Who is God
Who is Devil
Anybody can
Whenever he wants he will..
Why God is great
And Devil is ill
If nothing without his will
How innocents gets killed
For one.. Devil is God
For other.. God is Devil
It's all about perception
You know when time prevail
God is within you
As well as Devil
It's one you youself awakes
At your own Will
Colour White is no important
Without black background
Without dark night
Sunrise is no big deal!
Who is God
Who is Devil
All summits to one
Close your eyes..You will feel...-
ऑपरेशन सिंदुर
दुश्मन का घमंड चूर
कायरो.. निहत्तो मासूमों को मारा ना
अब कांपेगी रूह तुम्हारी, बदलेगा दहशत का नूर...
काफ़िर होगी तालीम तुम्हारी
सब धर्मों को मिटाना तुम्हारे सर पे है सरूर
याद रखो ये भगोड़ों , पंगा हमसे है
ऐसे गंदे विचार मिटाने आया..ऑपरेशन सिंदूर...
सिंदूर उस पत्नी की ताकद
सपने बुनती खिलखिलाती घूम रही पहलगाम
कुछ पल तो हुए थे पाखंडियों शादी को
बीना रहम ले ली पति की जान
पत्नी के सामने मारी पति को गोली
हिंदू होना है क्या उस बिचारे का कसूर
चुन चुन के बदला लिया जायेगा
एयर स्ट्राइक करता ऑपरेशन सिंदूर...
जन्नत में रह के ना पहचाना
लाशों के ढेर पे चाही ७२ हूर
उन तक पोहचायेगी जरूर
देश का गुरुर हिंदुस्तानी आर्मी शूर
ये तो शुरवात है..अब कहर मचाएगा..ऑपरेशन सिंदूर...ऑपरेशन सिंदूर...-
नाही झालं मनासारखं
अथक प्रयत्न हरले
वाटलं संपलं सारं
आणि अचानक चमत्कार घडलेत
झालं आहे ना असं...
आठव कित्येक वेळा झालं आहे
तरीही आज मनासारखं झालं नाही
की लगेचच आयुष्याला शिव्यांची माळ आहे..
थोडं थांब ना भाऊ
चहा पाणी पी, मित्राला फोन कर
हाल हवा ऐक ऐकव
ऐकणारा भेटला की फुंकरच ती जखमेवर
बाकी वेळ, लोक आणि पैसा
यांच्या पलीकडे कुठलाच प्रॉब्लेम नाही (वपु)
पैशाचं सोंग नाही आणता येत कबूल
पण बाकी दोन्ही manage करता येतात की नाही..
तुझ्या मनासारखं झालं नाही
म्हणजे देवाच्या मनासारखं झालं ना
आणि तू आहेस ना त्याचाच
कर्म कर आणि आपलं भक्तीत रहा ना..
बाकी काय सगळं मीच सांगू
मनाला विचार, त्याला सगळ कळतं
कळतं नकळत सारं काही घडतं
आपलं तिथे असणं निमित्तमात्र असतं..-
पिंपळ
किती तो स्ट्रगल
किती तो चिवटपणा
कुठेही रुजने, पाणी शोधणे, वाढणे..
असा व्रुक्ष शोधून कठीण सापडणे..
आणि वाढणे म्हणजे अक्षरशः पसरणे
असं खुजं छोटूस आत्मसांतुष्ट वैगेरे नाही
असं दणकून डेरेदार आसमंत झाकणारा
कुणालाही असा मनसोक्त छाया देणारा..
हवेसोबत सळसळणारी त्याची असंख्य पाने
बघताना मनाचे कसे गदगदून जाणे
फांद्या जणु हात पसरून आलिंगन देणारा
खोड म्हणजे कित्येक किड्यामुंग्यांना आधार असणारा
कुणी पाणी घाला अगर नका घालू
वसंतात टवटवीत लाल चमकदार पालवीने नटणारच
पिंपळ म्हणजे लाल हिरवा पिवळा ह्या रंगांच्या सगळ्या छटा
एवढी उधळण रंगांची करताना निसर्गाला थोडा झालाय तोटा
देतो किती सावली
पावसात कित्येक जीवांचे छप्पर
तरीही टोमणे हसून स्वीकारतो
भूत मुंज्या म्हणे ह्याचे करती घर
असा हा पिंपळ शिकवतो..
आकाश गाठताना मुळानी मातीला घट्ट पकडुन ठेवा
कुरकुर न करता आपले कर्म करत जगा
कुणी देण्याची वाट न बघता स्वतः लढून मिळवा
लोकांचे टोमणे मनावर न घेत पुढे पुढे चला-
The things I was imagining were already there behind it and happily hugging me and saying why..why you waited so long...
