एकटाच जो तो चालतो
घेऊन अनेक प्रश्न मनात
जगण्याचे मार्ग शोधतो
पसाऱ्यात येईल साऱ्या
अस्तित्व शून्यवत त्याचे
असून अंधार सोबतीला
उरते का कुणी कुणाचे?-
एकाकी रात्र माझी
एकटेपणाचा दिवस
कोणी नाही सोबतीला हि खंत उराशी...
चालता चालता एकट्याने
वर्ष ही सरत चाललंय
एकाकी पणा मुळे अश्रू ही डोळ्यांशी...
माझ ठिकाण एकाकी
एकाकी माझे जीवन
मी एकटा माझा मी स्वतः शी...
-
एकटाच होतो,
एकटाच राहीन,
एकटेपणाची सवय आहे,
एकांताची ओळख आहे,
कोणी गेलं जरी तरी फिकीर का करावी,
माझं कोणी न्हवतच तर काळजी का करावी,
त्रास होतो, थोडं सहन करावं,
ज्याला निघून जायचंय त्याला लाथ मारून आयुष्यातून बाहेर काढावं,
नाहीतरी नालायकाना काम झाली की आपण नकोच असतो,
मग अश्या स्वार्थी लोकांसाठी मनाला का लावून घ्यावं..-
सोबतीस राहा रे अश्रूंनो माझ्या जरा...
हरलो नाहीच मी, बस थकलोय जरा...-
आस लागे तुझी या मनाला
ओल्या चांदनराती
गाते अबोले मन हे माझे
ओली ओली प्रीती
शोधी तुला रोज रोज नव्याने
गगणातुनी चांदणी
तू ये ना, तू ये ना, तू ये ना परतूनी
तू ये ना, तू ये ना, माझी होऊनी
अधुरे अधुरे हे चंद्र तारे
अधुरे गीत माझे
तुझियाविना का वाटे मनाला
अधुरे स्वप्न माझे
काहूर उठूनी कोमेजली आज
मोहकती रातराणी
तू ये ना, तू ये ना, तू ये ना परतुनी
तू ये ना, तू ये ना, माझी होऊनी
ओला शहारा छळतो मनाला
सारे दुवे निराळे
हलकेच ओठी तुझ्या आठवांचे
येती कसे क्षण हे नकळे
आतूर झाले मन माझे हळवे
नजरेत तुजला भरुनी
तू ये ना, तू ये ना, तू ये ना परतुनी
तू ये ना, तू ये ना, माझी होऊनी-
एकदा ना तिला फोन केला
उचलला तर नाही,
पण एक मेसेज आला की
"I'll call you later".
आज कित्येक वर्षे उलटली
तो मेसेज आणि मी,
अजून हि तसेच आहोत
तिच्या फोन ची वाट बघत...-
सांज माझी
सांज माझी नेहमी
एकटी असायची
तिला नव्हती कुणाची
साथ कधी
सांज माझी नेहमी
विचारात असायची
तिला नेहमी कुणाची
तरी काळजी असायची
सांज माझी नेहमी
सुंदर असायची
तिला नेहमी कुणाची
आठवण असायची
सांज माझी नेहमी
कविता करायची
तिला नेहमी कुणाची
तरी सोबत असायची
.✍️ विशाल कुंभार-
एकटाच असलो तरी खंबीर मी आहे
कितीही ऋतू बदलो, उभा मी आहे
दुःखाचे डोंगर कोसळले तरी शाबूत मी आहे
दुःखाला मनात दाबून, चेहऱ्यावर हसू आहे-
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत..
एक अडके एकात, एक एकट्या जगात..
एक खिडकी एक तारा, एक चंद्र एक तारा..
एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच..-