QUOTES ON #एकटी

#एकटी quotes

Trending | Latest
7 AUG 2019 AT 15:00

मी एकटी नाही
कविता माझ्या सोबत आहे
मनातील भावना शब्दात मांडण्यासाठी
लेखणीची मला साथ आहे

सांगत नाही भावना कोणाला म्हणजे
समजुन घेणार कोणी नाही अस नाही
मनातल दुःख कोणाला सांगायला
मला आवडत नाही
पण म्हणुन मी एकटी नाही
दुःख शब्दात मांडण्यासाठी
लेखणीची मला साथ आहे

-


9 JUN 2021 AT 23:56


कोण देतो कुणाच्या दु:खाला मान येथे
उरले मी एकटे आता नाही भान येथे

हळूहळू निघून गेले सारे मैफिलीतले माझ्या
भरला नात्यात बाजार मग छान येथे.
©समीक्षा भुसारी✍

-


11 AUG 2019 AT 10:12

तुझ्या आठवणींची माझ्याही
हृदयात आहे साठवण....
अश्रूंची ही झालिये पाठवण
तू एकदा साद ही ना
दिली सार कळून मग
कशी पाहू मी तरी माग वळून....

-


15 NOV 2020 AT 10:16

✍ भुजंगप्रयात वृत्त ✍
1 2 2 1 2 2 1 2 2 1 2 2
अशा सांजवेळी जरी एकटी मी
असे सोबती दोन डोळ्यात पाणी
मनाला सहारा तुझ्या आठवांचा
उरी वेदना ही तुझी रे निशाणी
असा जीवघेणा तुझा हा दुरावा
मना भास होती तुझे भोवताली
तुझी याद देतात दाही दिशा या
सरी श्रावणाच्या तुझी साद घाली
मला चेहरा ओळखीचा न माझा
तुझ्या वाचुनी आरसा त्रास देई
तुझे दु:ख माझ्यात भिनते असे की
पुन्हा वेदनेला नवा कोंब येई
न अंदाज मजला कसे जाहले हे
फुलाने कशी रक्तबंबाळ झाले
तुझ्या धुंद डोळ्यात होते किनारे
तरी ही तळाशी कशी मी बुडाले

-


7 AUG 2019 AT 8:37

Mere sati puri family our mere Aapne jane seye jada pyeer karney vale dost he....

-


20 JAN 2022 AT 15:56

कुणासाठी कुणीतरी
सतत तळमळत असते
मनाच्या त्या कोपर्‍यात
आठवण 'ती ' एकली असते.

-



नव्हतो कधीही मी एकटा
राहिलो न कधी मी एकटा
सदैव माझ्या सोबती आहे
तुझ्या आठवणींचा राबता

-


7 AUG 2019 AT 11:03

प्रेम करणारा मी एकटाच नव्हतो एवढंच तुला सांगितलं होत
फक्त माझीच बनून रहा सांग काय जगावेगळं तुला मागितल होत.

नात्यानात्यांमधे फरक असतो एवढी साधी गोष्ट ही तुला न कळावी
सगळ्या नात्यांना एकाच परीमाणात तोलताना तुला बघितल होत

तरीही सगळे दोष माझ्याच माथी घ्यायला आवडत मला नेहमी
कारण चांगुलपणाचा शाप मला नको म्हणून मीही देवाला सांगितलं होत

आणि बघ ना ह्या गोष्टीचा शेवटही तुला हवा तसाच होईल खुश हो जरा
सुखांशी वैर पत्करण्याच माझ मागणं ही माझ्यासारखच थोड विचित्रच होत.

-


7 AUG 2019 AT 10:42

मी एकटा नाही मिळत
शब्द आहे माझ्या सोबतीला..
सुचल्या काही काव्य रचना
लिहण्यास सांगतो लेखणीला..

लेखणीही शब्द शब्द जोडून
व्यक्त होते प्रत्येक ओळीतून..
मनातील निर्मित भावनांना
सजवते नवं नवं रचनेतून..

रचलेले पूर्ण काव्य जेव्हा
कागदावर प्रकाशुन बोलते..
असतात त्यात आपल्या आठवणी
वाचतांना हृदयातून जाणवते..

हे शब्दांचे नाते माझे म्हणजे
प्रत्येक श्वासाशी जोडलेले आहे..
सुख,दुःखाच्या प्रसंगी मला
साथीला राहून सांभाळले आहे..

-


7 AUG 2019 AT 17:33

सोडून दिले तू वाऱ्यावर
तरी मी एकटा नाही।
वाऱ्याची साथ ज्या पिसाला
त्याला पडण्याचा धोका नाही..!!

-