संसार हा निभत कधीचं नसतो तो निभावून न्यावा लागतो,जोडीदाराच्या गुणदोषांसकट तो आपलासा करावा लागतो..!
-
संवेदनेचे रूपांतरण जेव्हा वेदनेमध्ये होते,तेव्हा ना ती बोलता येत ना सहन करता येत मग माणूस आपोआपच कठोर बनत जातो..!
-
चंद सांसों की है जिंदगी
यूं टुकड़ों में बिखेर पड़ी..
तू रो ले हंस ले खुलकर
उमर ढल रही है हर घड़ी..!-
हरवून गेले सारेच काही
आता कुणीच कुठे दिसत नाही..
उडून गेलेली पाखरे
घरट्यात परत येत नाही..!-
आयुष्याच्या गर्दितून कधी शांत होऊन बघितल तर, भरगच्च भरलेलं आयुष्य सुध्दा रीत वाटायला लागतं कदाचित हे जीवनाचं शेवटचं प्रखर सत्य असावं..!
-
जोपर्यंत एखादी वेदना आपण स्वतः अनुभवत नाही, तोपर्यंत तीची तिव्रता आणि त्रास आपल्याला जाणवतं नाही..!
-
जरूरी नहीं जबान में हमेशा चॉकलेट सी मिठास हो कई बार कुछ अच्छा करने के लिए कड़वा होना पड़ता हैं...!
-
स्तब्ध श्वास हे निजले अंतरी
आताशा माझे मी पण भिजले अंतरी..
गडबडले भाव हे आक्रोशले अंतरी
नको कुठलेच शब्द ओठ थिजले अंतरी..
पिसाट पाऊस कालचा भिजवून रात्र गेला
अस्तर कोरडे जीवाचे,दबले अंतरी..
सुरकुत्या पडल्या देहाला तो शेवटी निजवून गेला
अंकुर नव्या जगण्याचे,जळले अंतरी..!
-
धाव तुझी प्रेमाची,माझी प्रेमापर्यंत
नाव तुझी काठाची,माझी पाण्यापर्यंत..
गाव तुझे डोळयात माझ्या,माझे नजरेपर्यंत
भाव तुझे ओठात माझ्या,माझे श्वासापर्यंत..!-