-
किती कमाल आहे रे
वडील जीतेपणी कळूनच येत नाहीत
गेले की कळतं रे
आता आयुष्यात तशी ढाल पुन्हा नाही
ग्राह्य असते ना त्यांचे प्रेम
किंमत त्याची तेव्हा फारशी नाही
गेले की कळतं रे
तशी पाठीवरची कणखर थाप आता नाही
त्यांचे बोलणे तेव्हा टोचते रे
जुने विचार कधी कधी पटत नाहीत
गेले की कळते रे
तसा निस्वार्थ अनुभवी आपुलकीचा सल्ला आता नाही
आठवतं रे सारं सारं आठवतं
त्यांचं ते शेंडा उडालेलं बोट
ऑपरेशन चा मार्क असलेलं गोरं पोट
पैशाच्या थैली असलेल्या टपोऱ्या पेटऱ्या
कायम चॉकलेट असलेली ऑफिसची बॅग
शंकरासारखा आपसूक उमटलेला नाम
हसत खेळत पार पाडणारे कुठलेही काम
मुलांसाठी जिवाचं केलेलं रान
कुटुंबासाठी आयुष्यभर घेतलेला ताण
गेले की कळतं रे...
असा बापमाणूस पुन्हा आयुष्यात कधीच भेटणार नाही..
अगदी देवही आला तरी त्यांची कमी भरू शकणार नाही..-
जेव्हा तू असतो उघडा
जग सुद्धा असतं नागवं
कुणाला मागून तर बघ
दिसेल तुला खरं वागणं
लढ पठ्ठ्या उठ उभा ठाक
श्र्वासाच आहे ना अजून चालनं
कर दुनियादारी अक्कल लाव
पुरे झालं दुनियेला मागणं
रडला तो संपला, लढला तो जिंकला
थोरा मोठ्यंच पिढीजात सांगणं
हरणे कबूल, तह माघार कबूल
पण स्वप्नं कबूल नाही मोडणं
मेले रे लोक पण स्वप्न नाही सोडलं
तुला शोभत का पळपुटाचं जगणं
कर ना कष्ट दे ना तुझ २००%
बघ सुख नशीब येईल तुझ्या मागनं!
अभिषेक मिटके
२९.९.२०२४-
गेलास देवा आपल्या गावाला
सोडून आपल्या प्रिय भक्ताला
कसे समजवणार भरल्या मनाला
डोळे वाहतात निरोपाच्या क्षणाला
कसं आपण गप्पा मारायचो
रात्री तुला मी सारं सांगायचो
आता तू घरून ऐक आणि बोल हा
असा मी तुला, न सांगता, नाही सोडायचो...
छोट्याच आहेत अपेक्षा माझ्या
पुढच्या वर्षी येईपर्यंत पूर्ण कर बाबा
स्वप्न पूर्तीच्या ध्यासाने सध्या
आरामाच्या वेळेचा घेतला आहे ताबा..
हितगुज तुला तर सर्व ऐकवीले
इच्छा आकांक्षा तुलाच मागणार ना
बाकी सर्व काही तू जाणतोस
अजून पुढे मी काय सांगणार ना..
नाही दिला तुला पुरेसा वेळ कबूल
पण पुढच्या वर्षी कसर भरून काढेन
तू तेवढं माझ्याकडे कुटुंबाकडे लक्ष ठेव
मी माझ्या वचनाला १००% जागेन !
अभिषेक मिटके
१२.९.२०२४-
कुणावाचून कुणाचं अडत नसतं
पण साथ मिळाली ना कुणाची तर
एक मैत्रीचं नातं घडत असतं..
कोणीतरी कुठेतरी धडपडत असतं
पण हात दिला ना कोणीतरी तर
कठीण लक्ष लीलया पार पडत असतं
कोणीतरी हरून रडत असतं
पण खांदा केवळ दिला ना कोणीतरी तर
मन मोकळं होऊन बडबडत असतं
कुणाचं आयुष्य नुसतंच सडत असतं
उत्साही जगणारा मिळाला ना कोणीतरी तर
एखादं आत्महत्येपासून अडत असतं
कोणी अर्जुनसारखा गोंधळात पडत असतं
पण सारथी कृष्णासारखा मिळाला ना तर
कर्मयोग साधण्यात आयुष्य बढत असतं
कुणावाचून कुणाचं अडत नसतं
पण खांद्यावर हात टाकत चालणारा भेटला तर
एखादं चंद्रसूर्यालाही गवसणी घालत असतं
कुणावाचून कुणाचं अडत नसतं
पण..-
हमे दिखता है वही जो वो दिखाना चाहते है
रील्स स्टोरी देखके जलो मत यारो
वो हसीं चेहरे के पीछे ना जाने कौनसी मायूसी छुपाते है..-