आठवणींच्या गाठोड्यान मन,
लय जड व्हायला लागलय.
लेखणीच्या मदतीन मनावरच ओझ,
थोड हलक करायला लागलोय.-
जबाबदारीच ओझं खांद्यावर येणं!
आणि
जबाबदारीच ओझं खांद्यावर घेणं..
यात खूप मोठा फरक नाही का?
©समीक्षा भुसारी✍-
सागराला त्याचंच ओझ झेपत नसतं..
पण आपण त्याच्या समोर
बोलायला लागलो..
की..
तो एखाद्याच
' मन 'कसं हलकं करतो..-
हे मनावरचं #ओझं काही केल्या उतरेना...
रात संपत आली तरी डोळा लागेना...
वाटतेय बोलावे तिच्यासोबत आणि दोन अश्रू गाळून शांत करून टाकावी ही मनाची घालमेल...
पण तो एक कॉल करण्याची हिंमत काही होईना...
हे तिला ही माहीत आहे इकडे माझे काय होत आहे..
पण तरीही ती दोन शब्द #प्रेमानी बोलेना...
हे मनावरचं ओझं काही केल्या उतरेना...
हे मनावरचं ओझं काही केल्या उतरेना..-
खूप दिवसांनी आज
मन बाहेर भटकून आलंय
ओझं होतं मनावर ते
तिकडेच कुठेतरी हरवलय...-
मनावरचं ओझं
जरा कमी करावं म्हणतेय,
आठवणींना तूझ्या
जरा दूर करावं म्हणतेय-
कसं सावरू सांग मी
माझ्या मनावरचं ओझं
आवरून बसलोयं मी काहीसं
तुही घेऊन जा की थोडंं तुझं-