QUOTES ON #आयुष्याच्या

#आयुष्याच्या quotes

Trending | Latest

आयुष्याच्या वळणावर एक पाखरू भेटलं होतं,
डोळ्यांना धार होती त्याच्या,ते हृदयावर वार करून गेलं होतं...!

हृदयात जणु घर करून बसलं होतं,
डोळ्यांत जणू वारंवार सलत होतं..
जे आयुष्याच्या वळणावर भेटलं होतं,
आज ते पुन्हा YQ वर भेटलं होतं...!

स्वप्नात येऊन छळत होतं,मला पाहून हसत होतं,
गंमत केली जराशी, तर रुसत होतं..
किती जरी आल्या अडचणी मला,
खंबीरपणे माझ्या मागे उभा होतं...!

दिवस-रात्र फक्त माझीच आठवण काढत होतं..
समोरासमोर बोलणं नाही व्हायचं,
म्हणून YQ वर येऊन बोलत होतं...!

भेट नव्हती होत कधी जरी, तर तळमळून जात होतं,
मग फोटो कडे बघून माझ्या, एकटच हसत होतं..
ईकडे मला उचकी वर उचकी लागायची कारण,
तिकडे ते फक्त माझीच आठवण काढीत होतं...!
-✍️बालकवी (समाधान काळुंके)

-


28 OCT 2020 AT 21:07

आयुष्याच्या मध्यावर....
आठवली आयुष्याची ती काही पानं
ती पानंअगदी आंनदाने उघडली
सुरू केल त्यांच वाचन
अन् त्या सुरूवातीला पोहचली
मधेच कुणाचा कर्कश स्वर आला
अन् अलगद मी दचकली
हरवलेल भान परत घेऊन मी
परत माझ्या आयुष्याच्या मध्यावर आली

-


14 MAY 2019 AT 8:23

आयुष्याच्या या वळणावर

जरा विसावू या वळणावर
जरा विसावू या वळणावर
खरंय या वळणावर आता विसावण्याची गरज आहे
न जगलेले जिणं जगायची गरज आहे

आयुष्यभर खस्ता खात खातच जगलात
मुलाबाळांसाठी नेहमीच पोटाला चिमटा काढलात
स्वतःच्या तोंडचा घास त्या चिमुकल्यांना देत
आयुष्यभर मात्र स्वतः अर्धपोटीच निजलात

स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिलातच नाही
आणि तुमच्या हिला पण पाहू दिलात नाहीत
पण आता सोडून द्या सारेच विचार
आता जगायचंय ते फक्त आणि फक्त स्वतःसाठीच

भूतकाळात जगणं सोडून द्या आता
भविष्याचीही चिंता नकोय आता
वर्तमानात जगा फक्त आणि फक्त आनंद घेत
आयुष्यातील सुंदर क्षणांचा आस्वाद घेत

तुम्ही म्हणाल या वयात हे शोभते का?
तर हो हे वय तुमचं आहे ,आयुष्य तुमचं आहे
भूतकाळात केलेल्या चुका शोधून स्वतःला दोष देण्यापेक्षा
वर्तमानात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हसत हसत सामोरे जा

खुशाल करा गप्पागोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींशी
आणि घालवा सारा दिवस आनंदात
जरा विसावा घ्या या वळणावर
जरा विसावा घ्या या वळणावर

-


26 MAR 2021 AT 12:22

डॉक्टर आजाराचं औषध देऊ शकतात पण आजाराला सहन करण्याचं औषध माणसाचं माणसालाचं शोधावं लागत..!

-


24 FEB 2020 AT 0:48

हृदयात तेवतेवणाऱ्या मिणमिणत्या ज्योतीला
न विझनाऱ्या चिर:काल टिकून राहणाऱ्या आशेचा पहारा मिळाला की हीच मिणमिननारी ज्योत मशाल बनून पेठून उठते अंखड तेवत राहण्यासाठी..........

-


27 NOV 2020 AT 15:52

'आयुष्याच्या वळणावर'

आयुष्याच्या वळणावर ,काट्यांची कालवण
दुःखाचे उसासे पण आशेची साठवण

क्षणभंगूर आयुष्यात, उत्तराविना प्रश्नावली
सुटेना कोड ह्याचे,हेच का ते जीवन?

जीवनातील कटू आठवणी,कधी न संपणाऱ्या
न बोलताच अनेकदा ,सर्व काही सांगणाऱ्या

दुखभरल्या मनातून ह्या,काढावी दुःखाचे जळमटे
मनी पेटवावी सुखाची लकेर,अन् जगणे करावे सरळ

-


28 OCT 2020 AT 23:50

आयुष्याच्या मध्यावर
दिस,सांज निघून जातात भराभर
रात्रही विरून जाते काळीभोर
आठवणी मात्र तश्याच असतात मनभर
एक एक आठवल्या की धागे तुटतात वितभर
एकत्र विणता विणता बऱ्याच गोष्टी राहतात क्षणभर
कधी कणखर तर कधी कणभर
जगता जगता हरलो,कधी जिंकलो जीवनभर
कष्ट करता करता पैशाचं पाकिट भरलं असलं तरी
हात मात्र रिकामाच राहिला संसारभर
मोडक्या तुटक्या स्वप्नांचा हा खेळ चाले अर्ध्यावर....

-


5 JUL 2020 AT 17:18

कानावर पडावेत असे ज्ञानाचे दोन शब्द म्हणजे गुरु ..
चुकता वाट पकडावा सहाय्यतेसाठी जो हात म्हणजे गुरु...
आयुष्याच्या शिदोरीत ज्ञानाचा शिरा म्हणजे गुरु...
अ -ब -क -ड पासून बेहद पर्यंतचा प्रवास म्हणजे गुरु ...
आयुष्याकडे योग्य पद्धतीने बघण्याचा चष्मा देणारी व्यक्ती म्हणजे गुरु...
माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

-


30 MAY 2018 AT 22:28

गप्पा सुद्धा चढतात
जेंव्हा गोष्टी आयुष्याच्या असतात

नेमक्या त्याच आठवायला लागतात
ज्या विसरायच्या असतात.

-


24 MAY 2021 AT 16:01

#आयुष्याच्या वळणावर #
आयुष्याच्या वळणावर
वादळ येतच राहतात
उद्याच्या आशेवर आपण
म्हणत जगतच असतो
ते म्हणे पर्यंत दिवस
सरता सरले जातात
तिच संध्याकाळ
तिच रात्र म्हणीत
नवा दिवस उजाडतो
आयुष्याच्या वळणावर
वादळ येतच राहतात
आयुष्य हे कोऱ्या
कागदा सारखे आहे
कोऱ्या कागदा कडे
पाहिल्यावर काय
लिहायचे सुचत नाही
तसच आयुष्या मध्ये
पाहताना आपल्याला काय
करायचे ते सुचत नाही
त्या विचारां मध्ये
दिवस सरता सरले जातात
नव्या उमेदीने पुढे
मार्ग काधीत आपण
जातच राहीच...
यश,अपयश ,चठ, उतार
आपल्या बरोबर
येतच राहणार.....त्याना
मात करत आपण पुढे
जातच राहीच...
जिद्द आणि मेहनद
आपल्या बरोबर असेल
तर नव्या उमेदीने
आपण वाट काधीत
पुढे जातच राहीच....
आयुष्याच्या वळणावर
वादळ येतच राहतात
@कपिल पेंडसे, मुर्डी

-