ती हलकेच गालात हसताना वाटे कहर होती
गालावर तिच्या उमटणारी खळी जहर होती
कित्येक शस्त्र ठरली जरी समोर माझ्या फिकी
मी घायाळ झालो ज्याने ती तिची नजर होती
कातरवेळी अंगणात तिच्या पैंजनांच्या चाहुलीने
येत असे भेटाया तिजला पावसाची सर होती
पाहिले जेंव्हा मोकळ्या केसात तिला पहिल्यांदा
त्या दिवसाची रात्र माझ्यासाठी कोजागर होती
मी स्मरून तिला हलकेच जणू मिटल्यावर डोळे
ती मृगनयनी अवचित माझ्या नजरेसमोर होती
प्रेम म्हणजे काय?, मी विचारायचो तिला अन्
मिठीत तिच्या उमगले तीच प्रश्नाचे उत्तर होती-
भूल भी जाओ मुझे मगर मेरी कविताओं को अपने ... read more
वेळही नव्हता, काळही नव्हता, नव्हता कोणी साथी
माझे असणारे आयुष्यही नव्हते माझ्या हाती
होती केवळ पाठीवरती जबाबदारीची जाणीव अन्
आयुष्याच्या प्रवासात जणू मंदावलेल्या वाती
यशापयशाच्या दऱ्याखोऱ्यांतून पडून झडून उठताना
याच जन्मी का जगून झाले जन्म माझे साती ?
निभावण्या मी झटत राहिलो स्वतःलाही विसरून तरी
घर झाले पोरके मला अन् विरळ झाली नाती
निघालो मी दूरदेशी परक्या शहराच्या कुशीत जेंव्हा,
विसर पडला शेतात माझ्या सोण्यासारखी माती
बोलू आता कोणाशी मी झाल्या गेल्या चुकांना म्हणुनी
लिहित जातो कवितेत माझ्या भावना एकांत राती-
अज्ञात एका वाटेवर त्या अज्ञात एक शहर आहे
मोहरतो गुलमोहोर तिथे नेमकं तिचं घर आहे
वेडावतो सुगंध मना नाजूक सुगंधित फुलांचा
केसात ती माळते म्हणून मोगऱ्यालाही बहर आहे
गाली खळी नाजूक ओठी डाळींबदाणे पिळलेले
डोळ्यात तिच्या लपलेला अथांग प्रेमसागर आहे
अलवार गार वारा तिला सहज येई भेटाया म्हणुनी
आवडतो तिला जो, तो सायंकाळचा प्रहर आहे
झंकार तिच्या पैंजनांचा ठेका जेंव्हा धरतो तेंव्हा
अंगणी तिच्या डोकावते वेड्या पावसाची सर आहे
अबोल ती अन् अबोल मी एकांत राती भेटल्यावर
कुजबुजते माझ्या नजरेशी लाजरी तिची नजर आहे-
अगर मुझसे मिलना है तो
दिन के उजाले में आया कीजिए जनाब,
शाम होते ही मैं अपने चेहरे से
मुस्कुराहट का मुखवटा निकाल फेंकता हू।-
रे अल्लड वाऱ्या माझा निरोप त्याला देशील का?,
दूर उभा तो क्षितिजावरती एक प्रवासी आहे
वाट पाहते नजर रोखुनी एक कळी हसूनी गाली
सांग तया त्याच्या येण्याची आस उराशी आहे
बघ म्हणावं आभाळावर मेघ दाटूनी येताना
मनामनाच्या इंद्रधनूची भेट नभाशी आहे
पुकारले मी नाव तयाचे रिमझिम पाऊस झरताना
त्याच्या नावाची गोडी अजूनी ओठात माझ्या आहे
सूर गवसतील स्पंदनात अन् श्वास श्वासात मोहरताना
येईल तो अन् घेईल मिठीत ही ओढ मनाशी आहे
हलकेच माझा स्पर्श देऊनी हृदयी त्याच्या गोंदून सांग
खुललेल्या चाफ्याच्या कळीची प्रीत तुझ्याशी आहे-
तू नसताना असतेस तू मनात माझ्या कुठेतरी
मनमनाच्या अंतरात नभ रिमझिम झरतात कुठेतरी
अन् सहज सोपे असते कुठे कोणालातरी विसरने
उसवतानाही विणले जातात बंध रेशमी कुठेतरी
दूर तिथे त्या क्षितिजावरूनी मी पाहिले तुजला येताना
क्षणिक जरी हे मृगजळ माझे सत्य असावे कुठेतरी
कित्येक अबोल राती मी विरहात तुझ्या जागवल्या
आजही माझ्या मनात आहे आठवण तुझी कुठेतरी
मोह मनाला गारव्यापरी सखे तुझ्या ग आठवणींचा
अठऊनी मग पाझर फुटतो नजरेस माझ्या कुठेतरी
अन् नकळत कधी सावली तुझी स्पर्षली माझ्या सावलीला
मोगराच मन मोहून जातो हृदयात माझ्या कुठेतरी-
सुर अंतरी मनाच्या रुजले वेचून त्याने
नवबंध रेशमाचे विणले हसून त्याने ...!!
क्षण चांदण्यात न्हाले नभी चांद मातलेला
मोहरली प्रेम गीते प्रेमात भिजून त्याने ...!!
ती दूर देशी असते इतकेच दुःख त्याचे
कवितेत म्हणुनी केले वर्णन स्मरून त्याने ...!!
जुना छंद साजणीला कळले कळी फुलांचा
अंगणास बाग तेंव्हा केली बहरून त्याने ...!!
जणू एक स्वप्नवेडा स्वप्नात पाही तिजला
सावरले स्वतःस कसे तिच्यात विरून त्याने ...!!
ती रातराणी हसली क्षितीजावरी नव्याने
तव प्रेम व्यक्त केले सोहळे मांडून त्याने ...!!-
तुझ्या नजरेतून माझी दुनिया
एकदा मला पाहू दे
रित्या सांजवेळी क्षितिजावरती
सावली तुझी मज होऊ दे
मी पाहतो रोज सांज सकाळी
जे स्वप्न आजही अपूर्ण ते,
आज नव्याने नवे रंग भरुनी
प्रेमसरी मज झेलू दे...-
सरून जाता दिवस मोगरा सुकून गेला मोहरलेला
गुदमरला हा जीव माझा तिच्यासाठी व्याकुळलेला
ती सांज गेली निघून रात्र काळोखात मज ओढताना
एकटा मी आणिक एकटा चंद्र माझ्या सोबतीला-
सूचावे कधी असेही, गाणे वेली पानातले
हसावे मन आनंदाने, फुल खुलावे मनातले
रुजावे शब्द मनात अन्, मोहरावी सुंदर कविता
सुर जुळावे खळखळणारे, जणू वाहणारी सरिता
इंद्रधनू मग हळूच मनाच्या, आकाशी उमटवेल सप्तरंग
मिलन होता मनामनाचे, सृष्टी पाहील होऊन दंग
शामही असेल अन् राधाही, रेशमी असाव्या ओळी
सुचावी अशी प्रेमकविता, एका रित्या सांजवेळी-