तुझ्यापासून दूर जातो
जेंव्हा ती मला कुशीत घेते,
एक क्षणाचा हा दुरावा
रात्र पुन्हा तुझे स्वप्न देते....-
I dont know why...
The things i choose to get away from you, send me back to you...-
गोष्टीतल्या एका पात्राला
दुसऱ्या पात्राची दुसरी बाजू माहितीच असते असं नाही....
पण गोष्ट अवलंबून असते
ती एका पात्राला दुसऱ्या पात्राची दुसरी बाजू समजते की नाही....
कधी कधी होत असं
की एक पात्र अडकून जातो त्याच्याच गोष्टीत
विसरून जातो
दोन पात्र आणि त्यांच्या दोन बाजू असतात प्रत्येक गोष्टीत...
एक तिसर पात्र या गोष्टी बाहेरचं
या गोष्टीतल्या सगळ्या पात्रांच्या सगळ्या बाजू समजतं
आपल्या गोष्टीतही पात्रांना दुसऱ्या बाजू आहेत
हे त्याला दुसऱ्यांची गोष्ट पाहताना समजतं....
-
If you are Rachel,
I want to be Ross.
If you are monika,
I want to be Chandler.
If you are Phoebe
I want to be Mike...
Hey, I am not going to change myself for you...
But I want to know me as much as I want to know you....-
ऐसा क्या है उस जाम में
जो युं पिएं जा रहे हो।
क्यों बेतुकी बातों को याद रखा हैं
जो युं भुले जा रहे हो।-
'आपण सोबत आहे'
हे एकमेकांना सांगत असतात ते,
आणि जगाला वाटतं
एकमेकांना बघुन उगाच हसतात ते...
-
तु चिडलीस माझ्यावर कि
मी कोणाशीच बोलत नाही,
तेंव्हा लिहिलेली कविता मग तुझ्या अगोदर
मी मलाही दाखवत नाही...-
We talk with each other so much,
That we forget to listen sometimes
And sometime we forget what we listen....-
पुन्हा झोप लागत नाही
अशी जाग आली की,
पहाटेच्या स्वप्नांत जेव्हा
फुलते रातराणी 'ती'...-
रोज आठवण येते...
पण 'मी काहिच करायचं नाही' ठरवलंय आता...
रोज रोज आठवून
आठवणी आटतात का? पाहायचय आता...-