आभाळाकडे नजर एकटक
आस एकच..पहिला पाऊस
सुकले डोळे, भेगाळली भुई
नको ना रे इतकी ओढ लावूस....
© संजय स गुरव-
दूर जाण्याचा माझा प्रयास नक्कीच नसेल
माझ्या प्रत्येक कवितेत तुझा अभ्यास नक्कीच असेल-
बावरे हे मन माझे.....
ओढ तुझीच लावत असते,
विचार फक्त तुझाच सखे.....
क्षणोक्षणी करत असते.
कसे समजावू या मनाला.....
असतो हवा तुझा इशारा,
तू हसली जरा तरीही.....
बघण्यासारखा असतो नजारा.
परत जातांना.....
पुन्हा.. तू मला बघशील का,
तुझ्या हातात असलेलं आपल प्रेम.....
माझ्या हातात देशील का.
मागतो मागणे देवाकडे.....
देवा तू माझी इच्छा पूर्ण करशील ना,
आता तरी सांग ना प्रिये.....
तू माझी होशील ना.
(shubham Deokar)-
ओढ जाणीवेच्या पलीकडे असते...
ओढीला ओढीची ओढ असते...
ओढ मनाची चंचलता,
ओढ तृप्तेचा अभाव असते...
ओढ नदीचा प्रवाह,
ओढ वाहणारा झरा असते...
ओढं तडफडणारी वेदना,
ओढ निस्वार्थ भावना असते...
ओढ श्वासांचं कोडणं,
ओढ काळजाची धडधड असते...
ओढ निसटलेला क्षण,
ओढ बेलगाम दोर असते...-
नात्यात जबाबदारीची जाणीव असावी,
जबाबदारीचं ओझं म्हणजे नातं नाही...-
ओढ...
पतंगाला आहे ओढ
पणतीतल्या जळणा-या वातीची
जरी असले प्राण तिथे
झेपावण्याची आस आहे
सुगंधाची आहे ओढ
लाकूड पोखरणा-या भुंग्याला
कमळच आहे ते तरी
जाई प्राण ओशाळून हा
आहे रात्रीला ही ओढ
शीतल छायेच्या चंद्राची
आकाशात लुकलुकणा-या ता-यांची
मैफिल जशी तिथं सजलेली
आहे तशीच ही ओढ
माणसातल्या माणुसकीची
असेल त्यात प्रेम,जिव्हाळा
विश्वासाच्या वेलीवर अलगद गुंफलेली
- अश्विनी मोहिते
-
ओढ मनाची तव भावनांची
ओढच उंबरठ्यावरी खोल दाटते
जगण्यातले गीत शोधता
ओढच वाहणारी झुळूक वाटते-
रात्रीच्या उंबरठ्यावर,
रंगते जत्रा काजव्यांची...
डोळ्यांना निमित्त असतं,
स्वप्नं तुझी पाहण्याची...-
खुप कठीण होतय ग
हे सगळ वाचतांना,
उगाच वेडी नाही म्हणत तुला
माझं रूप लिहिताना
-
ऊभी तू या सांजवेळी,,
अथांग त्या समुद्र किनाऱ्याला..
भेट कधी होईल,,
जणु प्रश्न हा मनात दाटलेला..
Dhananjay_4_u-