आज कळते बापाची मेहनत
आज वाटत खर
उगाच नव्हते प्रत्येक वेळेस सांगून सारखा दुनिया नाही वळत
येत होती मज्जा जेव्हा खर्च होता तो करत
आता करायला लागते मेहनत जाते एक एक रुपया ची किंमत कळत
कसा केला असेल मोठा सर्व होते मिळत जेव्हा तुला
आज बाहेर पडला तर रडत आला घरात✌🏻
त्याने किती केली मेहनत जेव्हा तू होता दुनिया फिरत
त्याच्या पैश्या वर माज करताना रुबाब होता करत
तो नाही बोलला कधी किती केले तुझ्या साठी
आज तुझी वेळ आहे दाखव थोड करून त्याच्या साठी☺️🤟🏻-
दीप सुविचार धारा....✍️
🌸🌺🌹🌼🍁🌿🍂
वाईट बातमीला पंख असतात तर,
शुभ बातमीला पायच नसतात,
आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसतं,
तिथे उत्तर म्हणुन स्वतःच उभं रहायच असतं.-
मला छोटीसी इजा झाली तरी
आईगं म्हणणारी तू l
आयुष्यभराच्या वेदना देण्यामागचा
तुझा काय असावा हेतू ll
© Sanket
-
अजुन काय हव...
आपल्याला एखादी व्याक्ति आवडावी आणि
त्याच व्याक्तिने आपल्याला Prapose
करुन सात जन्म साथ देण्याच वचन द्याव
अजुन काय हव आयुष्यात...
आपल्या मनात एखादी इच्छा यावी
आणिआपल्या साथीदाराने
लगेच ती पुर्ण करावी
अजुन काय हव आयुष्यात...
बाहेर मुसळधार पाऊस पडावा आणि
त्या पावसात आपल्या साथीदारा
सोबत मनसोक्त भिजाव
अजुन काय हव आयुष्यात...
संपुर्ण जगाच भान विसरुन
काही क्षण आपल्या जोडीदारा
सोबत निवांत घालवावे
अजुन काय हव आयुष्यात..-
कधी खाेटंखाेटं वागून,
कधी मनापासून खरं बाेलून..
©®MDK
कधी प्रेमाला नाकारून,
कधी बिनधास्तपणे जीव आेवाळून..
कधी भांडकुदळ बनून,
कधी थाेडीशी माघार घेऊन..
©®MDK
कधी विचार करून,
कधी खूप वेडेपणाने वागून..
कधी असे कधी तसे,
आयुष्यात पहावे एकदा करून !-
ते वर "छतावर" जाऊन पोहोचले
त्यांचा आनंद "गगनात" मावत नाही
अशा "आपमतलबी" माणसांना कधीही
आभाळ "आयुष्यात".... "घावत" नाही
© गजानन तुपे-
त्याच जुन्या वाटेवर
पुन्हा एकदा भेटू
तु वळून पाहशील मला
पतंग आसमानी काटू
त्याच जुन्या वाटेवर
मन भाळले तुझ्यावर
तु सर पावसाळी
मजवर गेली बरसून
त्याच जुन्या वाटेवर
हळव्या नदीच्या काठावर
चांदणे बुडाले पाण्यात
गेले अंगअंग सजून
त्याच जुन्या वाटेवर
मन वाहते लाटेवर
तु घेऊन गेलीस मन
मी थकलो शोधून-
आयुष्य खुप सुंदर आहे
त्याला जगता आल पाहिजे ...
जगाताना संकट अनेक आहे
त्याला सामोरी जाता आल पाहिजे...
आयुष्यात रडवनारे खुप आहे
कुणाला तरी हसवता आल पाहिजे ...
तसंच नात बनवणं सरलं आहे
मात्र नात टिकविता आल पाहिजे ...
-शब्दनया
-
आहे ठाऊक मला...
पण तुझ्या आयुष्यात देखील मीच आहे...
हाच प्रश्न आहे पडला....-
आयुष्यात आपल्यासाठी मारणारी आणि मरणारी व्यक्ती असतात हो...
कोणीतरी आपल्यासाठी जगणार भेटलं पाहिजे-