खरतरं एकट राहण एकांतात,
कधीच माझ्या मनाला पटल नाही.
पण तुझ्या आठवणींच्या सोबतीत,
कधीच मला एकट वाटल नाही.-
मी एकटी नाही
कविता माझ्या सोबत आहे
मनातील भावना शब्दात मांडण्यासाठी
लेखणीची मला साथ आहे
सांगत नाही भावना कोणाला म्हणजे
समजुन घेणार कोणी नाही अस नाही
मनातल दुःख कोणाला सांगायला
मला आवडत नाही
पण म्हणुन मी एकटी नाही
दुःख शब्दात मांडण्यासाठी
लेखणीची मला साथ आहे
-
तुझ्या आठवणींची माझ्याही
हृदयात आहे साठवण....
अश्रूंची ही झालिये पाठवण
तू एकदा साद ही ना
दिली सार कळून मग
कशी पाहू मी तरी माग वळून....-
एकटाच मी प्रवासी
एकटाच साठला एकांत
एकटाच मनी दाटला अक्रांत
एकट्याहुन एकटा मी
एक एकटा प्रवास..
-
Mere sati puri family our mere Aapne jane seye jada pyeer karney vale dost he....
-
बसलो होतो एकांतात
हरवूनी जुन्या विचारांत
त्यात आली आठवणीत ती
न बोलताच खुप काही सांगुन गेलेली
होती फक्त मैत्री की होते ते प्रेम
याचा कधी लागलाचं नाही नेम
कळाले नाही काही असा कसा झाला गेम
काहीच राहिलं नाही आता सेमसेम
असा काही झाला तो अंत
त्यामुळेचं आता आपुलासा वाटतो हा एकांत.......-
नव्हतो कधीही मी एकटा
राहिलो न कधी मी एकटा
सदैव माझ्या सोबती आहे
तुझ्या आठवणींचा राबता-
चुकली वारी एकदाची
सुनी सुनी एकादशी
एकटा राऊळी विठ्ठल
भक्ती कोंडली उराशी-
एकाकी रात्र माझी
एकटेपणाचा दिवस
कोणी नाही सोबतीला हि खंत उराशी...
चालता चालता एकट्याने
वर्ष ही सरत चाललंय
एकाकी पणा मुळे अश्रू ही डोळ्यांशी...
माझ ठिकाण एकाकी
एकाकी माझे जीवन
मी एकटा माझा मी स्वतः शी...
-
प्रेम करणारा मी एकटाच नव्हतो एवढंच तुला सांगितलं होत
फक्त माझीच बनून रहा सांग काय जगावेगळं तुला मागितल होत.
नात्यानात्यांमधे फरक असतो एवढी साधी गोष्ट ही तुला न कळावी
सगळ्या नात्यांना एकाच परीमाणात तोलताना तुला बघितल होत
तरीही सगळे दोष माझ्याच माथी घ्यायला आवडत मला नेहमी
कारण चांगुलपणाचा शाप मला नको म्हणून मीही देवाला सांगितलं होत
आणि बघ ना ह्या गोष्टीचा शेवटही तुला हवा तसाच होईल खुश हो जरा
सुखांशी वैर पत्करण्याच माझ मागणं ही माझ्यासारखच थोड विचित्रच होत.-