जिथे कुठला व्यवहार नाही,
हिशोब तिथे ना उरतो काही!
जे देणे घेणे असते तिथे,
ते लक्षातही नाही,
स्वप्नातही नाही!
-
- "अनुबंध" चारोळी संग्रह "श्री सलीलजी कुलकर्णी" आणि "RAArtistry", पुणे ... read more
कुछ फटी पुरानी पतंग आज भी रक्खी है अलमारी पे
साथ मे थोड़ा बरेली का माँझा भी...
क्या पता कब थोडी फुरसत मिल जाये इस जिंदगी से
तो लौट सकू फिर से उस बंचपन में...-
बरसों से, कड़ी धूप में, रेगिस्तान में, मीलों दूर से,
जब वे पानी के घड़े सिर पर रख, संभालकर घर लेकर आती थी, तब दुनिया की आँखे बंद और जुबाँ पर ताला लगा रहता था...
बस एक पानी का नल क्या लग गया घर मे कल,
लोग देखकर कहने लगे...
"वाह! क्या मस्त जिंदगी है तुम्हारी!"
-
जमेल तशी आसपास वा मनात असू दे
एक पणती तेवढी तेवत राहू दे...
देवघरात निरांजन म्हणून वापर...
अंधारात दिवा म्हणून वापर...
शेकोटीला पर्याय म्हणून वापर...
थंडीमध्ये ऊब म्हणून वापर...
क्रांतीत मशाल म्हणून वापर...
शांततेचा तह म्हणून वापर...
गंगेला प्रकाशाचे अर्पण म्हणून वापर...
इच्छापूर्तीचे द्योतक म्हणून वापर...
जाशील तिथे पदोपदी तिची सोबत असू दे
एक पणती तेवढी तेवत राहू दे...-
चंद्राची प्रभा खुललीयं नभा, या अश्या शुभ्र राती
गंधाळती सुमने, बागडती हरणे, पक्षी मधुर गाती
झुळूक येण्याने, हलतात पाने, मोहरते वेल फांदी
मोकळे झरे, काजवे भिरभिरे, काळोखाची चांदी-
अभिजात मराठी!
भाषेचा जन्म कुठे, वय किती, अन काय गुणधर्म
चाचपले गेले हे, सरकार दरबारी, हा तिथला धर्म
साधी सरळ प्रेमळ भाषा म्हणुनी जिभेवर रुळली
हजारो वर्षे वयोमान तरी, सदा तारुण्यात दिसली
श्री छत्रपती, पंडित, संत, साहित्यिक, वा जनता
जपत आले तिजला खुलविले सतेज रूप सर्वथा
वर्षोनुवर्षे रुजवली, फुलवली भाषा, ज्या मातीने
त्या महान राष्ट्रातील मातीस कसावे, नित्य मायेने
-
इथेच कुठेतरी असशील तर
ऐकु येईल का बुजलेले स्वर
गोंगाट, गडबड, थरथराटात
बधिर फिरती सारे, शहरभर
सांग कसा, सोडवायचा गुंता
धागा कुठलाही तुटल्याविना
सांग कशी, नांदणार सुबत्ता
कुरुक्षेत्रासम, त्या युद्धाविना-
घडल्या बिघडल्या गोष्टींचं गाठोडं
पाठीवर ओझं, डोळ्यांवर झापडं
कुठे खडा चढ तर कुठे तीव्र उतार
कुठे चिखलमाती कुठे तप्त पठार
गर्द दमट दिशा, धुकाळलेली वाट
अज्ञात काट्यांमुळे, रुधिराचे पाट
या जर्जर देही, उन्मेषाची धडपड
ओठांत गुरुनाम, हृदयात धडधड-
जीत के लिए...थोड़ा रुकना पड़ता है
सत्वपरीक्षा में खरा उतरना पड़ता है
जब पूरा वर्ग मिलजुलकर पढ़ाई करे
ना किसी का सपना अधूरा रहता है
#IndiaT20WorldCup2024Winner 🇮🇳-
पहिल्या काही पायऱ्यांवर, लटपटतात पाय
वर चढायचं की नाही, की करू नक्की काय
कितीक आहेत वरती, दिसत नाहीत खालून
उंच आहेत जरा कुठे, कळतं हे त्यावर चढून
थकून बसतात पाय मधेच थोडंसं चढल्यावर
उठायचंच नसतं, आळस अंगात शिरल्यावर
घामावर वारा फिरल्यावर, थंडगार होतो देह
क्षीण दूर सरल्यावर, पायऱ्यांशी जडतो स्नेह
मन घट्ट करून पाय, पुन्हा चढू लागतात वर
पक्कं मनात ठरलं की, मागे राहतात जर तर-