एकाकी रात्र माझी
एकटेपणाचा दिवस
कोणी नाही सोबतीला हि खंत उराशी...
चालता चालता एकट्याने
वर्ष ही सरत चाललंय
एकाकी पणा मुळे अश्रू ही डोळ्यांशी...
माझ ठिकाण एकाकी
एकाकी माझे जीवन
मी एकटा माझा मी स्वतः शी...
-
अशक्य गोष्ट ही तु शक्य करू शकतो
वचन दे तु स्वतः ला
प्रयत्न केला तर विजय तुझाच आहे
फक्त घाबरू नको वादळाला...
जग काय म्हणलं याचा विचार करून थांबू नको
झेप घेऊन तर बघ आकाशी
स्वतः शिवाय तुला कोणी ही अडवू शकत नाही
तुझी स्पर्धा आहे गगनाशी...
अनुभवाच्या शिदोरीतुन शिकवण घे
अन् परिपूर्ण कर तुझ्या आयुष्याला
जेव्हा केव्हा आयुष्यात मागे पाहण्याची वेळ येईल
तेव्हा हताश होऊन देऊ नको मनाला...
वेळ किती ही कठिण असली तरी
वचन दे तु स्वतः ला
अविरत पणे तु चालत राहणार
हे सांगुन ठेव संकटाला...
-
घेतला वसा आम्ही दुर्ग संवर्धनाचा
करण्या त्यांच रक्षण
गडकोटांच्या चिरांचिरा संवर्धित करणं हेच आता आमचं लक्षण
-
डोळ्यात दाटले आभाळ तुझ्या आठवणीचे
कसे सावरू मी हे अश्रू तुझ्या विरहाचे
मनी लागली हुरहुर भेटण्या सखी तुला ग
तोडुनि पाश बंधनाचे ये मला भेटण्यास
-
अंधाराची भिती नाही मला,
मी चालत राहतो माझ्या वाटेवर...
काळोख दाटला जरी हा
आशेचा किरण तेवत ठेवतो मनावर...
अडगळ वळणाची वाट जरी ती
जपून पावलं टाकतो त्यावर...
लाख संकटे येवो
बेभान होऊन स्वार होतो त्यांच्यावर...
काटेरी असेल मार्ग हा
तरी ठाम राहतो मी ध्येयावर...
माघार घेणे जमणार नाही मला
मी चालत राहणार या वाटेवर...
-
काटेरी वाट चालताना तु वेदनेशी थोडी सलगी कर...
चालता चालता तु तुझ्या ध्येया पर्यंत पोहोचला हे त्यांना ही सांगून बघ...-
मनाला जेव्हा वेदना होतात ,
तेव्हा आपसुकच डोळ्यात माझ्या अश्रू दाटतात...
टोचता काटा दुःखाचा अलगद ते ओघळतात
तेव्हा आपसुकच डोळ्यात माझ्या अश्रू दाटतात...
परीस्थिती शी दोन हात करताना दमल्या सारखं होत मला
तेव्हा आपसुकच डोळ्यात माझ्या अश्रू दाटतात...
कधी कधी भूतकाळातील आठवणी जाग्या होतात
तेव्हा आपसुकच डोळ्यात माझ्या अश्रू दाटतात...
जीवनाच्या वाटेवर चालताना एकटं वाटत
तेव्हा आपसुकच डोळ्यात माझ्या अश्रू दाटतात...
आपलीच माणसं दुरावल्याची जाणिव होते
तेव्हा आपसुकच डोळ्यात माझ्या अश्रू दाटतात
-