Pranav Joshi   (प्रणव....)
12 Followers · 7 Following

Joined 23 May 2021


Joined 23 May 2021
1 SEP AT 9:03

हसुनी पाहिले आयुष्याकडे तर दुःख सापडत नाही,
किती ही असो मोठी जखम, वेदना जाणवत नाही,
भुखेची मग आपोआप इच्छाच संपून जाते,
हवे काही असे काही मग वाटतही काही नाही
पाहून घ्यावे आयुष्याकडे असेही की आपले काहीच नाही,
कोणी आले कोणी गेलं याचा प्रादुर्भावच नाही..

-


30 JUL AT 20:32

बिताये हैं हमने भी, कई घंटे किसी के इंतजार में,
कभी नींद को दूर कर कि है घंटो बातें किसी से,
किसी को समझने में न जाने कितना वक्त बिताया था,
आज जब मुड़कर देखा तो एहसास हुआ,

न उन्हें हम समझ पाए और अपना वक़्त भी गवा बैठे।

-


1 JUL AT 0:26

कमावलं ते गमावलं, हाती न उरलं काही,
भविष्याची स्वप्न जरी, भुतकाळ मात्र डोकावत राही,

विश्वास ठेवावा कुणावर, आधीचा पार तुटून गेला,
'जो जोवर आहे तोवर सावर' हा एक नवा नियम केला

-


28 MAY AT 23:35

दोस्तो,
जब वो जाने का मन बना चुके होते है ना,
तो आप कितना भी कुछ कर ले,
वो रुकते नही है।

चाहे आप कितने भी नए तरीके अपनाए,
कोई नए पैतरे अपनाये,
दोस्तो कि, किसी अपने की या किसी समझदार कि,
किसी की सलाह उस वक़्त काम ही नहीं आती।

वो जब जाने लगते है, हम कितनी भी कोशिश कर ले,
वो रुकते नही है,
हम बस देखते रह जाते है,
और
वो हमें छोड़ कर चले जाते है।

सच कहता हूं दोस्तो,
बाल जब जाने लग जाते है,

कुछ भी करो, नही रुकते।😉

-


22 MAY AT 9:59

देवा confirm सांग कोणता ऋतू आहे,

रात्रभर भिजवून ठेऊन सकाळी कडक उन्हात वाळत टाकणं बरं नाही।

-


18 MAY AT 0:19

आयुष्याचा कोरा कागद हाती आला रंग भराया,
मी ही रंग शोधून सारे, लागलो त्यावर उतरवाया,
लाल, हिरवा, पिवळा, काळा, जसा जमेल तसा मिसळला,
कोराच होता कागद माझा, हळू हळू भरू लागला,

भरले न्हवते सारे रंग, भरला न्हवता कागद माझा,
रंगाची इतकी ओळख न्हवती पण भरत होतो जमेल तसा,
आकर्षक दिसत न्हवता कदाचित पण मला मात्र आवडत होते,
रंगलेल्या कागदावर माझे स्वतःचे एक चित्र तय्यार होत होते,

अर्धे भरले होते पान, काही काळाने पूर्ण झालेच असते,
जर कुठून कोणाच्या धक्क्याने ते पाण्याचे भांडे पडले नसते,
पडले पाणी चित्रावरती, रंग सारे मिसळून गेले,
जे झाले होते चित्र तय्यार, ते आता पूर्ण वाया गेले होते।

हताश झालो थोडा मी, दुःखही थोडे झाले होते,
माझ्या मेहनतीवर अन रंगावर कुणा दुसऱ्याने पाणी फेरले होते,
पण उठलो मी अन ,स्वतःला सावरले
नवीन कागद घेऊन मी, नवीन चित्र रंगवायला घेतले..

-


28 APR AT 22:54

स्मरणशक्ती धुसर माझी..
हा श्राप समजावा की वरदान,
आयुष्याच्या आठवणी विसरुनी जातो,
कशाचेच राहे ना मज भान।

विसरून जातो विसरुनी जातो,
आठवण काही राहत नाही,
मी काय केलं आणि त्यांनी काय केलं,
हा प्रश्नच आता सतावत नाही,

स्मरणशक्ती झाली इतकी शुल्लक,
की असे झाले होते हे खरंच वाटत नाही
आणि आठवण करून देऊच लागलं कोणी
तरी आठवावस ही आता वाटत नाही।

मला तर आता वाटू लागलं,
सर्वांनी आठवणींचा ताण कुठंतरी असाच सोडून द्यावं,
वाईट प्रसंगाच्या आठवणींना सोडून खांद्यावरील जोखड सोडावं,
आणि चांगल्या आठवणींना फक्त चवीपुरतं आयुष्यात ठेवावं...

-


8 APR AT 21:32

Stability गणित सालं,
सुटता सुटता सुटेना,
आयुष्याची Stability,
नक्की कशात काही कळेना।

शिक्षणावर द्यावे लक्ष तर,
प्रेमाचा बट्याबोळ आहे 😅
आणि पडलो जर प्रेमात,
तर प्रेम आणि करिअर दोघांचाही अंत आहे।

बरं कसंबसं सावरले दोघात
आणि तरलो जरी थोडे,
नोकरीवर पोचताच तुमचे
लागतात की हो घोडे,

शिक्षण, करिअर, नोकरी,
सगळ्यात संसार ही सुरू होतो,
तुम्हालाही लक्षात येत नाही,
आणि दुष्टचक्रात आपण फसतो,

मग म्हणावं यांच्यात
Stability कशी शोधावी,
कामाच्या व्यापात आपल्या,
Work life balance कुठून आणावी,

सगळ्यांचा balance शोधता शोधता,
तारेवरची कसरत मात्र सुरू होते,
संपते जेव्हा कसरत तेव्हा,
खोटी smile असलेली एक तसबीर
कुठंतरी भिंतीवर balance करते...

-कवी प्रणव म्हणे🙃

-


6 FEB AT 8:32

नात्यांवर विनोद करता करता कधी विनोद नात्यामध्ये घेऊन आलो कळलंच नाही।

नात्यांवर मस्करी करताना कधी त्या नात्यातील व्यक्तीलाच मस्करीत घेऊ लागलो कळलंच नाही।

पाहिलं मित्रांमध्ये, कधी कट्यावर करणारे विनोद घरात कधी घुसले कळलेच नाही।

अचानक छान चाललेल्या नात्यामध्ये अचानक इतका अबोला, इतका राग कधी भरला कळलंच नाही।

Insta : jpranav23

-


21 JAN AT 8:33

एक छोटे से डब्बे में हजारों को दबाया है,
भेड़ बकरियों से बत्तर तुम्हारी सवारी है,
फिर ये चक्कर हर दिन सुबह शाम करना है,
चलो युवक थोड़ा सब्र करो, बस ९० घंटो को भरना है।

काम तुम्हारा खत्म न होगा ये तो बस शुरुवात है,
अभी तो जवानी शुरू हुई तुम्हे और काबिल बनना है,
कम करोगे काम तो क्या सच में तुम्हे देश को आगे बढ़ाना है,
चलो युवक कमर कसो, बस ९० घंटो को भरना है।

छुट्टियों की बात क्या करनी जब काम इतना पड़ा है,
फैमिली कि बात न करो उनके भविष्य के लिए तो करना है,
वर्क लाइफ बैलेंस मिथ्य है सारे क्यों तुम्हे इनमे पड़ना है,
चलो युवक थोड़ा दम दिखाओ, बस ९० घंटो को भरना है।

Jpranav23

-


Fetching Pranav Joshi Quotes