किती उन्हाळे सोसावे एकट्या जीवाने
साधी एक सावलीही त्याच्या नशिबी नसावी?-
माणसाने जगण्याचा अट्टाहास करावा
कारण मरणाची तारीख सांगून येतं नाही-
ज्यावेळी एक महिलाच
दुसऱ्या महिलेला आदर, Space,
स्वातंत्र्य देईल, समजून घेईल
तो खरा महिला दिन...
नाहीतर महिला ३६५ दिवस दीनच-
मनापासून मनापर्यंतचा
प्रवास खूप गहिरा असतो
साद पोहोचते अचूक
पण कान मात्र बहिरा असतो-
इथं प्रत्येकजण रंगवतोयं
रोज नवी नवी पात्र
श्वासांना घेऊन उधार
इथलं जगणं असतं निमित्तमात्र-
कधीतरी सुटतो
आसवांचाही तोल
मग विसर पडतो त्यांना
की ते किती आहेत अनमोल-
कधीतरी सुटतो
आसवांचाही तोल
मग विसर पडतो त्यांना
की ते किती आहेत अनमोल-
आठवणींचे चक्र सतत गिरकी घेतंय
खेचून मनाला पुन्हा पुन्हा भूतकाळात नेतंय
मी इथं वर्तमानाशी कशीबशी झुंज देतोयं
ह्या सगळ्यात मात्र आयुष्याचा खेळ होतोयं-
काही तारे निखळले
काही असून नसल्यासारखे
मी मात्र अखंड मिणमिणतोयं
अवघं आभाळ माझंच असल्यासारखे-
अधांतरी वाटा साऱ्या
सांगा तोल कसा सावरणार
सांडलेल्या त्या क्षणांना
सांगा मी एकट्याने कसं आवरणार?-