Himani Bagore   (हिमू)
268 Followers · 64 Following

हिमवर्षाव काव्यसंग्रह आकार घेतो आहे...
DOB :-24 August 1995
Joined 29 June 2020


हिमवर्षाव काव्यसंग्रह आकार घेतो आहे...
DOB :-24 August 1995
Joined 29 June 2020
7 FEB 2024 AT 21:44

आजची असे
गुलाबी संध्याकाळ
हे प्रेम तसे...

सुरु झाला तो
प्रेमाचा आठवडा
प्रेमळ हा हो...

मोजत रहा
गुलाबाच्या पाकळ्या
प्रेम तू पहा...

व्हावे का व्यक्त
खऱ्याखुर्या प्रेमानं
प्रश्नच फक्त...

गरज नाही
प्रेम व्यक्त करण्या
गुलाबाचीही...

✍🏻हिमानी©

-


7 FEB 2024 AT 21:21

Happy Rose Day...

-


6 FEB 2024 AT 19:31

कन्यादान

मला तळहाताच्या
फोडासारखं जपलं...
त्यांनी माझ्यासाठी
एक सपान पाहिलं...
राजकुमाराच नाव
माझ्या मेहेंदीत कोरलं...
आईवडलांच्या आयुष्याचं
सार्थक झालं...

अंग जेव्हा माझं
आज हळदीनं माखलं...
त्यांच्या चेहऱ्यावर
समाधान झळकलं....
दोघांचं काळीज
बोहल्यावर उभं राहिलं...
जड अंतकरणानं
दोघांनी कन्यादान केलं...

-


4 FEB 2024 AT 23:18

धावपळ...

धावपळीचं
यंदाचं वर्ष...
करेना देहा
विश्रांती स्पर्श...१
निवांतपणा
तो रविवारी...
कामांचा ढीग
असतो दारी...२
हरवला कुठे
स्वतःचा वेळ...
घड्याळी काटे
करिती खेळ...३
दिवस असा
तो उगवतो...
अन क्षणात
तो मावळतो...४
कामं अशी ही
न संपणारी...
धावपळ ही
न थांबणारी...५

-


4 FEB 2024 AT 23:09

परतफेड...

परतफेड करु कुणाची अन कशी?
उपकारांची गणती कमी पडेल अशी...१

व्यक्त करण्या ती परोपकाराची झोळी...
खुजे भासती शब्द न अपुऱ्या पडती ओळी...२

आपणही लागतो ह्या आयुष्याचं देणं...
सोपं नसतं ते उधारीवर श्वास घेणं...३

उपकार कितीही फेडले फिटले जरी...
राहतच मागे अमूल्य ऋण काहीतरी...४

परतफेड ती कुणाला चुकली नाही...
कमी पडेल तिच्यासाठी मनुष्य जन्म हा ही...५

-


4 FEB 2024 AT 12:09

नात्यांपलीकडंचं नातं

ओळखी -अनोळखी
सगळे आपले भासतात...
आपले-परके असा मग
का बरं फरक करतात...

नात्यांपलीकडंचं नातं
माणुसकीचं ते नातं...
सर्वात श्रेष्ठ म्हणून
कायमच गणलं जातं...

-


27 JAN 2024 AT 21:27

पुन्हा एकदा दिवे उजळून
करुया स्वागत रघुरायाचे...
धन्य ती अयोध्या नगरी
पुनरागमन झाले प्रभु श्रीरामांचे...

याची देही याची डोळा
हे बालरूप साठवून ठेवले...
पाचशे वर्षांची तपश्चऱ्या फळली
अन श्रीराम मंदिर आकाराला आले...

-


26 JAN 2024 AT 18:33

माणुसकी...

मला एक कळत नाही माणसं अशी का वागतात...
सर्वकाही ज्ञात असूनही अज्ञातवासात वावरतात...१

जरा पुढं जायचं म्हंटलं की लगेच मागं खेचतात...
माहित नाही माणसं दुसऱ्यांवर का बरं जळतात...२

नाही म्हणता प्रत्येक गोष्टीत स्वतःचा स्वार्थ साधतात...
फायदा घेता घेता सगळे पहा माणुसकी विसरतात...३
.
असुरी आनंद असा ते किती काळ उपभोगतात...
या जन्माचे भोग याच जन्मात भोगावे लागतात...४

स्वतःच्या मनासारखं झालं की जो तो खुश असतो...
हेच खरं की इथं प्रत्येकजण फक्त स्वतःसाठी जगतो...५

-


26 JAN 2024 AT 12:51

Happy Republic Day🇮🇳

-


22 JAN 2024 AT 12:15

लंबी अवधी के बाद, अवध मे राम आए है...
खडे है लोग स्वागत मे, रामलल्ला जो पधारे है...
कथा रामायण की जुडी है, पुरे भारत से...
सब को आज दर्शन दो, मिलो जनता से...

नमन करे है कर मेरे के, प्रभु सेवा मे जुटे है...
मनाऊ दिवाली आज मै, अवध मे राम आए है...
तुम आए हो क्या लाए हो जगमग दियो से तुम पूछो...
तुम नही थे तो क्या बिती है भारत के हर मन से पूछो...

द्वार आज ये खुलेंगे, नर-नारी झुम उठेंगे,
राम लल्ला के होंगे दर्शन, तन मन होगा पतित पावन...
शगुन आज भारत के, दशदिशा से आए है,
खडे है लोग स्वागत मे, रामलल्ला जो पधारे है...

दर्शन कर के धनुर्धारी, धन्य हुई है जनता सारी,
लेहरा रहा ध्वज केसरी मंगल भवन अमंगल हारी
मंगल भवन अमंगल हारी...
भजन के तुम बोल हो राघव गीत का संगीत तुम राघव
सदा सुख लाना अवध बिहारी मंगल भवन अमंगल हारी...

रामराज्य अब सब पे भारी मंगल भवन अमंगल हारी...

चरणामृत ले लूँ मै, प्रभु श्रीराम आए है,
खडे है लोग स्वागत मे, रामलल्ला जो पधारे है...

-


Fetching Himani Bagore Quotes