तुमची साठवण ,
जो ही वाचेल तुमची काव्यसंग्रह
करेल तुमची आठवण......😢
Love you कुसुमाग्रज....
-
डोळे बंद करता
तुमची आठवण येईल
हे माहीत असून ही
डोळे बंद केले मी ,
एका महान पुरुषाला आठवायला हे
कोणीही केले असते तर.....
सांगतो तुम्हाला करीत
असताना तुमची आठवण
डोळे भरून येतात जेव्हा
वाचतो तुमची साठवण
जगेल तर माणसासारखं ,
मरेल तर माणसासारखं
पण मात्र प्रेम करेल
तर तुम्ही सांगितल्या
प्रमाणे भिल्लासारखं .......
लोक विसरलेत तुमच्या आठवणी
पुन्हा पसरावी लागेल तुमची ख्याती
सांगूनी तुमची महती .....
For kusumagraj....
-
ठेच लागली कि "आई गं!"
संकट दिसलं कि "बाप रे!"
जेंव्हा हेच शब्द मुखातून येतात
अंतरंगाशी तारा पुन्हा जुळतात...
कौतुकासाठी "शाब्बास रे!"
सांत्वनासाठी "काळजी घे!"
हे उद्गार जेंव्हा ओठ निवडतात
अंतरंगाशी तारा पुन्हा जुळतात...
मोठे दिसले की "नमस्कार!"
लहानांना खूप "आशिर्वाद!"
हेच भाव जेंव्हा मनात दाटतात
अंतरंगाशी तारा पुन्हा जुळतात...
भगवा ध्वज दिसताच क्षणी
"जय भवानी जय शिवाजी!"
अश्याच गर्जना चराचरी होतात
अंतरंगाशी तारा पुन्हा जुळतात...-
अभंग, भारुडं, कविता, ओवी
आहे जिच्याकडे श्रीमंती साहित्याची...
साधते संवाद हृदयाचा हृदयाशी
शब्दांत आहे माधुर्य अन् गोडी
अशी ही भाषा आपुलकीची
जी जाणीव देते मातृत्वाची..
महाराष्ट्राच्या मातीत अन्
कणाकणांत रुजलेली
इथल्या फुलांत उमललेली,
शेत-मळ्यांत बहरलेली
सह्याद्रीच्या कडे-कपारीत गुंजणारी
अपुली मराठी मायबोली....♥️— % &-
"खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा...
पाठीवरती हात ठेऊनी
नुसते लढ म्हणा..."
- कवी : कुसुमाग्रज
कविता : कणा
— % &-
लढ म्हणा....
'ओळखळतं ' का सर मला पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवती पाणी.
क्षणभर बसला , नंतर हसला, बोलला वरती पाहून
'गंगामाई' पाहूणी आली ,गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला येऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच, हसत हसत उठला
"पैसे नको सर , जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा "-
पुन्हा एकदा...
पुन्हा तसाच एक विद्यार्थी
दरवाजाशी आला
सुन्न अश्या अवस्थेत
उंबऱ्यातच बसला!
मौनात उत्तर होते
न विचारलेल्या प्रश्नाचे
पाणी होते भरलेले डोळ्यात
घरात नांदलेल्या पंचगंगेचे!
बोलायला शब्द फुटत नव्हते
भावना डोळ्यातूनच ओसंडत होती
आमच्यात तेव्हा फक्त आणि फक्त
निरव शांतता होती....
जुन्या अनुभवाने
फक्त पाठीवर थाप दिली
तेव्हा तो जिद्दीने उठला
तसाच नि:शब्द लढायला निघाला.....
सर्व पूरग्रस्तांना समर्पित
श्रेष्ठ कवी श्री कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेने प्रभावित....🙏-
जैसे पुस्पांमाजि पुष्प मोगरी ।
की परिमळांमाजि कस्तुरी ।
तैसी भासामाजि साजिरी ।
मराठीया ॥-
मातृभाषा शोभे | मी मराठी तुझी |
जन्मभूमी माझी | महाराष्ट्र ||१||
महाराष्ट्री झाला | उदय प्राकृत
जननी संस्कृत | बोलीभाषा ||२||
मोठी होत गेले | काळानुरूप मी |
पंचवीसशे ती | वय वर्ष ||३||
मायदेशी जशी | मोठी माझी कीर्ती |
मोठी माझी व्याप्ती | परदेशी ||४||
महाराष्ट्र दिन | माझा दिवस तो |
दहावे स्थान हो | अधिकृत ||५||
ब्राह्मी मोडी लिपी | देवनागरी ती |
जननी प्राचीन | प्रचलित ||६||
मराठी माणूस | श्रीमंत समृद्ध |
मी मराठी शुद्ध | अभिजात ||७||
गौरव दिन हा | आला पहा आज
चढला तो साज |राजभाषा ||८||-